Headlines

धुळे | आक्षेपार्ह स्टेटसवरून दोन गटांत वाद; दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी

धुळे : धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा परिसरात आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील स्टेटसच्या कारणावरून दोन गट आमनेसामने आले. वाद वाढल्यानंतर दोन्ही बाजूंनी दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती कारवाई सुरू आहे. सोशल मीडियावरील अफवा किंवा आक्षेपार्ह पोस्टमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.या प्रकरणात नेमके किती जण जखमी झाले आणि किती जणांवर कारवाई झाली, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

Read More

नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी रंगकर्मींनी घेतली आयुक्तांची भेट

बालगंधर्व खुले नाट्यगृहाची तातडीने दुरुस्ती करा; रंगकर्मींनी आयुक्तांना दिले निवेदन कलावंतांसाठी महत्त्वाच्या नाट्यगृहाची दुरवस्था; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष जालगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातील कलावंत आणि रंगकर्मींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या बालगंधर्व खुले नाट्यगृहाची सध्या दुरवस्था झाली आहे. नाट्यगृहाची देखभाल आणि आवश्यक दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी आता रंगकर्मींनी केली आहे.यासंदर्भात रंगकर्मींनी जळगाव महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. नाट्यगृहाची सद्यस्थिती पाहता कलावंत आणि प्रेक्षकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे रंगकर्मींनी निवेदनातून निदर्शनास आणून दिले.बालगंधर्व खुले नाट्यगृह हे जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र असल्याने त्याची तातडीने दुरुस्ती आणि आवश्यक सुविधांची पूर्तता करावी, अशी मागणी रंगकर्मींनी केली आहे. आता महापालिका प्रशासनाकडून याबाबत काय कार्यवाही केली जाते, याकडे रंगकर्मी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Read More

पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही!

आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारा जळगांव | प्रतिनिधीपोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही!आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना कडक इशारापुणे | प्रतिनिधीअंगणवाडीतील बालके आणि गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आता प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. पोषण आहारात कोणत्याही प्रकारची गडबड, निष्काळजीपणा किंवा निकृष्ट दर्जाचा आहार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडीतील पोषण आहारासंदर्भातील प्रकार समोर आल्यानंतर पुणे जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये उपलब्ध धान्य तसेच शिजवला जाणारा पोषण आहार तपासण्यात येणार आहे.आहाराची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अधिनस्त मुख्यसेविका आणि पर्यवेक्षिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तपासणीमध्ये पोषण आहार खराब किंवा अयोग्य दर्जाचा आढळल्यास तो संबंधित पुरवठादाराकडून तात्काळ बदलून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. तसेच पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.बालकांच्या पोषण आणि आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आदिती तटकरे यांनी दिल्याने अंगणवाडी प्रशासन आणि संबंधित पुरवठादारांमध्ये आता सतर्कता वाढली आहे. अंगणवाडीतील बालके आणि गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत आता प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. पोषण आहारात कोणत्याही प्रकारची गडबड, निष्काळजीपणा किंवा निकृष्ट दर्जाचा आहार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडीतील पोषण आहारासंदर्भातील प्रकार समोर आल्यानंतर पुणे जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये उपलब्ध धान्य तसेच शिजवला जाणारा पोषण आहार तपासण्यात येणार आहे. आहाराची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या अधिनस्त मुख्यसेविका आणि पर्यवेक्षिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणीमध्ये पोषण आहार खराब किंवा अयोग्य दर्जाचा आढळल्यास तो संबंधित पुरवठादाराकडून तात्काळ बदलून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. तसेच पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बालकांच्या पोषण आणि आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आदिती तटकरे यांनी दिल्याने अंगणवाडी प्रशासन आणि संबंधित पुरवठादारांमध्ये आता सतर्कता वाढली आहे.

Read More

कायदा-सुव्यवस्थेसाठी कटिबद्ध… जामनेर पोलीस स्टेशनला उपनिरीक्षक किशोर पाटील यांची नियुक्ती

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजामनेर: जामनेर शहराच्या सुरक्षेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, किशोर पाटील यांची जामनेर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या आगमनामुळे शहरातील नागरिकांमध्ये नवीन विश्वास निर्माण झाला असून, कायद्याच्या अंमलबजावणीला अधिक बळकटी मिळणार आहे किशोर पाटील यांनी जामनेर शहराच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. पोलिस आणि नागरिक यांच्यात समन्वय वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.संवादादरम्यान, उपनिरीक्षक पाटील यांनी जामनेरमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील असे स्पष्ट केले. बेकायदेशीर कृत्यांवर त्वरित कारवाई केली जाईल, तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील.नवनियुक्त उपनिरीक्षक पाटील यांची नियुक्ती झाल्यापासून स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्व स्तरांतून त्यांचे स्वागत होत असून, शहराच्या सुरक्षेसाठी त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.जामनेरच्या विकासात आणि सुरक्षिततेच्या दिशेने ही एक मोठी पावले उचलली गेली असून, उपनिरीक्षक किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जामनेर पोलिसांकडून प्रभावी कार्यवाही अपेक्षित आहे.

Read More

प्रेम आणि माझा दृष्टिकोन

✍️ विशेष लेख आयुष्य जगत असताना एकदा तरी आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो. प्रेमात पडल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर अनेकदा फक्त ती व्यक्ती असते. त्या वेळी तिची जात, धर्म, वय, पंथ यांचा विचार मनात येत नाही. कारण खरं प्रेम हे जात-धर्म पाहून होत नाही; ते फक्त मन पाहून होतं. म्हणूनच या पवित्र भावनेचा आदर राखणं आवश्यक आहे. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि आपल्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करतात, तो क्षण खरोखरच सुंदर असतो. मुळात प्रेम म्हणजे काय? तर प्रेम म्हणजे समाधान. या जगात कोणीतरी आपलं आहे, कोणीतरी आपल्याला मनापासून समजून घेतं आणि आपल्यावर प्रेम करतं, ही जाणीवच मनाला मोठा आनंद देऊन जाते. तो आनंद, ते समाधान म्हणजेच प्रेम. भगवान श्रीकृष्णांच्या विचारांचा आधार घेतला तर प्रेम हे मिळवण्यासाठी किंवा गमावण्यासाठी नसून ते जगण्यासाठी आहे, अशी सुंदर भावना त्यातून व्यक्त होते. प्रेम हा आयुष्यातील एक सुंदर अनुभव आहे. मात्र प्रत्येक प्रेमकहाणीचा शेवट विवाहातच होईल असं नाही. ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे, तिच्यासोबत आपलं लग्न होईलच याची खात्री नसते. काही वेळा परिस्थिती, कुटुंब, सामाजिक बंधने किंवा इतर कारणांमुळे दोन व्यक्तींना एकत्र येणं शक्य होत नाही. अशा वेळी योग्य ती तडजोड स्वीकारण्याची मानसिकता असणंही गरजेचं आहे. लग्न होणार नाही म्हणून प्रेम करणं सोडून देणं, हे त्या भावनेचा अपमान करण्यासारखं आहे. प्रेमाचा अर्थ केवळ लग्न किंवा शारीरिक सुख नसून एकमेकांच्या भावनांचा आदर, विश्वास, जिव्हाळा आणि काळजी हा आहे. त्यामुळे जोपर्यंत एखादं नातं आपल्या आयुष्यात आहे, तोपर्यंत ते मनापासून जपण्याचा प्रयत्न करायला हवा. परिस्थिती कठीण झाली तर परिस्थितीशी तडजोड करायला शिकणं आवश्यक आहे. कारण माणसाचं आयुष्यच असं आहे की अनेक गोष्टी स्वीकारल्याशिवाय आणि काही वेळा तडजोड केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. प्रेम मिळालं नाही म्हणून आयुष्यातील आनंद संपतो, असं अजिबात नाही. ज्या व्यक्तीवर कधीतरी मनापासून प्रेम केलं, त्या व्यक्तीच्या चांगल्या आठवणी आयुष्यभर मनात जपून ठेवता येतात. तिच्यासोबत लग्न झालं किंवा नाही झालं, तरी त्या व्यक्तीबद्दल मनात आदर ठेवता येतो. एखाद्या व्यक्तीसोबत लग्न होईल या एकाच आशेने प्रेम करू नका. प्रेम करताना समोरच्या व्यक्तीला मिळवण्यापेक्षा तिला समजून घेणं आणि तिच्या भावनांचा आदर करणं अधिक महत्त्वाचं आहे. आपल्या समाजात विवाह हा अनेकदा कुटुंबाच्या संमतीने आणि परिस्थितीचा विचार करून ठरतो. त्यामुळे प्रेमविवाहाला विरोध असो किंवा परिस्थितीमुळे आलेले अडथळे असोत, प्रेम करणाऱ्या व्यक्तीने वास्तव स्वीकारण्याची ताकदही ठेवायला हवी. ज्याच्यावर प्रेम आहे, त्याच्यासोबत लग्न झालं तर ते नक्कीच सर्वोत्तम असेल आणि त्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत. पण ते शक्य झालं नाही, तर समोर येणाऱ्या परिस्थितीला धैर्याने सामोरं जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. प्रेम टिकवण्यासाठी आयुष्यभर एक गोष्ट जपली तरी ती पुरेशी आहे—त्या व्यक्तीचा मनापासून आदर. प्रेमाबद्दल लिहिण्यासारखं खूप काही आहे. प्रत्येकाच्या प्रेमाची कहाणी वेगळी असते, प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात. मात्र प्रेमाचं खरं सौंदर्य हे कोणाला मिळवण्यात नाही, तर एखाद्या व्यक्तीच्या मनात आपल्यासाठी असलेल्या भावनेचा आदर करण्यात आहे. प्रेम करा, प्रेम जगा आणि प्रेमाचा आदर करा…! 💞

Read More

22 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधीजामनेर तालुक्यातील चिंचखेडा (तपोवन) येथील एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत तरुणाचे नाव शेखर श्रीराम पाटील (वय २२) असे आहे. तो बी.एस्सी. शिक्षण पूर्ण करून शेती करत होता. आज सकाळी शेखर शेतात गेला, परंतु काही वेळाने त्याने शेतातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ पोलिसांना याची खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उपविभागीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. शेखरच्या कुटुंबात आई-वडील आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. अभ्यासू आणि शांत स्वभावाचा म्हणून तो ओळखला जात होता. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. जामनेर पोलिस ठाण्याचे पथक पुढील तपास करीत आहे.

Read More

जळगाव जिल्हा ठरतोय सक्षम भागीदार$1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा प्रकल्प व कार्यक्रम व्यवस्थापन युनिट (DPPMU) मार्फत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. महाराष्ट्राच्या $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या ध्येयपूर्तीसाठी जिल्हा जळगावातील यंत्रणांच्या कामगिरीचा सखोल आढावा या बैठकीत घेण्यात आला. आजच्या बैठकीतील प्रमुख मुद्दे:• कृषी, आरोग्य, पर्यटन, वैद्यकीय सुविधा, उद्योग, वीज, जलव्यवस्थापन, शिक्षण आदी १६ क्षेत्रांतील प्रगतीचा तालुका स्तरावर आढावा.• जिल्हास्तरावर संस्थात्मक बांधणी (Institution Building) आणि गुणवत्तापूर्ण सेवा केंद्रांची निर्मिती या दिशेने मार्गदर्शन.• विभागीय समन्वय वाढवणे, कामांच्या वेळेत पूर्ततेसाठी नियोजन, व संकल्पनांची अंमलबजावणी यावर भर.• डेटा आधारित धोरणनिर्मितीसाठी विश्लेषण व प्रगती निर्देशांक तयार करण्याचे निर्देश. महत्त्वाच्या आगामी बैठका:• District Innovation Council ची बैठक – नाविन्यपूर्ण उपक्रमांची निवड व प्रोत्साहन.• Skill & Employment Conclave – कौशल्य विकास संस्था, उद्योग व तरुण यांच्यात समन्वय.• Export Branding Workshop – जळगावातील केळी, सोने, कापूस, प्लास्टिक यांचा आंतरराष्ट्रीय ब्रँडिंगसाठी विशेष योजना.• Infrastructure Taskforce बैठक – वीज, पाणी, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, वाहतूक व पायाभूत सुविधा या क्षेत्रांवर लक्ष. प्रगतिपथावर असलेले महत्त्वाचे उपक्रम:• जळगाव वैद्यकीय हब – आरोग्य सेवांमध्ये खाजगी गुंतवणूक व तांत्रिक पायाभूत सुविधा निर्माण.• केळी क्लस्टरचा विकास – निर्यातक्षम व प्रक्रिया आधारित सुविधा उभारणी.• पशुसंवर्धन क्लिनिक आणि डायल 1962 सेवा – पशु वैद्यकीय आपत्कालीन सेवा अधिक प्रभावी करणे.• MSME व SHG सक्षमीकरण – वित्त, प्रशिक्षण, मार्केट लिंक यामध्ये सहकार्य.• पर्यटन विकास – सापुतडा डोंगररांगा, धार्मिक व सांस्कृतिक स्थळांचा विकास.• शाश्वत शेती व जल व्यवस्थापन – सूक्ष्म सिंचन, जलसंधारण, आणि नवा जल व्यवस्थापन मॉडेल. 📊 DPPMU (District Project & Program Monitoring Unit) मार्फत या सर्व योजनांचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. यातूनच “Vision to Action” चा खरा अर्थ पूर्णत्वास जातो आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक, संस्था, उद्योजक आणि तरुणांनी या परिवर्तनामध्ये आपली भूमिका बजावावी. तुमचे कल्पक विचार, सहकार्य आणि पुढाकारच जिल्ह्याला राज्यात आदर्श बनवतील.

Read More

तरुणावर चाकू हल्ला; हल्लेखोराला जामनेर पोलिसांनी घेतले ताब्यात

घटनेनंतर जामनेर पोलीस स्टेशनबाहेर नागरिकांची मोठी गर्दी; गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न जामनेर | प्रतिनिधी जामनेर शहरात एका तरुणावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्याने शहरात काही काळ खळबळ उडाली. हल्ल्याची माहिती मिळताच संबंधित तरुणाचे नातेवाईक, मित्र तसेच स्थानिक नागरिकांनी जामनेर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी तसेच पोलीस ठाण्याच्या परिसरात बंदोबस्त वाढवला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात तरुण जखमी झाल्याचे समजते. घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली. संतप्त नागरिकांमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, चाकू हल्ल्याच्या घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. प्राथमिक तपासानंतर हल्ला करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. संशयिताची चौकशी सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांची गर्दी वाढत असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती आणखी चिघळू न देता नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेमुळे जामनेर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून पुढील तपासात हल्ल्यामागील कारण, घटनेतील इतर व्यक्तींचा सहभाग आणि हल्ल्याचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Read More

सिंदखेडराजा ते पाचाड दरम्यान राष्ट्रमाता जिजाऊ महाअभिवादन यात्रेचे आयोजनराजमाता जिजाऊ यांचे माहेरचे वंशज शिवाजीराजे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक यात्रा

जामनेर, प्रतिनिधी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दिनांक १५ ते १७ जून २०२६ दरम्यान “राष्ट्रमाता जिजाऊ महाअभिवादन यात्रा २०२६” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थळ असलेल्या ऐतिहासिक सिंदखेडराजा येथून यात्रेला प्रारंभ होणार असून किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील त्यांच्या समाधीस्थळी यात्रेची सांगता होणार आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे माहेरचे वंशज तथा जाधव घराण्याचे वारसदार शिवाजीराजे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही ऐतिहासिक यात्रा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतील शिवभक्त, इतिहासप्रेमी, शिवकार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होणार आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या विचारांचा जागर, शिवचरित्राचा प्रचार-प्रसार आणि स्वराज्याच्या मूल्यांचे संवर्धन हा या यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागांना जोडणारी ही यात्रा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक एकात्मतेचा संदेश देणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यासह जामनेर तालुक्यातील सर्व शिवप्रेमी, शिवभक्त, युवक, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांनी या ऐतिहासिक महाअभिवादन यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यात्रा समन्वयक राहुल चव्हाण व कैलास पाटील यांनी केले आहे. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याचा गौरव आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाचे स्मरण करून देणारी ही यात्रा राज्यभरातील शिवप्रेमींसाठी एक ऐतिहासिक पर्व ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Read More

गणरायाच्या सेवेत खाकीची ममता; चिमुकल्याला कुशीत घेऊन महिला पोलिसांची भावूक ड्युटी

सेवेत खाकीची ममता; चिमुकल्याला कुशीत घेऊन रणरागिणी पोलिसाची कर्तव्यनिष्ठा जामनेर : जे बी एन महाराष्ट्र न्यूज ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याला जागत बजावले कर्तव्य; हृदयस्पर्शी क्षणाने उपस्थितांचे डोळे पाणावले जामनेर : गणरायाला निरोप देण्यासाठी शहरात भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. ढोल-ताशांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि उत्साहाचे वातावरण सर्वत्र पाहायला मिळत होते. या उत्सवी वातावरणात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत होते. याचदरम्यान एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या चिमुकल्याला कुशीत घेत बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडल्याचे हृदयस्पर्शी दृश्य समोर आले. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हजारो भाविक विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, भाविकांची सुरक्षितता अबाधित राहावी आणि उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी पोलिस कर्मचारी सतर्क होते. याच कर्तव्यादरम्यान एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचे आपल्या चिमुकल्याला कुशीत घेतलेले दृश्य अनेकांचे लक्ष वेधून घेत होते. एका बाजूला लेकराची माया आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी, अशा दोन्ही भूमिका ही माऊली एकाच वेळी निभावताना दिसली. एका कुशीत लेकरू… तर दुसरीकडे समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी! आई म्हणून आपल्या लेकराची काळजी घेणे आणि पोलिस कर्मचारी म्हणून नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणे, या दोन्ही जबाबदाऱ्या या रणरागिणीने एकाच वेळी जपल्या. गणरायाच्या उत्सवात नागरिक आनंदोत्सव साजरा करत असताना, खाकी वर्दीतील अनेक महिला पोलिस कर्मचारी मात्र आपला सण, कुटुंबाचा सहवास आणि वैयक्तिक भावना बाजूला ठेवून कर्तव्यावर तैनात होत्या. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिस दलाच्या ब्रीदवाक्याला जागत ही रणरागिणी आपले कर्तव्य बजावताना दिसली. एका हातात मातृत्वाची माया, तर दुसरीकडे कर्तव्याची जबाबदारी, असा हा भावनिक क्षण उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला. गणरायाच्या विसर्जनासाठी आलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी खाकी वर्दीतील पोलिस कर्मचारी स्वतःचा सण आणि कुटुंबाचा सहवास बाजूला ठेवून कर्तव्य बजावत होते. त्यामुळे या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे हे दृश्य कर्तव्य, मातृत्व आणि त्यागाचा हृदयस्पर्शी संगम ठरले. एका बाजूला गणरायाची सेवा आणि दुसऱ्या बाजूला आई म्हणून आपल्या लेकराची माया… कर्तव्यापासून एक पाऊलही मागे न हटता या माऊलीने दोन्ही जबाबदाऱ्या जपल्याचे हे दृश्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही पाणी आले. आईच्या मायेइतकीच कर्तव्याची जाणीव जपणाऱ्या या रणरागिणीला सलाम!खाकी वर्दीतील प्रत्येक कर्तव्यनिष्ठ पोलिस कर्मचाऱ्याला मानाचा मुजरा! 🚔🙏 गणपती बाप्पा मोरया! 🌺

Read More
error: Don't Try To Copy !!