यावलमध्ये सागवान लाकडावर वनविभागाची धडक कारवाई; सात नग जप्त

यावल : शहरालगतच्या खडकाई नदीपात्र परिसरात प्रोसोपिस बाभळीच्या झुडपांमध्ये लपवून ठेवण्यात आलेले सागवान लाकूड वनविभागाच्या पथकाने कारवाई करून जप्त केले. या कारवाईत सागवानाचे सात नग आढळून आले.वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.२० वाजता गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने खडकाई नदीपात्र परिसरात पाहणी केली. यावेळी बाभळीच्या झुडपांमध्ये लपवून ठेवलेले सागवान लाकूड निदर्शनास आले.पंचांच्या उपस्थितीत केलेल्या पाहणीत सागवानाचे ७ नग, एकूण ०.१९२ घनमीटर घनफळाचे लाकूड आढळून आले. त्याची अंदाजे नुकसान किंमत ३,६३३ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.वनविभागाने पंचनामा करून सदर सागवान कटसाईजचा माल जप्त केला. जप्त केलेला माल शासकीय वाहनाद्वारे मुख्य विक्री केंद्र, यावल येथे ताबा पावतीद्वारे जमा करण्यात आला.या प्रकरणी वनगुन्हा क्र. १९/२०२६, दिनांक ०३/०९/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली असून, पुढील आवश्यक पंचनामा व जबाब नोंदविण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.

Read More

पाळधी बायपासवर भीषण अपघात; कंटेनर पलटी, दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू

जळगाव : पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावर बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरचा अचानक ताबा सुटल्याने कंटेनर रस्त्यावर पलटी झाला. याचवेळी दुचाकीवरून जाणारा दोनगाव बुद्रुक येथील एक तरुण कंटेनरखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर पाळधी बायपासमार्गे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. काही क्षणांतच कंटेनर रस्त्यावर पलटी झाला. त्याचवेळी दुचाकीवरून जाणारा तरुण कंटेनरच्या खाली आल्याने हा भीषण अपघात घडला. अपघातात दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे बायपास मार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. कंटेनरचा ताबा नेमका कोणत्या कारणामुळे सुटला, तसेच अपघातामागे इतर कोणते कारण होते का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या दुर्दैवी घटनेत तरुणाचा मृत्यू झाल्याने दोनगाव बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. टीप : मृत तरुणाचे नाव अधिकृतरीत्या उपलब्ध नसल्याने ते नमूद केलेले नाही.

Read More

आप्पासाहेब र.भा.गरूड महाविद्यालयाच्या प्रांगणात संस्थेची सहविचार सभा संपन्न

धी.शेंदुर्णी से.एज्यु.को-ऑप सोसायटी संचलित, आप्पासाहेब र.भा.गरुड महाविद्यालयाच्या प्रांगणात संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी संचालक यांच्या उपस्थितीत शिक्षक,शिक्षकेतर सहविचार सभा पार पडली याप्रसंगी संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड,उपाध्यक्ष आबासाहेब भीमराव शेळके,सचिव काकासो.सागरमलजी जैन,सहसचिव दादासो यु यु पाटील, ज्येष्ठ संचालक बापूसो भीमराव पाटील,संचालक डॉ.राजेंद्रजी शेळके,कार्यालयीन सचिव भाऊसो दीपकजी गरुड,संस्थेचे वस्तीगृह सचिव गो गो सूर्यवंशी,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य/मुख्याध्यापक,आर एस चौधरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजयजी भोळे,प्रा.डॉ.श्याम साळुंखे, पर्यवेक्षक व्ही.एम.शिरपुरे,विनोद पाटील तसेच सर्व शाखांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत सहविचार सभेप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे चेअरमन संजय दादा गरुड यांनी भूषविले सर्वप्रथम प्रतिमापूजन व माल्यार्पण नंतर प्रास्ताविक आर एस.चौधरी यांनी केले नंतर एस एस सी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या संस्थेतील सर्व शाळांच्या,मुख्याध्यापकांचा व, शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. मान्यवरांच्या मनोगतात संस्थेचे सहसचिव यु यु पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांना संबोधित करत विविध प्रकारच्या शालेय कामकाजाबद्दल व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर त्यांच्या क्षमता वृंदिगत व्हाव्यात व विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आनंददायी अशा नाविन्यपूर्ण शैक्षणिक वाटचालीतून स्वयंपूर्णता विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.तद्नंतर सचिव सागरमलजी जैन यांनी शिक्षक आदर्श असून त्यांनी समाजापुढे व आपल्या विद्यार्थ्यांपुढे एक आदर्श निर्माण करावा असे विचार मांडले.अध्यक्षीय भाषणात संजय दादा गरुड यांनी आदेश वजा सूचनेच्या माध्यमातून मुख्याध्यापक व भाऊसाहेब यांनी स्वतःअपडेट राहून नवीन गोष्टींचा स्वीकार करावा तसेच कुठल्याही प्रकारची नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करून आपले जे टेक्नोसेवी काम असतील ते आपण स्वतः करावेत अशा सूचना केल्या.त्याबरोबर सर्व कर्मचाऱ्यांना आश्वासित करून नवीन शैक्षणिक धोरणाला तोंड देण्यासाठी सज्ज राहुन प्रत्येक शिक्षकाने बदल स्वीकारून स्वतःमध्ये व आपल्या विद्यार्थ्यांमध्ये बदल घडून आणावा अशा अपेक्षा व्यक्त करत नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक पी जी पाटील यांनी केले व आभार पर्यवेक्षक व्ही.एम.शिरपुरे यांनी मानले.

Read More

1)पाण्यात पोहण्यासाठी उतरले अन् काळाने घातला घाला; रेतीबंदर खाडीत तिघांचा दुर्दैवी मृत्यू 2)तानसा नदीत दोन सख्ख्या भावांचा अंतदुसरी हृदयद्रावक घटना भिवंडी तालुक्यातील अकलोली येथे घडली.

ठाणे | प्रतिनिधीठाणे जिल्ह्यात पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या रेतीबंदर खाडी परिसरात रविवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. पोहण्यासाठी खाडीत उतरलेल्या तिघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आलम सय्यद (४२), रिझवान सय्यद (४२) आणि साहिल पोलंदास (३०) हे तिघे मुंब्रा येथील ठाकूरपाडा परिसरातील रहिवासी होते. रविवारी दुपारच्या सुमारास ते रेतीबंदर परिसरातील गणेश विसर्जन घाटाजवळ गेले होते. यावेळी तिघेही खाडीत पोहण्यासाठी उतरले.मात्र खाडीतील पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळवण्यात आले. पथकाने घटनास्थळी धाव घेत तातडीने शोधमोहीम सुरू केली.सुमारे तासभराच्या अथक प्रयत्नांनंतर तिघांना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पावसाळ्यात नदी, खाडी, धरणे आणि तलावांमध्ये पाण्याची पातळी वाढलेली असते. त्यामुळे नागरिकांनी अशा ठिकाणी पोहण्यासाठी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Read More

जळगाव हादरले! ममुराबाद रोडवर कावड यात्रेत भरधाव ट्रक घुसला; चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव हादरले! ममुराबाद रोडवर कावड यात्रेत भरधाव ट्रक घुसला; चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू जळगाव | २४ ऑगस्ट २०२६ जळगाव-ममुराबाद रोडवर सोमवारी सायंकाळी कावड यात्रेदरम्यान भीषण अपघात घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. कावड यात्रेत सहभागी असलेल्या एका चिमुकल्याला भरधाव आयशर ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर संतप्त नागरिक आणि कावड यात्रेतील भाविकांनी तीव्र आक्रोश व्यक्त करत संबंधित वाहनाला आग लावल्याचे वृत्त आहे. नेमके काय घडले? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिपेठ परिसरातील गवळीवाड्यातून कावड यात्रा ममुराबाद रोडवरील म्हाळसादेवी मंदिराच्या दिशेने गेली होती. यात्रा आटोपल्यानंतर भाविक परतत असताना जळगावहून चोपड्याकडे जाणाऱ्या आयशर वाहनाची एका चिमुकल्याला धडक बसली. स्थानिक वृत्तानुसार वाहन क्रमांक MH-20-EG-3593 असल्याचे नमूद करण्यात आले आहे. धडकेनंतर चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात आली. अपघातानंतर संतापाचा उद्रेक घटनेची माहिती मिळताच मृत मुलाच्या नातेवाईकांसह मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने वाहन पेटवून दिल्याचे विविध वृत्तांतून समोर आले आहे. काही वृत्तांनुसार परिस्थिती काही काळ अत्यंत तणावपूर्ण बनली होती. घटनेनंतर ममुराबाद रोडवर वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आणि वाहनांच्या रांगा लागल्याचेही वृत्त आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आल्याचे वृत्त आहे. काही वृत्तांनुसार, अपघातातील चालकाला दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास सुरू या दुर्घटनेमागील नेमके कारण, ट्रकचा वेग आणि चालकाची परिस्थिती याबाबत अधिकृत तपास सुरू आहे. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. ही बातमी सध्या प्राथमिक माहितीनुसार असून, पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर मृत मुलाचे अचूक वय, अपघाताचे नेमके कारण आणि पुढील कारवाईबाबत अधिक माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे: उपलब्ध वृत्तांमध्ये मुलाच्या वयाबाबत विसंगती आहे—काही वृत्तांत ८ वर्षे, तर स्थानिक वृत्तात १० वर्षे असे नमूद आहे. त्यामुळे अधिकृत पुष्टी होईपर्यंत वय निश्चित मानू नये.

Read More

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांची धडक कारवाई

हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई; ११ अजामीनपात्र वॉरंट तामील पाचोरा : आगामी गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावा तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पाचोरा पोलिसांनी सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी पहाटे ३ ते सकाळी ६.३० वाजेपर्यंत पाचोरा शहर तसेच ग्रामीण हद्दीत व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ५ पोलीस अधिकारी, २५ पोलीस अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाचा सहभाग होता. या कारवाईदरम्यान पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, शरीर व मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल असलेले आरोपी तसेच अवैध धंद्यांशी संबंधित संशयितांच्या ठिकाणी अचानक तपासणी व झडती घेण्यात आली. ५५ रेकॉर्डवरील आरोपींवर कारवाई कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी अभिलेखावरील एकूण ५५ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य अथवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारी कृती करू नये, याबाबत त्यांना कडक समज देण्यात आली. हद्दपार गुन्हेगारावर गुन्हा दाखल पाचोरा शहरातून हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार मुख्तार शेख उर्फ धाड्या हा पोलिसांना हद्दीत आढळून आला. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली. ११ अजामीनपात्र वॉरंट तामील न्यायालयात प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांतील ११ अजामीनपात्र वॉरंट (NBW) पोलिसांनी यशस्वीरीत्या तामील केले. त्यामुळे प्रलंबित आरोपींवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अवैध दारू विक्रीवर धाड पोलिसांनी प्रोहिबिशन रेड अंतर्गत अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्धही कारवाई केली. या कारवाईत २२ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोवंश वाहतूक व बेकायदेशीर शस्त्राविरुद्धही कारवाई मोहिमेदरम्यान अवैध गोवंश वाहतुकीप्रकरणी एक कारवाई, तर आर्म्स ॲक्टअंतर्गत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी एक कारवाई करण्यात आली. पोलिसांचा स्पष्ट इशारा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या, कायदा हातात घेणाऱ्या तसेच अवैध धंदे चालविणाऱ्या असामाजिक घटकांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पाचोरा पोलिसांकडून देण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात अशाच प्रकारे धडक तपासणी, कॉम्बिंग ऑपरेशन आणि पोलिसांचे पेट्रोलिंग यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Read More

जामनेर तालुक्यातील १०७ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत तारीख जाहीर.कोणाचे उघडणार नशीब,तर कोणाचे खेळ बिघडणार.

जामनेर तालुक्यातील आगामी काळातील ग्रामपंचायतीच्या १०७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तारीख जाहीर करण्यात आली आहे. यामधे जामनेर तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत २१ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजता सोडत जाहीर करण्यात येणार आहे. यामधे खालील प्रमाणे जागा सोडत होणार आहे.अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे-१०, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-१५, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-२८, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-५४, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-५, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- ८, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- १४, सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-२७ – एकूण अ बकड – ५४. याप्रकारे सोडत निघणार आहे.

Read More

एकनाथराव खडसे यांचा अमृतमहोत्सव

: जाणकार यांचे सध्या काय चाललंय? : खडसे यांच्या अमृत महोत्सवाला भाजप किंवा महायुतीचा एकही मोठा नेता उपस्थित नाही पंकजा मुंडे यांचाही दौरा अचानक रद्द भाजपसह महायुतीचे नेते अनुपस्थित राहिले ? मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस लक्ष्मण हाके ओबीसींनी आता एकत्र येण्याची वेळ जरांगे यांच्यामागे ग्रामीण जनतेचे संघटन आहे. ओबीसी समाज खूप मोठा आहे, परंतु आपल्यात अद्याप तशी एकजूट आणि संघटनात्मक बांधणी दिसत नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन संघटन मजबूत करणे गरजेचे आहे. सरकार आणि जरांगे यांच्यातील संवाद कमी पडतेय का? 8

Read More

जामनेर शहरात पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांचे पेट्रोलिंग

व्यापारी व नागरिकांशी साधला थेट संवाद; कायदा-सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेचा घेतला आढावा जामनेर | प्रतिनिधी : जामनेर पोलीस ठाण्याचा नव्याने पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांनी गुरुवारी शहरातील विविध भागांत प्रत्यक्ष पेट्रोलिंग करत व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधला. शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा त्यांनी आढावा घेतला. पेट्रोलिंगदरम्यान पोलीस निरीक्षक बोऱ्हाडे यांनी शहरातील प्रमुख भागांना भेट देत व्यापारी व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. संशयास्पद व्यक्ती, हालचाल किंवा कोणतीही अनुचित घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असेही पोलीस निरीक्षक बोऱ्हाडे यांनी सांगितले. पेट्रोलिंगदरम्यान मंत्री गिरीश महाजन यांची भेट दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे या मार्गावरून जात असताना पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याठिकाणी थांबून पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्याशी संवाद साधला. यावेळी शहरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या सुरक्षेसह विविध विषयांवर चर्चा झाली. मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित नागरिकांशीही संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जामनेर शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या पेट्रोलिंगचे महत्त्व असून, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रत्यक्ष पेट्रोलिंगमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्यास मदत होणार असून, नागरिकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.

Read More

शहरातील सोंनबर्डी येथे स्विमिंग पुलात बुडून पंधरा वर्षीय बालकाचा मृत्यू.

जामनेर शहरातून एक दुदैवी घटना समोर आली आहे. प्रसिद्ध सोनबर्डी येथील स्विमिंग पुलाच्या पाण्यात एका पंधरा वर्षे मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळतात जामनेर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. संकेत निवृत्ती पाटील 15 वर्ष राहणार घोसला,त.सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजी नगर, हल्ली राहणार हिवरेखेडा रोड, ता.जामनेर असं मयत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर येथील प्रसिद्ध सोनबर्डी येथे बॅक वॉटर बघण्यासाठी संकेत पाटील हा आपल्या मित्रांन सोबत आला होता. मात्र अचानक त्याचा पाण्यात तोल गेला आणि तो पाण्यात बुडाला. संकेत बुडाल्याची माहिती तात्काळ स्थानिकांनी पोलिसांना दिली त्यानंतर लागलीच त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. जि एम फाऊंडेशन च्या रुग्णवाहिकेवरील चालक जालमसिंग राजपूत आणि अजून एक तरुणाने संकेतला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न केले. मात्र काही वेळा नंतर संकेतचा मृतदेह मिळून आला. संकेत निवृत्ती गावंडे ( पाटील ) हा जामनेर येथील शाळेमध्ये इयत्ता आठवीत शिकत होता. तो आपल्या लहान भाऊ आणि आजी सोबत जामनेर येथे वास्तव्यास होता. संकेत पाटील हा आज शाळा बुडवून पोहण्यासाठी सोनबर्डी येथील स्विमिंग पूल वर गेला होता गेल्या दोन वर्षापासून बंद असलेल्या स्विमिंग पूलमध्ये नुकतच पाणी भरण्यात आलं होतं. स्विमिंग पूल चालू करण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू होते. त्यासाठी स्विंगपूलाची डागडूची आणि इतर काम पूर्ण करण्यावर नगरपालिका प्रशासन जोर देत होतं. मात्र आज अचानक संकेत पाटील आपल्या काही मित्रांसोबत स्विमिंग पूल येथे आला होता. या स्विमिंग पूल मध्ये मुलांना अडवण्यासाठी तिथे कोणीच सुरक्षा रक्षक किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते. अशातच संकेत पाटील हा आपल्या मित्रांसोबत या स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी उतरला होता. मात्र हाच पोहण्याचा मोह संकेत पाटील च्या जीवावर बेतला आणि स्विमिंग पूल मधील पाण्यात तो बुडाला. स्विमिंग पूलाची डागडूजी करण्यात येत असल्याने तिथे पाणी भरण्यात आल्याची माहिती जामनेर नगर परिषदेचे सीईओ बागुल यांनी दिली आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!