Headlines

खाजगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; राज्य महिला आयोगाने घेतली तात्काळ दखल

बीड (प्रतिनिधी):बीड जिल्ह्यातील एका खाजगी क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन प्राध्यापकांनी विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने संबंधित पोलिसांना तातडीचे निर्देश दिले आहेत. राज्य महिला आयोगाने बीड पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवून, संबंधित क्लासचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ ताब्यात घ्यावे, आरोपींना अटक होईपर्यंत क्लासची इमारत सील करावी, आणि इतर विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडूनही अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास त्याचा संवेदनशीलतेने तपास करावा, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच पीडित मुलीच्या तक्रारीची गंभीरतेने दखल घेऊन तिचे समुपदेशन करण्यात यावे, अशी ही शिफारस आयोगाने केली आहे. आयोगाच्या अध्यक्षा यांच्या निर्देशानुसार हे पत्र पाठवण्यात आले असून, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणी त्वरित कारवाई करून अहवाल आयोगाकडे पाठवण्यास सांगितले आहे. राज्य महिला आयोगाच्या सचिव दुर्गा माळी यांनी पाठवलेल्या या पत्रात, महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील अशा घटनांमध्ये तत्काळ आणि नियमबद्ध कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार करण्यात आले आहे.

Read More

जामनेर आगाराला ५ नवीन बसेस –माननीय जितेंद्र पाटील व तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते लोकार्पण….

*जामनेर आगाराला ५ नवीन बसेस –माननीय जितेंद्र पाटील व तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते लोकार्पण…..जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजामनेर आगाराला मिळाल्या पाच नवीन बसेस कर्मचाऱ्यांनी जल्लोषात केले स्वागत. जामनेर बस आगाराला महाराष्ट्र शासनाकडून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नामुळे पाच नवीन बसेस मिळाल्या असून याचा आनंद व जल्लोष कर्मचाऱ्यांनी मोठा उत्साहात साजरा केला यावेळी नवीन मिळालेल्या बसेसचे लोकार्पण व पूजन जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार डॉक्टर प्रशांत भोंडे अतिश झाल्टे जामनेर बस आगार प्रमुख दिनेश नाईक बस आगार चे अधिकारी गोविंद पवार अमोल सुरवळकर गोपाल वाघ सुनील पाटील ग्रुपसिंग महाजन मोहन जैन जीएम करवंदे अनिल वंजारी गणेश पाटील वैभव पाटील अनिल जैन यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अनेक दिवसापासून जामनेर बस आगारांमध्ये जुन्या गाड्या चालू असून यामुळे मोठा त्रास वाहक व कर्मचाऱ्यांना होत होता त्यामुळे नवीन बसेसची मागणी करण्यात आली होती महाराष्ट्र शासनातर्फे पाच नवीन लाल परी बसेस जामनेर व सागराला मिळाले असून याचा जल्लोष व स्वागत डीजेच्या तालावर नाचत करण्यात आला या नवीन बसेसमुळे जामनेर व सागरातील प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध होणार आहे.

Read More

शेंदुणी येथे गरुड विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

जामनेर तालुक्यातील ‘धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी लिमिटेड’, शेंदुर्णी संचालित आचार्य गजाननराव रघुनाथराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी ता जामनेर जि जळगांव येथील शाळेच्या प्रांगणात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न.कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड होते.प्रमुख वक्ते हर्षल पाटील, संस्थेचे सचिव काकासो सागरमल जैन, संस्थेचे सह सचिव दादासो यु यु पाटील, शेंदुर्णी नगरपंचायत स्विकृत सदस्य बापुसाहेब शांताराम गुजर, माजी उपसभापती (पंस,जामनेर) अण्णासो सुधाकर बारी, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दिपकराव गरुड, लोकमत प्रतिनिधि दिपक जाधव, पुण्यनगरीचे पत्रकार विलास आहेरे, लोकशाहीचे प्रतिनिधि ॲड देवेंद्र पारळकर, माजी उप-मुख्याध्यापक एच डी चौधरी, प्राचार्य आर एस चौधरी, उप-मुख्याध्यापक बी एम कुमावत, पर्यवेक्षक जे एस जुबळे, विनोद पाटील, आदि उपस्थित.कार्यक्रमाची सुरुवात ईश्वस्तवन व स्वागत गिताने तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती, ब्रम्हीभूत हरी प्रसाद महाराज, संस्थेचे विश्वस्त आचार्य गजाननराव गरुड, संस्थेचे प्रेरणास्रोत अण्णासो भास्कराव खंडेराव गरुड आदिंच्या प्रतिमांचे पुजन तसेच माल्यार्पण करून करण्यात आली.सदर प्रसंगी मान्यवरांचे प्रेमवस्त्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य आर एस चौधरी यांनी केले.विद्यार्थी मनोगत खुशी डामरे, अविनाश चव्हाण, अमोल चव्हाण यांनी करत शाळेबदल तसेच शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.शिक्षक मनोगत एल पी मोहणे यांनी व्यक्त केले.सदर प्रसंगी गांधी रिसर्च फाउंडेशन,जळगांव यांच्या वतीने गांधी विचार परीक्षेत जिल्ह्यात यश संपादन केल्याबद्दल सई मराठे, मानसी पाटील या विद्यार्थ्यांनींना पदक व प्रमाणप्रत्र देऊन गौरवण्यात आले.अतिथी मार्गदर्शन काकासाहेब सागरमल जैन यांनी करत मुलांचे मन जिंकून अनेक प्रेरणादायी उदाहणे दिली.प्रमुख वक्ते हर्षल पाटील यांनीही मुलांशी संवाद साधून येणाऱ्या परीक्षेबाबत योग्य मार्गदर्शन करत काॅफी पासून दुर रहा, अपयशाने खचुन जाऊ नका, भाषेमधील साम्यता, कला साहित्य यांच्याशी जोडलेले रहा, जगन तुमचे समृद्ध करा, शब्दांचे सामर्थ्य, बाजारामध्ये चातुर्याने पैसे कसे कमाऊ शकता आदी मुद्द्यांवरही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब संजयरावजी गरुड विद्यार्थी यांनी काॅफी मुक्त परीक्षेला सामोरे जाण्याबाबत, संख्यात्मक वाढीपेक्षा गुणात्मक वाढीला महत्व दिले, अपयशाने खचुन न जाता यशाची पहीली पायरी बनवा पुढे स्पर्धात्मक परीक्षा देण्याबाबत मागदर्शन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रंसचलन पी जी पाटील यांनी केले.शेवटी आभार डी बी पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Read More

जामनेर प्रभारी गट शिक्षण अधिकारी श्री विष्णू काळे यांची तात्काळ बदली करा – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांची शिक्षणाधिकारी यांच्याकडे मागणी

आज 30 जुलै रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने जळगाव जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे उप शिक्षणाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जामनेर येथून रावेर येथे बदली झालेले श्री विष्णू वामन काळे यांच्याकडून जामनेर प्रभारी गट शिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधीक्षक पदाचा पदभार काढून घेणे बाबत निवेदन देण्यात आले.जामनेर येथे कार्यरत असलेले प्रभारी गट शिक्षणाधिकारी तथा शालेय पोषण आहार अधीक्षक श्री विष्णू वामन काळे यांची 13 मे 2025 रोजी जामनेर येथून रावेर येथे पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून बदली करण्यात आली होती मात्र अद्यापही श्री विष्णू काळे यांनी आपला पदभार जामनेर येथून सोडलेला नाही. रावेर येथील पूर्ण वेळ पदाचा कारभार न पाहता जामनेर येथील अतिरिक्त पदभार स्वीकारण्यात इतके स्वारस्य का? असा प्रश्न जामनेर तालुक्यात शिक्षण विभागात चर्चेचा विषय बनला आहे कारण गेल्या 10 ते 12 वर्ष जामनेर तालुक्यात ठाण मांडून बसलेले श्री विष्णू काळे यांच्यावर कुणाचे वरद हस्त आहे. असा सवाल निर्माण होत आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी श्री विष्णू काळे यांची जामनेर गट शिक्षणाधिकारी म्हणून अतिरिक्त पदभार स्वीकारला आहे. मात्र जामनेर तालुक्यात नावीन्य पूर्ण व पात्रता असलेले तीन – तीन कार्यक्षम शिक्षण विस्तार अधिकारी असताना रावेर येथे नुकतीच बदली झालेल्या अधिकाऱ्यांना अतिरिक्त पदभार कोणत्या अनुषंगाने देण्यात आला याबद्दल जामनेर तालुका अनभिज्ञ आहे. तालुक्यातील तिन्ही कार्यक्षम शिक्षण विस्तार अधिकारी हा पदभार स्वीकारण्यास पात्र असताना व संबंधित शिक्षण खात्याचा कारभार पाहण्यासाठी सक्षम शिक्षण विस्तार अधिकारी असताना इतर तालुक्यात बदली करण्यात आलेल्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर ही कृपादृष्टी तालुक्यात चर्चेचा विषय बनलेला आहे. तरी जामनेर येथील विद्यमान प्रभारी गट शिक्षणाधिकारी श्री . विष्णू वामन काळे यांची जामनेर येथून तात्काळ उचल बांगळी करून त्यांना रावेर येथील पदभार देण्यात यावा व जामनेर येथील शिक्षण विस्तार अधिकारी यापैकी एका सक्षम व कार्यक्षम शिक्षण विस्तार अधिकारी यांची अतिरिक्त गट शिक्षण अधिकारी म्हणून नेमणूक करून त्यांचे मनोबल वाढवण्यात यावे . असं न घडल्यास बदली या संकल्पनेवर कर्मचारी व अधिकारी यांचा विश्वास राहणार नाही तो विश्वास उडेल म्हणून आपण ही जिल्हाधिकारी साहेब यांच्या “क” व “ड” श्रेणीतील कर्मचारी बदली प्रक्रियेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कोणताही वशिला व आकस मनात न ठेवता, बदली प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण होणे आवश्यक आहे.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जामनेर तालुका मनसे स्टाईल ने कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांनी दिला आहे. यावेळी मनविसे तालुकाध्यक्ष किशोर पाटील , तालुका उपाध्यक्ष संदीप मराठे , तालुका उपाध्यक्ष आशुतोष पाटील , वाल्मीक कोळी , जगदीश कुरकुरे , रतन देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read More

७० वर्षाची परंपरा जोपासत श्रीराम पेठेत बारागाड्या उत्साहात साजर्‍या.

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर /प्रतिनिधी – आपले सण आपले उत्सव आपणचं साजरे करणार या ब्रिद वाक्याखाली पारंपरिक पद्धतीने सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य बारागाड्या उत्सव शहरातील श्रीराम पेठ भागातील दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत ओढल्या गेल्या स्व. देवचंदबाबा शिंदे यांच्या प्रेरणेने सुरु केलेल्या बारागाड्या उत्सवाला आज सुमारे ७० वर्षाची परंपरा लाभली आहे. सविस्तर माहिती अशी श्रीराम पेठ भागात असलेले श्रीराम पेठ वासियांचे ग्रामदैवत तथा आराध्य दैवत असलेले खंडेराव महाराज यांच्या नावाने या भागात बारागाड्या ओढल्या जातात. या उत्सवास आज ७० वर्षाची परंपरा लाभली आहे सामाजिक एकात्मता हिच श्रीराम पेठ वासियांची ओळख असल्याने हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. सद्ध्या तरी या बारागाड्या उत्सव काठीचा मान हा शिंदे परीवारा कडे असुन श्रीराम पेठ भागातील रहिवाश्यांकडुन तसेच शिंदे परीवारातील सदस्यांनी हा पारंपरिक व पुरातन वारसा कायम ठेवला आहे. दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत या बारागाड्या ओढल्या जातात तर पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने भाविक या उत्स्वात हजारोंच्या संख्येने सहभागी होत सोहळा साजरा करतात तर “खंडेराव महाराज की जय” तर “येळकोट येळकोट जय मल्हार” या घोषणांनी आसमान दणाणून सोडला जातो. आज जरी श्रीराम पेठ भागातील रहिवासी शहराच्या अन्य भागात विखुरलेले असले तरी आजच्या दिवशी लहान पासुन ते वयोवृद्ध व्यक्ती तसेच महिला आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित होतात. आज इंटरनेट युगात सुद्धा हि परंपरा टिकवून ठेवल्याचा आनंद आहे असा विश्वास श्रीराम पेठ भागातील रहिवासी मान्य करतात. त्यामुळे हिच सामाजिक एकता शहरात कुतुहलाचे मुख्य कारण ठरले आहे हा भव्य दिव्य सोहळा मोबाईलच्या कॅमेर्‍यात भाविकांनी कैद केला. खोबरे भंडाऱ्याची उधळण करुन मोठ्या धार्मिक वातावरणात नियोजित भक्तां करवी बारागाड्या ओढल्या जातात तर बारागाड्या ओढल्या नंतर उडीद व भाकर भंडाऱ्याची तथा महाप्रसादाचा लाभ भाविक घेत असतात या महाप्रसाद वाटपासाठी खंडेराव महाराज सेवा समिती कार्यान्वित असते.

Read More

बेटावद खुर्द येथे घरफोडी

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी जामनेरजामनेर : मुलगा दवाखान्याच्या कामासाठी मुंबईला गेल्याने त्याला उपचारासाठी आईने चांदीच्या पाटल्या विकून मिळालेले २० हजार व ५० हजाराचे सोन्याचे दागिने लोखंडी पेटीत ठेवले. मात्र चोरट्यांनी गुरुवारी रात्री घरफोडी करीत ७० हजाराचा मुद्देमाल लांबवल्याची घटना बेटावद खुर्द येथे घडली. राजेंद्र सुपडू पाटील (बेटावद खुर्द, ता. जामनेर) यांचे मोठे भाऊ दवाखान्याच्या कामासाठी मुंबईला गेले होते. २० हजाराची रोकड, २० ग्रॅमची सोन्याची पोत व ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा ऐवज त्यांनी लोखंडी पेटीत ठेवला. खोलीला कुलूप लावून शेजारच्या घरात झोपायला गेले असताना ही चोरी झाली.

Read More

ग्रामीण विकासात आजच्या युवतींची भूमिका मोलाची

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जनविश्वास सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात संजयदादा गरुड यांचे प्रतिपादन शेंदुर्णी येथील आप्पासाहेब रघुनाथराव गरुड महाविद्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संयुक्त आयोजित सजग युवती-सक्षम युवती उपक्रमाच्या व्याख्यान कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजयदादा गरुड यांनी अध्यक्षपदावरून ग्रामीण भागातील रचनेत आणि विकासात युवतींचा सहभाग आणि भूमिका अत्यंत मोलाची आहे असे मत मांडले.युवती केवळ कुटुंबाचा नव्हे,तर ग्रामीण समाजाचा देखील अविभाज्य घटक असल्याने त्यांनी आत्मविश्वासाने आपल्या क्षेत्रात भरारी घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या जनविश्वास सप्ताहामागील विवेचन युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षा कु.भाग्यश्री विवेकानंद ठाकरे यांनी मांडले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नाना पाटील,जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शिंदे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव थोरात,शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे सचिव सागरमल जैन,युवा नेते स्नेहदीप गरुड,नगरसेवक धीरज जैन तसेच जंगीपूरा येथील उपसरपंच मनोज पाटील यांची विशेष उपस्थिती होती. चौकट (1)अत्यंत मौलिक विषयांवर युवतींना मिळाले मार्गदर्शन : या उपक्रमात युवतींसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.ॲड.केतन सोनार यांनी ‘सोशल मीडिया हाताळताना युवतींनी घ्यावयाची काळजी’ या विषयावर दैनंदिन घडामोडी,फेक न्यूज,ऑनलाइन फसवणूक याविषयी सजग राहण्याच्या दृष्टीने सउदाहरण विदयार्थीनींना अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व्याख्यान दिले.ॲड. उमेश मराठे यांनी ‘युवती व कौशल्य विकास कार्यक्रमातून उपलब्ध संधी’ या विषयावर विवेचन करताना कौशल्य विकास म्हणजे केवळ पार्लर किंवा शिवणकाम पुरते मर्यादित नसून, सामाजिक आणि व्यवसायिक क्षेत्रातही युवतींना अनेक संधी असल्याचे असे आपल्या व्याख्यानातून नमूद केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.संजय भोळे, आर.एस. चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन दिनेश थोरात यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य साळुंखे यांनी मानले. चौकट (2) वटवृक्षारोपण व दहा युवतींना रोपांची जबाबदारी : ‘एक झाड माझ्या दादांचं…!’ या उपक्रमांतर्गत राष्ट्रवादी युवती काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दहा विद्यार्थिनींना वटवृक्षाचे रोप भेट देत त्यांच्याकडून जगविण्याचे वचन घेतले. यावेळी संस्थेच्या आवारात अध्यक्ष श्री. संजयदादा गरुड यांच्याहस्ते वटवृक्ष लावण्यात आले तृप्ती बारी,रोहिणी गुजर,नेहा न्हावी, वृषाली पाटील, गायत्री पाटील, कोमल म्हस्के, सानिया गुजर, निकिता पाटील, आरती पाटील आणि योगेश्वरी वाघ या दहा युवतींनी झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.

Read More

वाकडी गरुड विद्यालयात सेवापूर्ती सोहळा संपन्न दिनांक ३० ऑगस्ट२०२५ रोजी अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालय वाकडी येथे विद्यालयाचे पर्यवेक्षक

श्री डी एम गरुड हे दिनांक ३१/०७/२०२५ रोजी नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे.त्यांचा सेवापूर्ती निरोप सोहळा दिनांक ३० ऑगस्ट रोजी संपन्न झाला.या सोहळ्याचे अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव आदरणीय काकासाहेब सागरमल जैन यांनी भूषविले. मा अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवरांचे स्वागत गीताने स्वागत केले. त्यानंतर मा अध्यक्ष उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष काकासाहेब सागरमल जैन,प्रमुख पाहुणे संस्थेचे सहसचिव दादासाहेब यु यु पाटील,श्री राम दादा पवार,प्रा.सुनील गरुड यांचे स्वागत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पी एन पाटील मॅडम यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले.याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर, श्री डी एम गरुड सर यांचे नातलग,मित्रमंडळी व अनेक शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे स्वागत विद्यालयाच्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पी एन पाटील यांनी केले.कार्यक्रमाची रूपरेषा सांगून त्यांनी श्री डी एम गरुड यांच्या यांच्या सेवाकालाविषयी माहिती दिली.सेवापूर्ती निमित्ताने त्यांना पुढील आनंददायी व आरोग्यमय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. इ 10 वी च्या विद्यार्थीनीनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती ए एस पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.सत्कारमूर्ती श्री डी एम गरुड सर यांचा सपत्नीक ह्रदय सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला. कपडे, साडी,भेटवस्तू ,शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ असे सत्काराचे स्वरूप होते.शेंदूर्णी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री संजय भोळे,श्री रामदादा पवार,प्रा.सुनील गरुड यांनी मनोगत व्यक्त करून श्री डी एम गरुड सरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर संस्थेचे सहसचिव दादासाहेब यु यु पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. श्री डी एम गरुड सर यांच्या शैक्षणिक व क्रीडाशिक्षक म्हणून केलेल्या यशस्वी सेवेचा गौरव केला. तसेच संस्थेच्या हितासाठी निवृत्तीनंतर सुद्धा सतत शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात कार्यरत राहावे असे आवाहन केले.त्यांच्या भावी आनंददायी व आरोग्यमय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती श्री डी एम गरुड सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कै. अण्णासाहेबानी आपल्याला कशाप्रकारे सेवेची संधी दिली याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.संस्था परिवार कुटुंब व मित्रपरिवार यांचे मनपूर्वक आभार मानले.आपले प्रेरणास्थान कै अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड यांचा विद्यालयाच्या प्रांगणात पुतळा उभारणी साठी ५१००० रुपये देणगी जाहीर केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष काकासाहेब सागरमल जैन यांनी बहारदार शैलीत अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सरांना भावी आरोग्यमय जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर सर्व नातेवाईक मंडळी,मित्रपरिवार, विविध शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्री डी एम गरुड सरांचा सत्कार केला. या प्रसंगी श्री डी एम गरुड सर यांचे सर्व आप्तस्वकीय नातलग व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री मुरलीधर दादा गरुड,श्री प्रभाकर दादा गरुड,श्री राम दादा पवार(मराठा सेवा संघ),प्रा.सुनीलजी गरुड,प्राचार्य श्री संजय भोळे सर,प्राचार्य श्री आर एस चौधरी सर श्री पी बी पाटील(माजी मुख्याध्यापक) श्री ए ए पटेल सर(माजी मुख्याध्यापक)प्रा.सांळूके सर,श्री व्ही आर पाटील(मुख्याध्यापक) श्री डी एस पाटील सर, श्री मोहन बेलेकर(सरपंच) श्री रहेमानभाऊ बारी,श्रीमती संगीताताई गायकवाड(सरपंच वाकडी) श्री घनश्याम पाटील (पोलीस पाटील) श्री सुनीलभाऊ घुगे,श्री संजय सुर्वे सर, श्री बाळासाहेब गरुड,डॉ देवेन्द्र शेळके,श्री विजयदादा गरुड, श्री संजय पाटील, श्री रमेशदादा गायकवाड, श्री मनोजभाऊ तडवी,श्री संजयभाऊ देशमुख, श्री अभिजित पवार,श्री अशोकदादा देशमुख, श्री अशोक बिडके,श्री रविंद्र माने,श्री शब्बीरभाऊ तडवी,श्री जगनदादा पाटील,श्री सुरेंद्र शेळके(लोहारा) श्री संजयभाऊ दांडगे, श्री तेजराव भाऊ ठोंबरे, श्री विजयदादा सुर्वे,श्री प्रमोदभाऊ गरुड,श्री ज्ञानेश्वरभाऊ घुगे(दैनिक देशदूत) श्री विलासभाऊ जोशी(दैनिक लोकमत) उपस्थित होते. विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. श्री एस वाय चौधरी सर यांनी सूत्रसंचालन केले. श्री एस ए पाटील सर यांनी आभार मानले💐

Read More

मोठी अपडेट | अपघातातील ठार झालेल्या तरुणाची ओळख पटली

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी जामनेरबुधवार, २२ एप्रिलजामनेर शहरातील बोदवड रस्त्यावरील नर्सरी जवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेत मृत व्यक्तीची ओळख आता पटली आहे.मृत तरुणाचे नाव विजय शिवाजी इंगळे असे असून, तो नाद्रा हवेली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

प्रविण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

प्रविण दादा गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कार्यवाहीची मागणी!!संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, बामसेफ यांच्यासह परिवर्तन वादी संघटना कडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !!! शिवतीर्थावर प्रवीण गायकवाड यांच्या प्रतिमेस घातला दुग्धाभिषेक!!! ! जळगाव (प्रतिनीधी)जळगाव जिल्हा संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ बामसेफ यांच्यासह परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांकडून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा.प्रविणदादा गायकवाड यांच्या प्रतिमेस शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाजवळ दुग्धाभिषेक करून प्रविणदादा यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्याच्या आरोपींना अटक करुन या घटनेची सखोल चौकशी करत कठोर कार्यवाही व्हावी या बाबत खालील आशयाचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले रविवार १३ जुलै २०२५ रोजी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. प्रविणदादा गायकवाड यांच्यावर काही गुंड प्रवृतींच्या लोकांनी शाईफेक करून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करत भ्याड हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून हा हल्ला फक्त प्रविणदादा यांच्यावर नसून हा हल्ला या देशातील तमाम शिवराय – फुले – शाहु – आंबेडकर यांच्या समता , बंधुता व न्यायाच्या तत्वांवर चालणाऱ्या विचारवंतांवर असून यापूर्वी देखील या देशात याच मार्गाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा मंत्र देणारे मा.नरेंद्र दाभोळकर , कॉ.गोविंद पानसरे , पत्रकार गौरी लंकेश व ज्येष्ठ विचारवंत एम.एम.कलबुर्गी यांच्या हत्त्या घडवून आणण्यात आल्या आहेत. प्रसारमाध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला दीपक काटे नावाचा गुंड व त्याच्या आठ ते दहा इतर गुंड साथीदारांनी मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु स्थानिक पोलिसांनी या आरोपींना अटक न करता सोडून दिले आहे. तरी महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने या प्रकरणात बारकाईने लक्ष देत या हल्ल्यातील सर्व आरोपी व त्यांच्या मागे असणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अन्यथा याच पद्धतीने विचारवंतांना संपवण्याचे प्रयत्न सुरु राहिल्यास महात्मा गांधीच्या अहिंसेच्या विचारांवर चालणाऱ्या भारत देशाची प्रतिमा जगात मलीन होऊन हा देश अराजकतेच्या मार्गावर जाण्यास वेळ लागणार नाही. यावेळी संभाजी ब्रिगेड सामाजिक चे प्रदेश संघटक श्याम पाटील , जिल्हाध्यक्ष तुषार सांवत , संभाजी ब्रिगेड राजकीय चे जळगाव पुर्व जिल्हा प्रदिप गायके, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष विजय पाटिल शहर कार्याध्यक्ष मयूर चौधरी , लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे , बामसेफचे मुकुंद सपकाळे , मराठा सेवा संघाचे सुरेश पाटील , सुरेंद्र पाटील , राम पवार , शोभाराम प्रतिष्ठाचे नरेंद्र पाटील , अनिरुद्ध शिसोदे , शुभम पवार , गणेश पाटील,कल्पेश पाटील, भरत पाटील, अविनाश पाटील ,संदीप मांडोळे, सतीश लाठी, राकेश राजपूत, राकेश जैन, संदीप पाटील,रवींद्र पाटील, धवल पाटील,प्रमोद पाटील,राहुल पाटील,संजय चव्हाण,सुमित्र अहिरे, देवानंद निकम,रवींद्र तायडे,देशमुख साहेब यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

Read More
error: Don't Try To Copy !!