Headlines

का. आ. विद्यालय तोरणाळे चे एस.एस.सी. परीक्षेत यश

===================वाकडी.जामनेर.दि.११/०५/२६तोरणाळे- श्री ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ तोरणाळे, संचलित काशीराम आनंदा विद्यालयाचा एसएससी परीक्षा मार्च २०२६ चा निकाल ९७..०२% असून, सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल १००% लागलेला असून यशाची परंपरा कायम राखली आहे.शाळेतील गुणाानुक्रमे प्रथम भूमिका रविंद्र पाटील ९१.८०%, द्वितीय सुजल नंदकिशोर पाटील ८९.२०%, तृतीय नंदनी गजानन इंगळे ८८.४०% यांनी घवघवीत यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष बाबुराव आनंदा पाटील, उपाध्यक्ष, सचिव व सर्व संचालक मंडळातर्फे तसेच शाळेच्या मुख्याध्यापक व मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू यांनी अभिनंदन केले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे परिसरात कौतुक होत आहे.

Read More

जामनेर तालुका – अतिवृष्टीग्रस्त क्षेत्राची पाहणी

जामनेर तालुक्यातील रोटवद , नाचणखेडा व लाखोली परिसरातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी दिनांक १८.०८.२०२५ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी श्री. विजयकुमार ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार जामनेर ,स्थानिक पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी यांच्यासमवेत करण्यात आली. सदर पाहणी दरम्यान संबंधित गावाचे सरपंच, पोलिस पाटील, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, साहाय्यक कृषी अधिकारी, महसूल मंडळ अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. बाधित कुटुंबांची पाहणी अतिवृष्टीमुळे मौजे लाखोली येथील कुटुंब प्रमुख उस्मान तेजबशहा फकीर, शांताबाई देवराम चौधरी, नामदेव काशिनाथ पाटील व माणिक भील यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झालेले आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. शेती नुकसानीची पाहणी• मौजे भिलखेडा शिवार गट क्र. 35/3 धारक श्री. विद्याधर रघुनाथ पाटील• मौजे नाचणखेडा शिवार गट क्र. 8 धारक श्री. विलास अशोक चौधरी• मौजे रोटवद शिवार गट क्र. 29, 184, 274, 193, 194 व 190 धारक श्री. भारत काशीनाथ देशमुख, सौ. कमलाबाई शालिक देशमुख, सौ. मीना भगवान देशमुख, श्री. विजय शालिक देशमुख, श्री. शालिक गोवा देशमुख व श्री. राजू शालिक देशमुख यांच्या शेतशिवारालगतच्या नाल्यात पूरस्थिती निर्माण होऊन कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले. प्रशासनाचे निर्देश मा. अपर जिल्हाधिकारी यांनी बाधित शेतकरी व नागरिकांशी संवाद साधून शासन स्तरावर करण्यात येत असलेल्या मदत व उपाययोजना याबाबत माहिती दिली. तसेच संबंधित ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव सादर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

Read More

भारतीय जैन संघटनेतर्फे जामनेरला बालकांसाठी विविध कार्यक्रम संपन्न

( जामनेर -प्रतिनिधी )- येथील भारतीय जैन संघटनेतर्फे बाल दिनानिमित्त पाच वर्षापासून ते वीस वर्षापर्यंतच्या बालकांसाठी महावीर भवन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन बाल दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात बालकांसाठी खो-खो,संगीत खुर्ची,रस्सीखेच,पास कप खेळांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धाही ठेवण्यात आल्या होत्या या स्पर्धेत 115 बालकांनी सहभाग नोंदविला. ज्या मुलांनी स्पर्धेत विजय मिळवला त्यांना बक्षिसे देण्यात आली. राकेश हिरालालजी संचेती हे प्रायोजक म्हणून होते.जळगाव जिल्हा महिला विंग जिल्हाध्यक्षा सोनल कोठारी यांनी सुत्रसंचलन केले. खानदेश विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत, जिल्हा उपाध्यक्ष विकास कोठारी, माजी जिल्हा कार्याध्यक्ष शितल लोढा, जय बोहरा, रितेश कोठारी, विशाल ओस्तवाल एवं बीजेएस महिला अध्यक्षा सौ. मोना चोरडीया, सदस्या सौं जयश्री लोढा, सौ. सोनाली सिसोदीया, महावीर पाठशाळा प्राध्यापक सौ. वनमाला कोठारी, सौ वैशाली बागमार, सौ. सपना ब्रम्हेचा, सौ. ऊषा पोरवाल, सौ. रोशनी भंडारी, सौ.शितल संचेती, सौ. नमिता चोपडा,आदी पदाधीकारी उपस्थित होते. प्रोजेक्ट हेड म्हणून विकास ललवाणी, सौ दिपाली चोरडिया यांनी काम पाहीले.

Read More

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची तब्येत अचानक बिघडली; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुरुवारी (दि. ५ मार्च २०२६) विधानभवनात कामकाज सुरू असताना मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची अचानक तब्येत खालावली. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबई येथील सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालय व संशोधन केंद्र येथे दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे नेते व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून आमदार पाटील यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या. सध्या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती त्यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी यांनी दिली आहे.

Read More

हिवरखेडा पूल ते वाघूर उपसा सिंचन योजना पंप हाऊस (मेजाय रस्ता) रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भव्य भूमिपूजन

हिवरखेडा पूल ते वाघूर उपसा सिंचन योजना पंप हाऊस (मेजाय रस्ता) रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भव्य भूमिपूजन हिवरखेडा (ता. जामनेर) : हिवरखेडा पूल ते वाघूर उपसा सिंचन योजना पंप हाऊस (मेजाय रस्ता) या महत्त्वपूर्ण रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. हा रस्ता वाघूर उपसा सिंचन योजना, जामनेर नगरपालिका वॉटर सप्लाय योजना तसेच आजूबाजूच्या अनेक शेतकऱ्यांचा मुख्य संपर्क मार्ग असल्यामुळे, पाच किलोमीटर लांबीच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी वाघूर विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. यशवंत भदाणे, कार्यकारी अभियंता श्री. गोकुळ महाजन, कार्यकारी अभियंता श्री. विनोद पाटील, उपविभागीय अभियंता श्री. अमोल कुमावत यांची उपस्थिती होती. तसेच पंचायत समिती भाजप गटनेते श्री. अमर शिवाजीराव पाटील, सरपंच श्री. देविदास दशरथ जोहरे, पोलीस पाटील श्री. लिलाधर मालखेडे, माजी सरपंच डॉ. रमेश पाटील, श्री. जितेंद्र भिला पाटील, श्री. अमोल सुधाकर पाटील, श्री. उमेश महाजन, विकास सोसायटी चेअरमन श्री. अरूण शंकर चौधरी, तसेच चिचखेडा येथील बापू पाटील, नामदेव झावरे, सुभाष जासुद आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या डांबरीकरणामुळे परिसरातील नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Read More

प्रत्येक निवडणुकीत एकाच घरातील सदस्यांना उमेदवारी का?

जे बी एन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी जब्बार एस तडवी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फरदापुर गणात राजकीय पक्षांकडून पुन्हा एकदा एकाच घरातील सदस्यांना उमेदवारी तिकीट दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व रोष उफाळून येताना व्यक्त होत आहे. प्रत्येक निवडणुकीत त्याच कुटुंबातील व्यक्तींनाच संधी दिली जात असल्याने सामान्य कार्यकर्ते व नव्या तरुण उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना जनतेतून पुढे येत आहे.“पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्तांना डावलून घराणेशाहीला प्राधान्य दिले जाते,” अशी टीका स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. यामुळे लोकशाही मूल्यांना तडा जात असून पक्षांची विश्वासार्हता कमी होत आहे, त्यातच रस्ते, पाणी,आरोग्य, व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये अपेक्षित सुधारणा झालेली नाही निवडणूक आली की आश्वासनाचा पाऊस आणि नंतर मात्र शांतता असा अनुभव जनतेने वारंवार घेतला आहे यावेळी मात्र जनतेचा सूर बदललेला दिसत आहे घराणे नाही काम पाहिजे अशी स्पष्ट भूमिका फरदापुर गणात परिवर्तनाची लाट निर्माण होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे असेही मत व्यक्त होत आहे.तरुण व सक्षम उमेदवारांना संधी न देता वारंवार एकाच घरातील सदस्यांना तिकीट दिल्यास निवडणुकीत याचा फटका पक्षांना बसू शकतो, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. याबाबत राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करून न्याय्य व पारदर्शक उमेदवार निवड प्रक्रिया राबवावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

Read More

जामनेर येथे अत्याधुनिक जी. एम. फिजिओथेरपी सेंटर व नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

जामनेर येथे अत्याधुनिक जी. एम. फिजिओथेरपी सेंटर व नव्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जामनेर (प्रतिनिधी): जामनेर शहरातील न्यू रुबीस्टार हॉस्पिटलच्या वतीने अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज जी. एम. फिजिओथेरपी सेंटर तसेच नव्या सुसज्ज रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे जामनेर व परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार, आधुनिक आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. न्यू रुबीस्टार हॉस्पिटलने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित तज्ज्ञांच्या माध्यमातून जी. एम. फिजिओथेरपी सेंटर सुरू केले आहे. या केंद्रामध्ये विविध शारीरिक व्याधी, दुखापतीनंतरचे पुनर्वसन, सांधेदुखी, मणक्यांचे आजार तसेच इतर फिजिओथेरपी उपचार आधुनिक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याचबरोबर रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीची सेवा मिळावी यासाठी नव्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचेही लोकार्पण करण्यात आले. या रुग्णवाहिकेमुळे गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार केंद्रात पोहोचविणे अधिक सोयीचे होणार असून आरोग्यसेवेची गुणवत्ता आणखी उंचावणार आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उपचार सेवा आणि रुग्णकेंद्रित दृष्टिकोन यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या न्यू रुबीस्टार हॉस्पिटलच्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी न्यू रुबीस्टार हॉस्पिटलच्या संपूर्ण व्यवस्थापन, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाचे नागरिकांनी अभिनंदन केले असून, भविष्यातही अशाच दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Read More

खडकी ता. जामनेर येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

खडकी गावात संत सेवालाल महाराज जयंती भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्यात आली. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक वेशभूषा आणि स्वच्छता अभियान राबवत गावकऱ्यांनी एक आदर्श उपक्रम साकारला. संपूर्ण गावाच्या सहभागातून झालेल्या या उपक्रमामुळे सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन सुशील भाऊ नाईक यांनी केले होते. कार्यक्रमाला राज्याचे मंत्री गिरीश भाऊ महाजन तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे जयंती उत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाले.

Read More

जामनेरात मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळे संपन्न

जामनेर (प्रतिनिधी):जामनेर नगरपरिषदेच्या वतीने आज विविध विकासकामांचे भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळे जल्लोषात पार पडले. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे मंत्री गिरीशभाऊ महाजन होते. त्यांच्या हस्ते अनेक महत्त्वाच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरपरिषदेचे माजी नगरसेवक, नगरसेविका, पक्षपदाधिकारी तसेच शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निमित्ताने जामनेर शहरातील नागरिकांना सुविधा पुरवणारी, शहराचा विकास वेगाने करणारी अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत.लक्ष्मी कॉलनी (गट क्र. 391/2) — कंपाउंड वॉल व लादीकरण — 64.51 लाख, गिरिजा कॉलनी (गट क्र. 458) — संतोषी माता मंदिर परिसरात क्लब हाऊस बांधकाम — 79.36 लाख, पाचोरा रोड (गट क्र. 206) — क्लब हाऊस व कंपाउंड वॉल — 128.93 लाख,शिव कॉलनी — कंपाउंड वॉल, लादीकरण व बगीचा विकास — 45.34 लाख, मधुबन कॉलनी (गट क्र. 43/2 व 431/2) — खुल्या जागेचा विकास — 47.13 लाख व 69.83 लाख,शहाजान शहावली दर्गा परिसर — सौंदर्यीकरण व विकास कार्य — 100 लाख, विवेकानंद नगर — व्यायामशाळा बांधकाम — 49.82 लाखगट क्र. 292/2 — व्यायामशाळा बांधकाम — 72.72 लाखगट क्र. 5 — कुस्ती आखाडा बांधकाम — 52.74 लाख या सर्व कामांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी नितीन बागुल आणि नगरपरिषद कर्मचारीवृंद यांनी मोलाचे परिश्रम घेतले. या कार्यक्रमाद्वारे जामनेर शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळणार असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

Read More

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला बचत गटांना पाठिंबा

नागपूर, ८ मार्च २०२५: आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिला शक्ती, समानता आणि स्वावलंबनाचे प्रतीक आहे. जगभरातील महिलांच्या योगदानाची ओळख पटवून देण्यासाठी आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या संदर्भात, अदानी फाउंडेशनने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आणि ग्रामपंचायत आलेसुर येथील हनुमान मंदिराजवळील ‘श्री महालक्ष्मी स्वयंसहाय्यता गटाला’ उपजीविकेसाठी मदत केली. या उपक्रमांतर्गत, गटाला केटरिंग साहित्य पुरवण्यात आले जेणेकरून ते त्यांचा व्यवसाय वाढवू शकतील आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनू शकतील. त्यात १०० केटरिंग प्लेट्स, २०० वट्ट्या, २ भात वाढण्याचे साहित्य, ४ वाट्या, १ जर्मन भांडे, २ भाजीपाला वाढण्याचे चमचे आणि २ चमचे समाविष्ट आहेत. हे सर्व साहित्य वापरकर्त्यांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे, जेणेकरून ते आवश्यकतेनुसार योग्यरित्या वापरता येतील. याशिवाय, गोंडखैरी गावाच्या सरपंच श्रीमती वर्षा आतकरी, आलेसुर गावाच्या सरपंच श्रीमती मालाबाई निकोसे, बचत गटाच्या सीआरओ श्रीमती नीता म्हस्के आणि इतर बचत गट सदस्यांचाही सन्मान करण्यात आला. या प्रसंगी वात्सल्य एनजीओचे श्री. हरीश लाड, ग्रामपंचायत सदस्य श्री. देविदास मोहरले, आलेसुर गावाचे उपसरपंच श्री. मारुती सोनुले उपस्थित होते. कार्यक्रमात वृक्षारोपणही करण्यात आले. ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे या प्राथमिक उद्देशाने अदानी फाउंडेशनच्या उपजीविका प्रोत्साहन योजनांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सध्या ग्रामीण महिला स्वयंरोजगाराद्वारे त्यांच्या कुटुंब आणि समाजात योगदान देत आहेत. अशा परिस्थितीत, या प्रकारच्या मदतीमुळे ते त्यांचा व्यवसाय अधिक प्रभावीपणे चालवू शकतात आणि त्यांच्या कौशल्यांचा अधिक चांगला वापर करू शकतात. या कार्यक्रमात, अदानी फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी समूहातील महिलांना प्रोत्साहन दिले आणि सांगितले की संस्थेचे उद्दिष्ट केवळ महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे नाही तर त्यांना स्वावलंबी होण्याच्या मार्गावर नेणे देखील आहे. ग्रामीण भागात जेव्हा महिला संघटित पद्धतीने काम करतात तेव्हा त्या केवळ त्यांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारत नाहीत तर समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात. आनंद व्यक्त करताना ग्रुपमधील एका सदस्याने सांगितले की, “अदानी फाउंडेशनकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे आमच्या व्यवसायाला एक नवीन दिशा मिळेल. आता आम्ही आमच्या केटरिंग सेवेचा विस्तार चांगल्या सुविधांसह करू शकतो आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. या मदतीमुळे आम्हाला स्वावलंबी होण्यास खूप मदत होईल.” कार्यक्रमाच्या शेवटी, गटातील महिलांनी अदानी फाउंडेशनचे या पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि भविष्यातही अशाच प्रकारच्या पाठिंब्याची आशा व्यक्त केली. या उपक्रमाचा फायदा केवळ ‘श्री महालक्ष्मी बचत गटाला’ होणार नाही तर इतर महिलांना स्वयंरोजगार करण्यासाठी प्रेरणा मिळेल. असे उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहेत, जे ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी होण्यास प्रेरित करतात आणि त्यांच्या आर्थिक विकासात मदत करतात.

Read More
error: Don't Try To Copy !!