Headlines

खरीप हंगाम २०२६साठी जळगावात युरिया खतांची पहिली रेक दाखल

खरीप हंगाम २०२६साठी जळगावात युरिया खतांची पहिली रेक दाखलजळगाव, दि. ८ एप्रिल —(प्रतिनिधी ) खरीप हंगाम २०२६च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खतांचा वेळेवर व पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, आज युरिया खतांची पहिली रेक जिल्ह्यात दाखल झाली.या रेकद्वारे सुमारे २६५० मेट्रिक टन युरिया खत जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहे. सदर खत पुरवठा Rashtriya Chemicals & Fertilizers (RCF) कंपनीमार्फत करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन खत साठ्याची पाहणी केली तसेच कंपनी प्रतिनिधी, वाहतूकदार व हमाल प्रतिनिधींशी संवाद साधून उतरवणूक आणि वितरण प्रक्रियेचा आढावा घेतला.खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत. खतांची विक्री आधार संलग्न (e-POS) प्रणालीद्वारेच करण्याचे आदेश देण्यात आले असून, साठवणूक, वाहतूक व विक्री प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होऊ नये यासाठी यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत, रास्त दरात आणि आवश्यक प्रमाणात खत उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.जिल्हा प्रशासनाने खतांचा तुटवडा भासू नये यासाठी सातत्याने नियोजन व पाठपुरावा सुरू ठेवला असून, या उपक्रमामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला बळकटी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.“शेतकऱ्यांची सोय आणि कृषी निविष्ठांची वेळेवर उपलब्धता ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. खत विक्रीत पारदर्शकता राखण्यासाठी तांत्रिक प्रणालीचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असे जिल्हा प्रशासनाने नमूद केले.

Read More

जामनेर येथील जैन इंटरनॅशनल स्कूलने यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

जैन इंटरनॅशनल स्कूल जामनेरदि. 17/04/2026गेल्या बारा वर्षांपासून उत्कृष्ट निकालाची परंपरा या वर्षी सुद्धा कायमसी.बी.एस.ई. बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून जामनेर येथील जैन इंटरनॅशनल स्कूलने यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. उत्कृष्ट निकालाची परंपरा जपत शाळेने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.या वर्षीच्या निकालात नीरज किरण पाटील याने 96.20 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे पार्थ गायकवाड (93.60%), अर्जुन फुसे (92.40%), कुणाल सावकारे (92.20%), प्रज्ञेश सुरवाडे (91.80%), अनुष्का थोरात (90.80%), दीपेश बनकर (90.40%), राज साबळे (90.20%), ओम पाटील (90%), अक्षरा पाटील (90%) आणि अर्थव पाटील (90%) यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मेहनतीबरोबरच पालकांच्या सहकार्यामुळे हा यशस्वी निकाल लागल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Read More

तालुका क्रीडा नियोजन बैठक ठरली फलदायी; प्रा. समीर घोडेस्वार, ऋग्वेद पेडगांवकर व कार्तिकी लामखेडे यांचा सन्मान

जामनेर, ता.१६ जुलै:महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव आणि पंचायत समिती, जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या नियोजनासाठी सहविचार सभा दिनांक १६ जुलै रोजी दुपारी ११ वा. पंचायत समिती, जामनेर येथे उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी क्रीडा अधिकारी सचिन निकम, विशाल बोडके, गटशिक्षणाधिकारी विष्णू काळे, विस्तार अधिकारी संजय पाटील, स्पर्धा समिती सचिव जी.सी. पाटील, मुख्याध्यापक शेख जलाल, गटसाधन केंद्र समन्वयक पंकज रानोटकर यांसह तालुक्यातील विविध मान्यवर उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी डॉ. आसिफ खान यांनी चालू शैक्षणिक वर्षातील विविध क्रीडा योजना, क्रीडा शिक्षकांच्या योगदानाचे सन्मान, ‘लाईफटाईम अचीवमेंट’ पुरस्कार, व विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या शाळांचा गौरव अशा महत्त्वाच्या बाबींवर सविस्तर माहिती दिली. याशिवाय तालुक्यातील १० प्रमुख खेळांची नियोजनपूर्वक आखणी व शालेय पत्रिकेविषयी चर्चा झाली. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी ‘माझी शाळा – सुंदर पटांगण’ ही अभिनव संकल्पना मांडून, शाळांमध्ये खेळांच्या अद्ययावत सुविधा व उत्स्फूर्त सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी उपस्थित शिक्षकांच्या शंकांचे निरसनही त्यांनी केले. या प्रसंगी विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा गौरव करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक श्रीपाद पेडगावकर यांचे चिरंजीव ऋग्वेद यांनी इ.८ वी स्कॉलरशिप परीक्षेत तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल तर वाकी बुद्रुक येथील सरपंच व क्रीडा शिक्षक ललित लामखडे यांच्या कन्या कार्तिकी हिने इ.१० वी बोर्ड परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आले. तसेच इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. समीर घोडेस्वार यांना जिल्हास्तरीय सुलभक म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन डॉ. आसिफ खान यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.समीर घोडेस्वार यांनी केले.या बैठकीस तालुक्यातील ७२ क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेच्या यशस्वीतेसाठी डी के चौधरी, नरेंद्र पाटील, व्ही एन पाटील, आनंद मोरे, पी डी पाटील, शाहिद शेख जहीर खान, देवा पाटील आदी.परिश्रम घेतले.

Read More

राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा एल्गार; जळगावात काळ्या फिती लावून निषेधास सुरुवात

समान काम समान वेतन, सुधारित वेतनश्रेणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा जळगाव : राज्यातील दुय्यम न्यायालयांमध्ये कार्यरत तब्बल ३४ हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाशी संबंधित कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली असून, शासनाने मागण्यांची दखल घेऊन सकारात्मक निर्णय न घेतल्यास १७ नोव्हेंबरपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याला १६ सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात सुरुवात झाली. न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी हातावर काळ्या फिती बांधून शासनाच्या धोरणांविरोधात निषेध नोंदवला. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचे हे पहिले पाऊल उचलण्यात आले आहे.समान काम समान वेतनाची प्रमुख मागणीन्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील प्रमुख मागणी ‘समान काम, समान वेतन’ ही आहे. यासोबतच सुधारित वेतनश्रेणी लागू करणे, सेवाविषयक विविध प्रश्न निकाली काढणे आणि प्रलंबित मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घेणे, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांसंदर्भात कर्मचारी संघटनेकडून शासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे.टप्प्याटप्प्याने आंदोलनकर्मचाऱ्यांनी आंदोलनाची सुरुवात काळ्या फिती लावून निषेध नोंदवण्यापासून केली आहे. शासनाकडून मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर १७ नोव्हेंबरपासून राज्यातील दुय्यम न्यायालयांमधील कामकाज बंद ठेवून बेमुदत संप करण्याचा इशारा देण्यात आला आहे.न्यायालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यताराज्यातील दुय्यम न्यायालयांमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी कार्यरत असल्याने बेमुदत संप झाल्यास न्यायालयीन प्रशासकीय कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विविध प्रकरणांशी संबंधित कागदपत्रे, नोंदी, कार्यालयीन प्रक्रिया आणि इतर न्यायालयीन प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शासनाने आंदोलनाची दखल घेऊन चर्चेद्वारे प्रश्न सोडवावा, अशी भूमिका कर्मचारी संघटनेकडून मांडण्यात येत आहे.जळगाव जिल्हा न्यायालयाच्या आवारात काळ्या फिती लावून सुरू झालेल्या आंदोलनातून कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी एकजूट दाखवली आहे. आता शासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते आणि प्रस्तावित बेमुदत संप टाळण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे राज्यातील न्यायालयीन कर्मचारी तसेच न्यायालयीन कामकाजाशी संबंधित नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Read More

जामनेर येथे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर पाटील यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न…

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी -सुपडू जाधवजामनेर : येथील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मनोहर पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित सत्कार व गौरव सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलिस उपअधीक्षक श्री. प्रभाकर रायते हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सेवानिवृत्तीनंतरचा काळ परिवारासोबत घालवताना समाजसेवेतही सक्रिय राहण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शाखाली जनतेची सेवा करत समाजाच्या दुःखात सहभागी होणे हेच खरे कार्य असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्री. अशोक शिंदे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यामागील राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा यावर भाष्य केले. शिवरायांनंतरही औरंगजेबाविरुद्धचा लढा महाराष्ट्राने स्वराज्याच्या विचारांनीच कायम ठेवला, असे सांगत त्यांनी उपस्थित महिलांना भावी पिढीमध्ये स्वराज्यनिष्ठ विचार रुजविण्याचे आवाहन केले. मनोहर पाटील यांचे कार्य समाजातील अंतिम घटकापर्यंत पोहोचले असून त्यांच्या कुटुंबाचे योगदानही विविध सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण राहिले आहे. त्यामुळेच या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. यावेळी गरीब कुटुंबातील होतकरू युवक राहुल कुमावत यांनी पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घातल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठान व आझाद मित्र मंडळाच्या वतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी राहुल चव्हाण यांनी आपल्या मनोगतात मनोहर पाटील यांच्या ३२ वर्षांच्या निरंतर पोलिस सेवेचे कौतुक करताना “एखाद्या कार्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देणे म्हणजे त्या वातावरणाचाच एक भाग होणे,” असे मत व्यक्त केले. “आजच्या कार्यक्रमात प्रत्येक क्षेत्रातील बाप माणूस उपस्थित आहे. प्रत्येकजण आपल्या क्षेत्रात मोठा असतो. मामा यांच्या पोलिस सेवेतील कार्याची साक्ष आज येथे उपस्थित असलेला जनसमुदाय देत आहे,” असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमास मुरलीधर कासार, जितेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष डॉ.प्रशांत भोंडे,नगरसेवक महेंद्र बाविस्कर, मा.नगरसेवक दिपक तायडे,नगरसेवक अतिश झाल्टे, अमोल चव्हाण,डॉ. बेंद्रे, प्रकाश पाटील, सुभाष पवार,जगदीश बैरागी, कमलेश पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश पाटील यांनी केले सूत्रसंचालन राजेंद्र भोसले यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार एकेश मनोहर पाटील यांनी मानले.

Read More

टाकळी (ता. जामनेर) येथे धनाई बालक मंदिरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

टाकळी (ता. जामनेर) येथे धनाई बालक मंदिरचे संचालक श्रीकांत अहिरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तसेच इयत्ता आठवीतील एन.एम.एम.एस. परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. एन.एम.एम.एस. परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी दर्शन समाधान मोरे, हर्षल गणेश जाधव, तेजस राहुल दुसाने व रितेश मुरलीधर सपकाळ यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत कठोर परिश्रम व सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर आकर्षक नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मुला-मुलींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. या कार्यक्रमासाठी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र काका पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महेंद्र भाऊ बाविस्कर (नगरसेवक, जामनेर), कमलाकर भाऊ पाटील (मा. सभापती), नवल भाऊ पाटील राजपूत (माजी सभापती), सदाशिव चौरे सर, इंदिराबाई ललवाणी (उपमुख्याध्यापक, जामनेर), सुपडू सोनार (सेवानिवृत्त शिक्षक, टाकळी), डॉ. राहुल माळी (शांताई हॉस्पिटल, जामनेर), अरुण सातव सर (सातव क्लासेस, जामनेर), प्रा.ईश्वर चोरडिया, प्रा. सागर बाविस्कर,आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रामकृष्ण सर गायकवाड (सेवानिवृत्त शिक्षक) यांनी भूषविले. तसेच बाळूभाऊ चौरे (ग्रामपंचायत सदस्य), सारंगधर अहिरे (माजी सरपंच), समाधान वराडे, दीपक बाविस्कर, रमेश वराडे, पवन महाजन, उमेश बंडे तसेच गावातील इतर प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धनाई क्लासेसचे संचालक श्रीकांत अहिरे सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Read More

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे विद्यार्थ्यांचे साकडे नवीदाभाडी येथील शिक्षकांची बदली थांबविण्याची मागणी

मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे विद्यार्थ्यांचे साकडे नवीदाभाडी येथील शिक्षकांची बदली थांबविण्याची मागणीजे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजि. प. शाळा नवीदाभाडी येथील विद्यार्थी व पालकांनी ना. गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री यांच्याकडे शाळेतील बदलीपात्र शिक्षकांची बदली न होण्यासाठी साकडे घातले. जि. प. शाळा नवीदाभाडी येथे तीन शिक्षक कार्यरत असून त्यामधील गजानन मंडवे व ऋषिकेश शिंदे या दोन शिक्षकांच्या बदली होऊ नये यासाठी आज गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी नवीदाभाडी या गावातून अनेक पालक, महिला आणि शाळेतील मुले गिरीश महाजन यांना भेटण्यासाठी आले होते. विद्यार्थी म्हणाले,आमच्या शाळेतील शिक्षकांच्या बदल्या झाल्यास आम्ही शाळेत जाणार नाही.आम्हाला तेच शिक्षक द्या आमचे शिक्षक आम्हाला छान शिकवतात,असे कथन ना.मा. गिरीश महाजन यांना सांगत होते. सदर प्रकरणाची पालकांकडून माहिती घेतली असता सदर शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतचे वर्ग असून ८० विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेला यावर्षी ‘”मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या अभियानात तिसरा क्रमांक प्राप्त झालेला आहे. या शाळेतील विद्यार्थी पाचवी स्कॉलरशिप मध्ये सहा ते सात विद्यार्थी पात्रता धारक असतात. सदर शाळेत मंथन प्रज्ञाशोध परीक्षा, एम .टी .एस परीक्षाचे अभ्यास वर्ग घेतले जातात आणि विद्यार्थी जिल्हा व तालुका गुणवत्ता यादीत झळकतात. आता झालेल्या जामनेर टॅलेंट सर्च ( जे. टी. एस.) परीक्षेत जामनेर तालुक्यातून इयत्ता चौथीतील विद्यार्थी पहिल्या दहा मध्ये तीन विद्यार्थी नवीदाभाडी शाळेचे आहे. अशा प्रकारची शाळेची यशोगाथा या शिक्षकांनी निर्माण केलेली आहे असे गावकऱ्यांनी सांगितले.म्हणून गजानन मंडवे व ऋषिकेत शिंदे या शिक्षकांची बदली थांबवावी अशी पालकांची शाळेतील मुलांची व महिलांची मागणी होती.

Read More

श्री शामराव पाटील कुरे व सौभाग्यवती चौत्राबाई शामराव कुरे यांचा 51 वा लग्नाचा सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरा

प्रतिनिधी हानुमंत चंदनकर ====================== नांदेडच्या नायगांव तालुक्यातील ताकबीड येथील श्री शामराव पाटील कुरे सौभाग्यवती चौत्राबाई शामराव कुरे यांच्या लग्नाचा 51 वा सुवर्ण महोत्सव आज दिनांक 19 मे रोजी साई तीर्थ मंगल कार्यालय नायगाव येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला त्यांच्या मुलांनी यशवंत कुरे, बसवंत कुरे, भास्कर कुरे,कैलास कुरे या चार भावांच्या संकल्पनेतून आयोजित केलेला हा सोहळा आनंदी उत्साहात संपन्न झाला यांत आई वडीलांचा आनंद साजरा करण्यासाठी विवाह प्रसंगा प्रमाणे आई वडीलांना दाग दागिने, पारंपारिक शाही पोशाख धोतर सदरा फेटा दोन अंगठी, गळ्यातील चैन आईसाठी नववधू प्रमाणे सर्व अलंकार ऐटबाज दोघांची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक लग्नाचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी श्री केशवराव बळवंतरावजी पाटील चव्हाण, सुधाकररावजी पाटील चव्हाण व नायगांव नगरपंचायतीचे नगर उपाध्यक्ष युवा नेते विजय पाटील चव्हाण, तंटामुक्त समितीचे तालुका अध्यक्ष हनमंतराव पाटील चव्हाण, नायगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रीनिवासरावजी पाटील चव्हाण, माधवरावजी बेळगे, देविदासजी बोमनाळे व जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजयजी बेळगे साहेब डॉ. शिंपाळे साहेब, डॉ. कुऱ्हाडे साहेब व पत्रकार बाळासाहेब पांडे सर, चंदनकर सर, राम मोरे सर व नगरसेवक संजय पा. चव्हाण, शिवाजी पा. कल्याण नगरसेवक विठ्ठल आप्पा बेळगे, नगरसेवक पांडुरंग पा. चव्हाण, साहेबराव पा शिंदे, माधव शंकरराव बेळगे, दत्तात्रय शिंदे सर, पवन गादेवार, बसंतराव मुंके सुभाषराव मुंके आणि चव्हाण पाटील मित्र मंडळ व ताकबीड येथील सरपंच रंजीत पा. कुरे, सराफा व्यापारी ज्ञानेश्वर सावकार कवटीकवर, हनमंत पा. चव्हाण कैलास पा. कल्याण व इतर सर्व सराफा व्यापारी व किराणा व्यापारी रमेश सावकर चिद्रावार प्रकाश सावकार कवटीवार अनिल गादेवार व सर्व किराणा व्यापारी तसेच सौभाग्यवती चौत्राबई शामराव कुरे यांचे माहेर लालवंडी येथील बाबुरावजी लंगडापुरे ,भगवानरावजी लंगडापुरे व शंकररावजी दगडगावे विश्वनाथजी केरुरे पिराजी भुसेवाड बाबुराव दगडगावे व लालवंडी, ताकबीड व नायगाव येथील सर्व नागरिक कुरे परिवारातील सर्व बाईलेकीचे पाहुणे मंडळी व करामुंगे,शिराळे, जनकवाडे, परिवार, व इतर सर्व आप्तस्वकीय नातेवाईक यांसह परिसरातील नागरिक उपस्थित राहून भरभरून शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमात आई-वडिलांबद्दल या चार भावंडांनी केलेला हा आई-वडिलांचा सोहळा आज उपयोगी समाजाला प्रेरणादायी ठरू शकते असे मनोगत व्यक्त केले आणि या चार भावंडांचे कौतुक व शुभेच्छा रुपी आशीर्वाद दिले व मोलाचे मार्गदर्शन नगर पंचायत उपाध्यक्ष विजयजी पाटील चव्हाण ,संजयजी बेळगे साहेब व सौ. सरोजिनी शिंपाळे मॅडम यांनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना व्यंकट पाटील शिंदे व कार्यक्रमाचे आभार कैलास कुरे यांनी केले

Read More

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या अबिद हुसेन यास फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी शेंदुर्णीत प्रचंड मुक मोर्चा हजारो पुरुष महिलांचा सहभाग

शेंदुर्णी ता.जामनेर प्रतिनिधीशेंदुर्णी येथील अबिद हुसेन शेख याने तो ज्या शाळेच्या बसवर चालक होता त्याच शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गुंगीचे औषध देऊन वेळोवेळी बलात्कार केला असुन याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी आरोपी व त्याच्या आईला अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाच्या वतीने मुक मोर्चा वाडी दरवाजा भागातुन काढण्यात आला.शहरातील मुख्य मार्गाने हा मुक मोर्चा शेंदुर्णी दुरक्षेत्र येथे पोहचला.या मोर्चात युवती, महिला, पुरुष यांचा मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभाग होता.हजारोच्या संख्येने हिंदु बांधव आरोपी यास फाशी झाली पाहिजे,लव्ह जिहाद बाबत फलक घेऊन मुक मोर्चात यात सहभागी झाले होते. यावेळी प्रखर वक्ते बजरंग दलाचे सह संयोजक प्रा.आशिष दुसाने,पुणे यांनी आपल्या घणाघाती भाषणात लव्ह जिहाद,हिंदु मुलींवर कसं जाळं फेकले जाते, त्यांना हळूहळू कसं अटकवलं जाते,मग मैत्री प्रेमाचं नाटक व नंतर लग्नाच्या साठी ब्लॅक मेल करुन धर्मांतर केले जाते यासाठी मोठं षडयंत्र असुन हिंदुंनी जागृत रहावे.मुलींना दुर्गा वाहीनीत तर मुलांना संघाच्या शाखेत पाठवावे आपण आपल्या धर्मासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.आरोपी व त्यांच्या सर्व साधीदाराला सुद्धा कडक शिक्षा व्हावी यासाठी जागृत राहुन ही प्रवृत्ती कायमस्वरूपी नष्ट व्हावी यासाठी सतर्क जागृत रहावे असे आवाहन केले.यावेळी उत्फुर्तपणे महिलांच्या वतीने सौ.लिना मनोज चव्हाण यांनी जोषपुर्ण भाषण केले व महिला मुलींना मार्गदर्शन केले. सकल हिंदु समाजाच्या वतीने विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा सह मंत्री भिका इंदरकर यांनी प्रास्ताविक केले व निवेदनाच्या मागण्या वाचुन दाखवल्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी यासाठी रचनात्मक हा मुक मोर्चा असल्याचे सांगितले पहुर पोलिस व पिंपळगाव हरेश्वर पोलिस यांचे आभार मानले. मोर्चात सहभागी महिलांनी याबाबतचे निवेदन पोलिस उपअधीक्षक अरुण आव्हाड,पहुरचे सपोनि.प्रमोद कठोरे शेंदुर्णी दुर क्षेत्र चे पोउनि.नंदकुमार शिंंब्रे यांना दिले.सपोनि.प्रमोद कठोरे यांनी सांगितले की आपल्या निवेदनाची दखल घेऊन वरिष्ठांना याबाबत कळवले जाईल असं आश्वासन दिले.यासाठी विश्व हिंदु परिषदेच्या तालुका पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले

Read More

उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे अत्याधुनिक ३०० एम.ए. क्ष-किरण यंत्र दाखल!

जामनेर परिसरातील गोरगरीब रुग्णांना मिळणार अद्ययावत आरोग्य सुविधा; इतर शहरांमध्ये जाण्याची धावपळ होणार कमी जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल पडले आहे. उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे नवीन ३०० एम.ए. (300 mA) क्ष-किरण (X-Ray) यंत्र दाखल झाले असून, त्यामुळे परिसरातील रुग्णांना क्ष-किरण तपासणीची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगळे यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे क्ष-किरण यंत्र चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयामार्फत उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे हस्तांतरित करण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र चौधरी, एन.क्यू.ए.एस. (NQAS) नोडल अधिकारी डॉ. स्वप्नील कळसकर तसेच डॉ. दीपक जाधव यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. यंत्राच्या मंजुरीपासून ते हस्तांतरणापर्यंत सातत्याने पाठपुरावा करणारे उपजिल्हा रुग्णालय, जामनेरचे क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी श्री. राहुल कोडवते तसेच उपजिल्हा रुग्णालयातील संपूर्ण कर्मचारीवर्गाचेही अभिनंदन होत आहे. गोरगरीब रुग्णांना मोठा फायदा या ३०० एम.ए. क्ष-किरण यंत्रामुळे जामनेर व परिसरातील रुग्णांना आवश्यक क्ष-किरण तपासणीची सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना तपासणीसाठी इतर शहरांमध्ये किंवा खासगी केंद्रांवर जाण्याची गरज कमी होणार असून, त्यांचा वेळ व प्रवासाचा खर्चही वाचण्यास मदत होईल. अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर रुग्णांना स्थानिक पातळीवरच आवश्यक निदानात्मक तपासणीची सुविधा मिळणार असल्याने जामनेरच्या आरोग्य व्यवस्थेला यामुळे आणखी बळकटी मिळणार आहे. अधिकृत अभियंत्यांकडून इन्स्टॉलेशननंतर सुविधा कार्यान्वित सदर क्ष-किरण यंत्र अधिकृत अभियंत्यांमार्फत योग्य पद्धतीने इन्स्टॉल व कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यानंतर ही सुविधा रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल. लवकरच भव्य लोकार्पण सोहळा यंत्राचे इन्स्टॉलेशन व कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माननीय नामदार श्री. गिरीशभाऊ महाजन यांच्या शुभहस्ते या नवीन सुविधेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय परिवाराकडून देण्यात आली आहे. जामनेर परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या दृष्टीने ही सुविधा निश्चितच महत्त्वाची ठरणार असून, उपजिल्हा रुग्णालय, जामनेरच्या आरोग्यसेवेला यामुळे नवी ताकद मिळणार आहे. – उपजिल्हा रुग्णालय परिवार, जामनेर

Read More
error: Don't Try To Copy !!