माळपिंपरी येथील कृषीदुतांनी मधुरम नर्सरीला दिली भेट. नर्सरी व्यवस्थापनाची माहिती घेतली जाणून.

जामनेर (प्रतिनिधी):- डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील अंतिम वर्षातील कृषिदूत सुशांत जाधव, पवन बुवा , संग्राम पवार आणि सौरभ पाटील यांनी प्राचार्य डॉ. शैलेश तायडे आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम गोणशेटवाड , कार्यक्रम अधिकारी प्रो. व्हि.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मधुरम नर्सरी येथे भेट देऊन गट चर्चा प्रात्यक्षिक राबविले. मधुरम नर्सरीचे संचालक मा.श्री.योगेश पाटील यांनी रोपवाटिका (Nursery) व्यवस्थापन म्हणजे बियाणे, कलमे यांपासून रोपे तयार करणे, त्यांची योग्य निगा राखणे (पाणी, खत, कीटकनाशके), आणि योग्य पद्धतीने विक्री करणे यासाठीचे नियोजन होय. यशस्वी नर्सरीसाठी वनस्पतींची गरज, सिंचन, खत व्यवस्थापन, तापमान नियंत्रण, रोग-कीड नियंत्रण आणि मार्केटिंगचे ज्ञान आवश्यक आहे, ज्यात नियोजनबद्ध काम आणि रोपांविषयीची आवड यांची माहिती जाणून घेतली.

Read More

अखील भारतीय विद्यापीठ कुस्ती वतायकांदो स्पर्धात हरियाणा व ओडिसा राज्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी गरुड महाविद्यालयातील खेळाडूंची निवड

अ. र.भा गरुड कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी येथील कु. गौरी कुमावत (SYBSC ) कू हर्षदा चौधरी TYBsc व कु.लोचाना चौधरी SYBsc यांची निवड कुरुक्षेत्र हरियाणा येथे होणाऱ्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली व कु. गौरी कुमावत हिची निवड तयकांदो स्पर्धेसाठी बालासोर ओडिसा राज्यात होणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड झालीयशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. दादासाहेब संजयराव भास्करराव गरुड, व्हा. चेअरमन मा. आबासाहेब भीमराव शामराव शेळके तसेच संस्थेचे सचिव मा. काकासाहेब सागरमलजी जैन, सहसचिव दादासाहेब यू.यू पाटील सर, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दीपकजी गरुड , सर्व संचालक मंडळ व सर्व संस्था परिवार , महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा. डॉ.संजय भोळे , उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे डॉ.अमर जावळे प्रा.आप्पा महाजन सर क्रीडा संचालक प्रा.डॉ.महेश पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले

Read More

आयटीआय प्रवेशद्वाराबाहेरील कचरा संकलन केंद्र हटवा; अभाविपचा आंदोलनाचा इशारा

जळगाव : प्रतिनिधी शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआयच्या प्रवेशद्वाराबाहेरील कचरा संकलन केंद्र तातडीने हटविण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. आयटीआय परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून, त्यातून दुर्गंधी तसेच डास-माशांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप अभाविपने केला आहे. आयटीआय परिसराच्या आसपास जवळपास सहा महाविद्यालये असून, दररोज हजारो विद्यार्थी या मार्गाने ये-जा करतात. प्रवेशद्वारालगतच कचरा साचत असल्याने विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे अभाविपचे म्हणणे आहे. विशेषतः पावसाळ्यात साचलेल्या कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून साथीचे व संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, अशी चिंता संघटनेने व्यक्त केली आहे. या समस्येबाबत महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा आरोप अभाविपने केला आहे. कचरा संकलन केंद्रामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने दखल घेऊन हे केंद्र अन्यत्र हलवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, मागणीची दखल घेऊन तातडीने कारवाई न झाल्यास उद्या आयटीआयच्या प्रवेशद्वाराबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिला आहे. त्यामुळे आता मनपा प्रशासन या प्रश्नावर कोणती भूमिका घेते, याकडे विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Read More

मोठी अपडेट | अपघातातील ठार झालेल्या तरुणाची ओळख पटली

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी जामनेरबुधवार, २२ एप्रिलजामनेर शहरातील बोदवड रस्त्यावरील नर्सरी जवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेत मृत व्यक्तीची ओळख आता पटली आहे.मृत तरुणाचे नाव विजय शिवाजी इंगळे असे असून, तो नाद्रा हवेली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

जळगाव रेल्वे स्थानकावर शिवाजीनगरकडील नवी तिकीट खिडकी सुरू; प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार

Jamner | प्रतिनिधीजळगाव रेल्वे स्थानकाच्या उत्तर बाजूस, शिवाजीनगरकडील प्रवेशद्वाराजवळ प्रवाशांसाठी नूतनीकृत आरक्षित रेल्वे तिकीट खिडकी सुरू करण्यात आली आहे. गुरुवारपासून ही सुविधा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली असून, त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या मुख्य तिकीट खिडकीवर होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.जळगाव रेल्वे स्थानकावर दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा असते. विशेषतः सकाळी, सुट्टीच्या दिवसांत तसेच सण-उत्सवांच्या काळात तिकीट खिडकीवर मोठी गर्दी होत असल्याने प्रवाशांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागत होते. अनेकदा वेळेअभावी प्रवाशांची गैरसोयही होत होती.ही समस्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगरकडील प्रवेशद्वाराजवळ नवीन तिकीट खिडकीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या खिडकीवर संगणकीकृत पद्धतीने आरक्षित रेल्वे तिकिटांची सुविधा उपलब्ध होणार आहे.गर्दीचे व्यवस्थापन होण्यास मदतनवीन तिकीट खिडकी सुरू झाल्यामुळे स्थानकाच्या मुख्य भागातील तिकीट खिडकीवरील प्रवाशांचा दबाव कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः शिवाजीनगर परिसरातून स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना आता तिकीट काढण्यासाठी स्थानकाच्या मुख्य भागापर्यंत जाण्याची गरज भासणार नाही.प्रवाशांकडून समाधान व्यक्तनवीन सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून तिकीट काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. शिवाजीनगरकडील नागरिक आणि रेल्वे प्रवाशांनी या सुविधेचे स्वागत केले असून, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Read More

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर दक्षता पथकांची होणार स्थापना

मुंबई, : राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करण्यासह शासनाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोगस बांधकाम कामगार आणि दलालांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी व बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नोंदणी, कीट वाटप व अन्य बाबतीत गैरप्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यभरात जिल्हास्तरावर कामगारांची पडताळणी करण्यासाठी दक्षता पथके स्थापन करून प्रभावी तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक विभागात, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालय प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र जिल्हास्तरीय दक्षता पथक गठीत करण्यात येणार आहे. या पथकांचे कार्यक्षेत्र मात्र त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्याऐवजी दुसऱ्या जिल्ह्यावर असेल, जेणेकरून कारवाई अधिक निष्पक्ष आणि प्रभावी राहील. दक्षता पथकांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे होणारी नोंदणी, नोंदणीसाठी पैसे मागण्याचे प्रकार तसेच खोटे दाखले सादर करून मिळविले जाणारे लाभ या बाबींवर लक्ष केंद्रित करून तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. संबंधित दलालांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल. या मोहिमेसाठी क्षेत्रीय कार्यालयांना वाहन भाडेतत्वावर घेण्याची परवानगी देण्यात आली असून, तपासणीसाठी आवश्यक इतर खर्चही प्रशासकीय निधीतून नियमानुसार करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय दक्षता पथक प्रमुखांनी त्यांच्या कारवाईचा सविस्तर अहवाल विभागीय प्रमुखांना सादर करावयाचा आहे. विभागीय प्रमुख सर्व जिल्ह्यांचे अहवाल एकत्र करून आपल्या अभिप्रायासह मंडळ मुख्यालयास सादर करतील.ही विशेष तपासणी मोहीम प्रथम टप्प्यात १० जुलै, २०२५ अखेरपर्यंत राबविली जाणार आहे. या तपासणी दरम्यान ज्यांना काही तक्रारी असतील त्यांना त्या दक्षता पथकाकडे देता येतील. प्रत्येक पथकाने दरमहा किमान एक तपासणी करणे बंधनकारक असून, त्या तपासण्यांचे संकलित अहवाल मंडळास दरमहा सादर करणे आवश्यक राहील. या निर्णयामुळे राज्यातील बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर प्रभावी आळा बसेल, अशी अपेक्षा कामगारमंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे.

Read More

वाघूर उपसा सिंचन योजना – शेतकऱ्यांसाठी जलसंपन्न भविष्य!

जामनेर ( प्रतिनिधी सुपडू जाधव )जामनेर –जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! वाघूर उपसा सिंचन योजना क्र. 1 अंतर्गत 2020 शेततळ्यांच्या निर्मितीचे काम वेगाने सुरू असून, जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या शंका दूर करत आहे. 💬 शेतकरी व ग्रामस्थांशी थेट संवाद!आज अधीक्षक अभियंता श्री. यशवंत भदाणे, तहसीलदार श्री. नानासाहेब आगळे आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी जामनेर तालुक्यातील गावे भेट देऊन शेतकरी व ग्रामस्थांशी चर्चा केली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वती मिळेल आणि शेती अधिक फायदेशीर ठरेल. जलसंवर्धन व जलद शेततळे निर्मितीसाठी जलसंपदा मंत्री ना. श्री. गिरीश महाजन हे आग्रही!या प्रकल्पाची गती वाढवण्यासाठी ना. गिरीश महाजन हे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नियमित आढावा घेत असून, प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. पालकमंत्री ना. श्री. गुलाबराव पाटील यांचे विशेष लक्ष!जिल्ह्यातील शेती सुजलाम सुफलाम व्हावी, यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे देखील प्रकल्पावर लक्ष ठेऊन असून, शेतकऱ्यांना सिंचन सुविधा वेळेत मिळावी यासाठी मार्गदर्शन करत आहेत.

Read More

तोरनाळा येथे महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी

तोरनाळा (ता. जामनेर) | प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील तोरनाळा येथे आज महाराणा प्रतापसिंह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास मंत्री ना. गिरीश महाजन यांचे खंदे समर्थक तथा जळगाव जिल्हाध्यक्ष चंद्रकांत (चंदू भाऊ) बाविस्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह कार्यक्रमाला गणेश भाऊ राजपूत (माजी जिल्हा परिषद सदस्य, बुलढाणा), मयूर भाऊ पाटील (तालुका अध्यक्ष, जामनेर), नवल भाऊ पाटील (माजी सभापती, जामनेर), युवराज भाऊ पाटील (माजी सरपंच, तोरनाळा), विश्वजीत भाऊ (जामनेर), रमेश भाऊ राजपूत (सदस्य, ग्रामपंचायत तोरनाळा), तसेच आरोग्यदूत जालमसिंग भाऊ राजपूत (जामनेर) हे सन्माननीय उपस्थित होते. कार्यक्रमास तोरनाळा व परिसरातील कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराणा प्रतापसिंह यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकत प्रेरणादायी विचार मांडले.

Read More

जामनेर बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांचा दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्रांवर डल्ला..

जामनेर,दि.17. प्रतिनिधी~ जामनेरहून भुसावळ ला जाणाऱ्या बस मध्ये चढणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली असून जामनेर बस स्थानक परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे पोलीस प्रशासनाने नियमित पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांतून केल्या जात आहे.∆सविस्तर वृत्त असे की,आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास जामनेर बस स्थानकात पुणे~भुसावळ बस क्र.MH.20,BL.4020 उभी होती आणि या ठिकाणी जामनेर हून कुऱ्हा(पानाचे) येथे जाण्यासाठी उभ्या असलेल्या जयश्री पाटील व प्रतिभा तायडे या दोन महिला बस मध्ये गर्दीत चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले.चोरी झाल्याचा प्रकार लक्षात येताच या दोन्ही महिलांनी बस मधील प्रवाशांची ड्रायव्हर , कंडक्टर यांना झडती घ्यायला सांगितले.परंतु काहीही मिळून आले नाही.या दोन्ही महिलांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत घडलेला प्रकार सांगितला.दोन्ही महिलांच्या फिर्यादी वरून जामनेर पोलीसात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.राज्य सरकारने महिलांना एस.टी. प्रवास भाड्यात सवलत दिल्याने दिवसा गणिक एस.टी.ने प्रवास करणाऱ्यात महिला प्रवाशांची संख्या वाढत आहे.राज्यातील प्रत्येक बस स्थानका वर बसने प्रवास करणाऱ्या पुरुषां पेक्षा महिलांची अधिक गर्दी पाहायला मिळत आहे.सध्या लग्न सराई चे दिवस असून प्रत्येक बस स्थानकात प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे,या गर्दीचा फायदा घेत चोरीच्या घटना घडत आहेत.जामनेर बस स्थानकावर देखील प्रवाश्यांची दररोज गर्दी पाहायला मिळत आहे.गेल्या काही दिवसां पासून या बस स्थानकावर चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दर दिवसाआड येथे चोरीच्या घटना घडत आहेत.कुणाचा खिसा कापला जातो,तर कुणाची बॅग लंपास तर कुणाच्या गळ्यातील मंगळसूत्र,चैन,कानातील दागिन्यांवर चोरटे बिनधास्त डल्ला मारत असतात.सध्या बाजारपेठेत सोन्याचे दर हे दिवसागणिक गगनाला भिडत असून सर्वसामान्यांना आजघडीला सोने खरेदी करणे अवक्या बाहेरची बाब असतांना चोरट्यांची मात्र या चोरी सत्रामुळे चांगलीच चांदी होत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.काही वर्षांपूर्वी जुने बस स्थानक असताना या बस स्थानक परिसरात होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी स्वतंत्र पोलीस चौकी कार्यरत होती.मात्र नवीन बस स्थानक झाल्या नंतर या ठिकाणी एखादा पोलीस कर्मचारी देखील कार्यरत नसल्याने चोरट्यांचे चांगलेच फावले आहे.चोऱ्यांचे प्रमाण रोखण्यासाठी जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने या बस स्थानकावर नियमित दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून केल्या जात आहे.

Read More

“जामनेर शहराच्या इतिहासात प्रथमच श्री गोगाजी महाराजांच्या पवित्र छडीचे आगमन; भाविकांचा अभूतपूर्व उत्साह”

जामनेर : जामनेर शहराच्या इतिहासात प्रथमच श्री गोगाजी महाराज यांच्या पवित्र छडीचे आगमन झाल्याने शहरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. रामदेव बाबा नगर, भुसावळ रोड येथे आयोजित करण्यात आलेला हा धार्मिक सोहळा मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने उत्साहात संपन्न झाला. नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा धार्मिक सोहळा पार पडला. यावेळी श्री तेजस पाटील, श्री जुतू काका पाटील, श्री अतिष भाऊ झाल्टे ,श्री दिपक भाऊ तायडे यांच्यासह जामनेर शहरातील सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. श्री गुरु गोरखनाथजी व श्री गोगाजी महाराज यांच्या कृपेने आयोजित या सोहळ्यास जामनेर शहरासह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. भाविकांनी श्री गोगाजी महाराजांच्या पवित्र छडीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. पवित्र छडीच्या आगमनामुळे रामदेव बाबा नगर परिसरात धार्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. जामनेरमध्ये प्रथमच असा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आल्याने नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांसह सर्व सहकारी व भाविकांनी मोलाचे योगदान दिले. “जामनेर शहराच्या इतिहासात प्रथमच श्री गोगाजी महाराजांच्या पवित्र छडीचे आगमन” हा सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.

Read More
error: Don't Try To Copy !!