जामनेर – पाण्याचे काम हे पुण्यार्जनाचे काम आहे – शांतीलाल मुथा

जामनेर(वा.)- जैन समाज हा दुष्काळामुळे राजस्थानातून बाहेर पडला.पूर्वी नुसती पाणपोई बांधली तरी समाधान होते, आता तलाव बांधायची वेळ आली आहे.तलावातील गाळ काढल्यामुळे पाण्याची क्षमता वाढेल.पुर्ण गाव पाणीमय होईल. काढलेला गाळ शेतात टाकल्यामुळे बंजर जमीन सुपीक बनेल. प्यायला पूर्ण गावाला,जनावरांना पाणी मिळेल. शेतात गाळ आल्यामुळे वर्षातून तिनदा पिके घेतील. ग्रामीण अर्थव्यवस्था बदलेल.असे मत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केले. ते पुणे येथील वर्धमान प्रतिष्ठान सभागृहात संघटनेच्या महाराष्ट्रातील पदाधिकारी,कार्यकर्ते, जिल्हा समन्वयक यांच्या आयोजित बैठकीत बोलत होते. नवकार महामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली.राज्य अध्यक्ष केतन शाह यांनी उपस्थितांचे स्वागत केले.राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर सांखला यांनी प्रास्तविक केले.मुथा म्हणाले, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि नाला खोलिकरण व रुंदीकरण ही सरकारच्या मृदु व जलसंधारण विभागाची योजना आहे. ही योजना गावागावात,शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच जास्तीत जास्त गावाकडून मागणी अर्ज येण्यासाठी संघटना लोकचळवळ निर्माण करेल. तसा करार शासनाशी झाला असुन या साठी सुहाना स्पाईसेस यांचे सहकार्य लाभत आहे.कार्यकर्त्यांचे सर्व शंकांचे निरासन मुथा यांनी केले.उपस्थितांना संघटनेने तयार केलेल्या ॲपमध्ये गावाची तलावातील गाळ काढण्यासाठी मागणी अर्ज भरुन काढण्याचे प्रात्यक्षिक संघटनेचे मेनेजिंग डायरेक्टर कोमल जैन यांनी दाखविले.लवकरच महाराष्ट्रातील संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शासनाच्या या योजनेला सहकार्य करतील.सुहाना स्पाईसेस चे विशाल चोरडिया म्हणाले, भारतीय जैन संघटने बरोबर आम्हाला या कार्यात सहभागी होता येत आहे, याचा आनंद वाटतो. राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा, राज्य सचिव प्रविण पारख यांनी मनोगत व्यक्त केले.या बैठकीला खानदेशातून विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा(शिंदखेडा), विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत(जामनेर)जळगाव जिल्हा अध्यक्ष निर्मल बोरा, सचिव दर्शन देशलहरा(चोपडा),राजेश जैन(पाचोरा),मनोज कोचर (शहादा), गौरव छाजेड, जय मुथा (बोदवड), महावीर डागा, शुभम डागा (अक्कलकुवा),देवेंद्र शाह, उज्ज्वल डेरेकर (रावेर)) पंकज जैन (जळगाव), चेतन जैन (भुसावळ), संदिप जैन, शीतल जैन, चेतन जैन (शेंदुर्णी), रोशन गोलेछा(चाळीसगाव) उपस्थितीत होते. आभर केतन शाह यांनी मानले.

Read More

अमळनेरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा रेल्वेखाली मृत्यू; टकरेखेडा परिसरात हळहळ

जामनेर | प्रतिनिधीजळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील टकरेखेडा परिसरात गुरुवारी (२७ ऑगस्ट) पहाटे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींचा रेल्वे मार्गावर मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुनील अमृत भिल, त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल आणि त्यांच्या दोन मुली यांचा या घटनेत मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास टकरेखेडा शिवारातील रेल्वे मार्गावर ही घटना घडल्याचे समोर आले आहे. धावत्या रेल्वेसमोर गेल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि शवविच्छेदनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील चार जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने टकरेखेडा परिसरावर शोककळा पसरली आहे. कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून ग्रामस्थांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक किंवा अन्य कोणत्या कारणामुळे ही घटना घडली का, यासह विविध शक्यतांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घटनेने अमळनेर तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

व्यसन हे युवकांच्या स्वप्नांचे आणि देशाच्या भविष्याचे सर्वात मोठे शत्रू – मा. न्यायाधीश अतीश खोल्लम

बोदवड | प्रतिनिधी“आजचा युवक हा उद्याच्या भारताचा शिल्पकार आहे. मात्र तोच युवक अमली पदार्थांच्या विळख्यात सापडला तर केवळ त्याचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे भवितव्य अंधारात जाईल. व्यसन हे युवकांच्या स्वप्नांचे, कुटुंबाच्या सुखाचे आणि देशाच्या प्रगतीचे सर्वात मोठे शत्रू आहे,” असे परखड मत बोदवड न्यायालयाचे माननीय न्यायाधीश अतीश खोल्लम यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड येथील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) एककाच्या विशेष हिवाळी शिबिराअंतर्गत आयोजित “समर्थ युवक, समर्थ भारत” मॅरेथॉन व “अमली पदार्थ मुक्त भारत – अमली पदार्थ मुक्त तरुण” या विषयावरील व्याख्यान कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.न्यायाधीश खोल्लम म्हणाले की, अमली पदार्थांचे सेवन सुरुवातीला मौज-मजेसाठी सुरू होते, मात्र पुढे त्याचे रूप गंभीर व्यसनात बदलते आणि शेवटी गुन्हेगारीकडे वाटचाल होते. न्यायालयात येणाऱ्या अनेक गुन्ह्यांची मुळे ही व्यसनाधीन तरुणांशी जोडलेली असतात. चोरी, मारहाण, फसवणूक यांसह गंभीर गुन्ह्यांमागे व्यसन हे प्रमुख कारण असल्याचे वास्तव त्यांनी अधोरेखित केले.कायद्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करताना त्यांनी एन.डी.पी.एस. कायद्यानुसार अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांना अत्यंत कठोर शिक्षा, मोठा दंड व दीर्घकालीन कारावासाची तरतूद असल्याचे स्पष्ट केले. क्षणिक आकर्षण किंवा चुकीची संगत आयुष्य उद्ध्वस्त करू शकते, त्यामुळे युवकांनी सदैव व्यसनांपासून दूर राहावे, असा ठाम संदेश त्यांनी दिला.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बोदवड वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अर्जुन पाटील यांनी अमली पदार्थांचे मानसिक, शारीरिक व कौटुंबिक दुष्परिणाम स्पष्ट करत युवकांनी चुकीच्या संगतीपासून दूर राहण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस. कार्यक्रमाधिकारी प्रा. नितेश सावदेकर यांनी केले. त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांनुसार युवक हा परिवर्तनाचा प्रमुख घटक असल्याचे सांगत एन.एस.एस. ही समाजबदलाची चळवळ असल्याचे नमूद केले.यावेळी आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत २३२ स्वयंसेवक व शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुलांच्या गटातून रिहान शेख प्रथम, विनायक भावसार द्वितीय तर जयदीप सरोदे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. मुलींच्या गटातून कु. आयेशा निजाम मुलतानी प्रथम, त्रिवेंद्र वाघ द्वितीय तर कु. लीना सांगवे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद चौधरी यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. शरद पाटील, तर आभार प्रदर्शन कु. उपासना पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. कंचन दमाडे, प्रा. अजित पाटील, प्रा. ज्ञानेश्वर तिवारी, प्रा. तुषार सोनवणे व सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Read More

” ज्ञान गौरव, तप गौरव एवं समाज गौरव “

भारतीय जैन संघठणा जामनेर शाखा तर्फे ” ज्ञान गौरव, तप गौरव एवं समाज गौरव ” हा कार्यक्रम गुणवंत विद्यार्थीजे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजैसे 10 वी,12 वी मध्ये85 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थीतसेच उच्च शिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टर,वकील,सीए, आर्किटेक्ट, एमबीए,इंजीनियर,एम फार्म, पीएचडी इ.सर्व विद्यार्थीकला व क्रीड़ा क्षेत्रामध्ये में विशेष कामगिरी करणाऱ्या सर्व सदस्य आणि8 उपवास किंवा त्यापेक्षा जास्त तपस्याकरणारे तपस्वी तसेचवर्षीतप तपस्वी56 विद्यार्थी आणि तपस्विंचा आणिसमाजसाठी गौरवनिय कार्य करणाऱ्यासमाजातील 5 सदस्यांचासादर सत्कार आणि सन्मानकरण्यात आला समाजामध्ये विशेष कार्य करणे हेतूसमाज गौरव पुरस्कार दिले गेले.सर्वांचा शाल,माळा,सन्मानपत्र आणि जैन धर्माचे प्रतिकचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष बीजेस राज्य उपाध्यक्षश्री विनयजी पारख यांनी सभेलाभविष्यात होणाऱ्या बीजेस च्य कार्यक्रमांची अनमोल माहिती देऊन मार्गदर्शन केले|महिला जिल्हा अध्यक्षसौ सोनल कोठारी यांनी बीजेस बद्दल माहिती दीलीlकार्यक्रम के प्रायोजक डॉ कांतिलालजी कल्पेशजी परेशजी ओस्तवाल परिवार यांच्यातर्फे केलेले होते lकार्यक्रमाचे सूत्र संचालनसौ मनिषा कोठारी आणि आभार प्रदर्शनसौ वंदना चोरडिया यांनी केलेकार्यक्रमामध्ये बीजेस खान्देश उपाध्यक्ष सुमित मुनोत,खानदेश कार्यकारिणी सदस्य सचिन चोपडा,जिल्हा उपाध्यक्ष विकास कोठारी,शहर अध्यक्ष कुशल बोहरा,शहर उपाध्यक्ष दर्शन भुरटशहर सचिव संकल्प लोढासदस्य विकास ललवाणी,डॉ नरेंद्र रांका,डॉ दीपक कोठारी,वैभव छाजेड, आदि सदस्य एवममहिला विंग जिल्हा अध्यक्ष सौ सोनल कोठारी,जिल्हा महासचिव सौ संगीता मंडलेचा,महिला शहर अध्यक्ष सौ मोना चोरडिया,सचिव सौ रुपाली बोहरा, उपाध्यक्ष सौ शीतल चोरडिया,सदस्य मनिषा कोठारी,वंदना चोरडिया इ. सदस्य उपस्थित होते|कार्यक्रमाचे प्रोजेक्ट हेडदर्शन भुरट,दर्शन बागमार,सौ सोनाली सिसोदिया आणिसौ स्नेहल मुनोत हे होतेl

Read More

चिपळूणजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; ३० ते ४० प्रवासी जखमी

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात शनिवारी भीषण बस अपघाताची घटना घडली. अंबाडास खांदाट जंक्शनजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात तब्बल ३० ते ४० प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.धडक इतकी भीषण होती की दोन्ही बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमी प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले.जखमींना रुग्णालयात दाखलअपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने चिपळूण ग्रामीण रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.काही प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघात कसा झाला?प्राथमिक माहितीनुसार, रत्नागिरी-कुडाळ आणि चिपळूण-खेड मार्गावर धावणाऱ्या दोन एसटी बस अंबाडास खांदाट जंक्शनजवळ समोरासमोर आल्या. त्यानंतर दोन्ही बसची जोरदार धडक झाली.मात्र, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. चालकाचा निष्काळजीपणा, रस्त्याची परिस्थिती किंवा अन्य कोणते कारण होते का, याची चौकशी केली जात आहे.घटनास्थळी मदतकार्यअपघातानंतर वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी यासाठी स्थानिक नागरिकांनीही मदत केली.या दोन्ही घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित यंत्रणांकडून घटनांची चौकशी सुरू आहे.

Read More

नादुरुस्त बायपासने घेतला आणखी एक बळी!

टँकरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी, परिसरात संताप जळगाव : तरसोद ते पाळधी बायपास मार्गाची नादुरुस्ती आणि त्यावरून वाहतूक वळवल्यामुळे जळगाव शहरातील रस्त्यांवर अपघातांचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर टँकरच्या धडकेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, दोघे जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.बायपास मार्गाची अवस्था खराब झाल्याने अवजड वाहनांची वाहतूक जळगाव शहरातून वळविण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर जड वाहनांची संख्या वाढली असून, अपघातांचा धोका वाढल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.या अपघातानंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नादुरुस्त बायपासची तातडीने दुरुस्ती करून अवजड वाहतूक पुन्हा बायपास मार्गावरून सुरू करावी, तसेच शहरातील वाहतुकीसाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.दरम्यान, या दुर्घटनेतील जखमींवर उपचार सुरू असून अपघाताबाबत अधिकृत तपशील आणि पोलिसांचा पुढील तपास अपेक्षित आहे.नागरिकांचा सवाल : आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?

Read More

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत गरुड विद्यालयाचे घवघवीत यश

धी शेंदुर्णी एज्युकेशन को-ऑप सोसायटीचेआ.ग.र गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथील विद्यार्थ्यांचे तायक्वांदो स्पर्धेत यश व विभागावर निवळ नुकत्याच जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेतील ज्या विद्यार्थ्यांची जिल्ह्यावर निवड झाली यापैकी 11 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून नुकताच जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेतून विजयी होत.सुवर्णपदक प्राप्त विजेते विद्यार्थी केवीन रवींद्र चौधरी, दक्ष लोखंडे,प्रद्युम्न जगताप,आर्यन वानखेडे,साहिल शेलार,चिन्मय सुर्वे, रागिणी पाटील,दृष्टी भारुडे,कामिनी नाथ,विनायक भोई,या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले असून त्यांची विभागावर निवड झालेली आहे. तायक्वांदो स्पर्धेत 11 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले 4 विद्यार्थ्यांना रौप्य पदक मिळालेले आहे . या 11 विद्यार्थ्यांची विभागावर निवड झालेली आहे.म्हणून या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजय रावजी गरुड व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शेळके,सचिव काकासोसागर मलजी जैन,सहसचिव दादासो यु यु पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसो दीपकजी गरुड,वस्तीगृह सचिव गो गो सूर्यवंशी,विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी, पर्यवेक्षक व्ही.एम शिरपुरे,पर्यवेक्षक विनोद पाटील या मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे देखील अभिनंदन केले.तसेच फिजिकल टीचर पी पी पाटील,अमोल पाटील,आर.एम.सपकाळे,पी एम पाटील,सचिन सुर्वे इत्यादी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Read More

‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याच्या चौकशी समितीच्या अध्यक्षालाच अटक. शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

ना गपूर (प्रतिनिधी) राज्य भर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याच्या चौकशी समितीचे अध्यक्ष राहिलेले विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांना गुरुवारी रात्री अटक केली. विशेष म्हणजे, शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासासाठी सुरुवातीला चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती.त्यांच्या अहवालाच्या आधारेच या संपूर्ण चौकशीला नवीन वळण मिळाले. आता स्वतः वंजारीच चौकशीच्या फेऱ्यात सापडले आहेत.नागपूर जिल्ह्यात २०१९ पासून गैरमार्गाने ‘शालार्थ आयडी’ प्रदान करून वेतनास पात्र नसलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अदा करण्यात आले. नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी १२ मार्च रोजी पोलिसांकडे या घोटाळ्याचीपाटील यांनी १२ मार्च रोजी पोलिसांकडे या घोटाळ्याची तक्रार केली. उल्हास नरड यांच्या सांगण्यावरून ही तक्रार करण्यात आली होती. प्राथमिक माहिती अहवालानुसार, विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने फेब्रुवारी २०२५ मध्ये शिक्षण आयुक्तांना अहवाल सादर केला होता. उपसंचालक कार्यालयाने २११ प्राथमिक शिक्षक, २ मुख्याध्यापक, १८ कनिष्ठ लिपिक, १३ शिपाई अशी २४४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी दिली होती. त्यानंतर शिक्षण आयुक्तांनी वंजारी यांच्या अहवालाच्या आधारे कठोर भूमिका घेत तपासणी सुरू केली.यासाठी २०१९ ते २०२५ पर्यंत नागपूर जिल्ह्यातील संशयित प्राथमिक शाळांमधील ‘शालार्थ आयडी’चा तपास सुरू केला होता. परंतु, आता वंजारी यांनाच अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वंजारी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होण्यापूर्वी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी होते.या दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी असलेले मृत सोमेश्वर नैताम यांची खोटी स्वाक्षरी करून २०१० ते २०१४ या काळात शिक्षक रुजू झाल्याचे दाखवण्यात आले आहे.तसेच, त्यांचे ‘शालार्थ आयडी’ २०१९ ते २०२५ या काळात निर्माण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे वंजारी यांना अटक करण्यात आली असून या दिशेने तपास केला जाणार आहे.

Read More

“खाऊन-पिऊन आंदोलन करा” म्हणताच संताप; नरहरी झिरवाळांच्या वक्तव्यावर आदिवासी विद्यार्थ्यांचा आक्षेप

जळगाव | प्रतिनिधी पुणे शहरातील मांजरी परिसरात विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला आता वेगळे वळण मिळाले आहे. मागील सुमारे १४ दिवसांपासून आंदोलन आणि उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या कथित वक्तव्यामुळे संतापाची लाट निर्माण झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. मांजरी परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थी उपोषणाला बसले असून, दीर्घकाळ उपोषण केल्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवरही परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून सातत्याने केली जात आहे. झिरवाळांच्या वक्तव्यावरून वाद या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री नरहरी झिरवाळ यांचे “खाऊन-पिऊन आंदोलन करा” अशा आशयाचे वक्तव्य चर्चेत आले आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य करण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थी आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी उपोषण करत असताना त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्देशून करण्यात आलेले वक्तव्य त्यांच्या भावना दुखावणारे असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. १४ दिवसांपासून आंदोलन मांजरी परिसरात गेल्या १४ दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू असल्याचे स्क्रीनशॉटमधील वृत्तात नमूद करण्यात आले आहे. आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी शासनाकडे आपल्या मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली आहे. दीर्घकाळ आंदोलन सुरू असूनही ठोस तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे चित्र आहे. उपोषणामुळे काही आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याचा दावा करण्यात आला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण, रोजगार आणि शासकीय संधींशी संबंधित प्रश्न यापूर्वीही राज्यात विविध आंदोलनांच्या माध्यमातून समोर आले आहेत. पेसा क्षेत्रातील भरतीचा प्रश्नही अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. पेसा कायद्यांतर्गत अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक आदिवासी उमेदवारांसाठी विविध पदांवर भरतीची तरतूद करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेशी संबंधित प्रश्नांमुळे हजारो उमेदवार प्रभावित झाल्याचे पूर्वीच्या वृत्तांतून समोर आले आहे. मात्र, मांजरी येथील सध्याच्या आंदोलनाच्या नेमक्या मागण्या आणि त्यावरील शासनाचा अधिकृत निर्णय याबाबत उपलब्ध स्क्रीनशॉटमध्ये संपूर्ण तपशील दिलेला नाही. त्यामुळे आंदोलनातील प्रत्येक मागणी किंवा शासनाची अधिकृत भूमिका स्वतंत्रपणे पडताळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आपल्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे आणि ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. आंदोलन दीर्घकाळ सुरू राहिल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर होऊ शकतो. दरम्यान, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या वक्तव्याचा नेमका संदर्भ आणि त्यांची अधिकृत भूमिका काय आहे, तसेच आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

जामठीत अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तनाचा आरोप; संतप्त जमावाचा उद्रेक, शिक्षकाची कार पेटवली

पोलिसांवर दगडफेक; अश्रुधुराच्या नळकांड्या व सौम्य लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात बोदवड | प्रतिनिधी बोदवड तालुक्यातील जामठी येथे अल्पवयीन विद्यार्थिनीशी खासगी क्लासच्या शिक्षकाने अश्लील वर्तन केल्याच्या आरोपावरून मोठा तणाव निर्माण झाला. या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर संतप्त नागरिकांनी संशयित शिक्षकाच्या घराकडे धाव घेत त्याची कार पेटवून दिली. त्यानंतर जमाव आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला. काही नागरिकांकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक झाल्याने परिस्थिती चिघळली. अखेर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत तसेच सौम्य लाठीचार्ज करत जमावाला पांगवले. उपलब्ध माहितीनुसार, जामठी येथील एक खासगी शिक्षक बोदवड परिसरात पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणी वर्ग घेत असल्याचे सांगितले जाते. संबंधित शिक्षकावर एका अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केल्याचा तसेच तिच्याकडे अयोग्य मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. घटनेदरम्यान संबंधित शिक्षक विद्यार्थिनीसोबत कारमधून जात असल्याचे तिच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आल्याची माहिती काही वृत्तांतून समोर आली आहे. यानंतर नातेवाईकांनी त्याची विचारणा केली. या प्रकाराची माहिती गावात पसरल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. दरम्यान, संशयित शिक्षकाच्या जामठी येथील घराजवळ नागरिकांचा मोठा जमाव जमला. संतप्त जमावाने त्याच्या कारला आग लावली. काही वाहनांचे नुकसान झाल्याचीही प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांवर दगडफेक; अश्रुधुराचा वापर घटनेची माहिती मिळताच बोदवड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयित शिक्षकाला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणले. मात्र, जमावातील काही नागरिकांनी संशयिताला पोलिसांच्या ताब्यात न देता आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली. यावरून पोलिस आणि जमावामध्ये तणाव निर्माण झाला. काही नागरिकांकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि सौम्य लाठीचार्ज करत जमावाला पांगवले. संशयित शिक्षकावर POCSO अंतर्गत कारवाई अल्पवयीन विद्यार्थिनीशी संबंधित प्रकरण असल्याने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. उपलब्ध वृत्तांनुसार, संशयित शिक्षकाविरोधात POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या प्रकरणातील सर्व आरोपांची नेमकी सत्यता तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जामठी येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. गावात सध्या पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!