वाकडी केंद्रस्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेत उदय शिंदे प्रथम

वाकडी, दि. ४ सप्टेंबर : जि.प. केंद्रशाळा वाकडी येथे शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी केंद्रस्तरीय स्पेलिंग बी (स्पेलिंग पाठांतर) स्पर्धेचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वाकडी केंद्रातील एकूण अकरा शाळांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची व स्मरणशक्तीची कसोटी पाहणारी ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली. मोठ्या गटातून जि.प. शाळा चिंचखेडे ता. वा. येथील इयत्ता पाचवीचा अत्यंत गुणी व हुशार विद्यार्थी उदय सुरेश शिंदे याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. उदयच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामध्ये त्याचे वर्गशिक्षक श्री. सोपान किसन पारधी सर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. तसेच जि.प. शाळा चिंचखेडे येथील सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समिती तसेच संपूर्ण गावातून उदयचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी केंद्रसमन्वयक श्री. संदीप पाटील सर, केंद्रप्रमुख श्री. नामदेव पाटोळे सर तसेच वाकडी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. स्पर्धेचे पर्यवेक्षक म्हणून वाकडी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री. चौधरी सर यांनी उत्कृष्टपणे काम पाहिले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या अशा स्पर्धांमुळे त्यांच्यातील आत्मविश्वास, स्मरणशक्ती आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

Read More

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

शिरसोली : शिरसोली येथून बेपत्ता झालेल्या एका तरुणाचा मृतदेह नेव्हरे धरणाच्या पाण्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणाचा मृत्यू नेमका आत्महत्येमुळे झाला की यामागे घातपात आहे, याबाबत सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण काही काळापासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू असताना नेव्हरे धरण परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. या घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांकडून सर्व शक्यता तपासल्या जात असून हा आत्महत्येचा प्रकार आहे की घातपात, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणात पोलिस तपासातून पुढे काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्रीडा व युवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणेजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव द्वारा आयोजित तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत वाकोद विद्यालयाचे यश

दि.02/08/2025 वार शनिवार जामनेर येथे ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालय आज 14 वर्ष,17 वर्ष,19 वर्ष वयोगटातील मुले व मुली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. यात राणीदानजी जैन माध्यमिक व श्रीमती कांताबाई जैन उच्च माध्यमिक विद्यालयातील14 वर्षे वयोगटात (मुले)52 किलो वजन गटात कु. कार्तिक रणजीत सोनेत17 वर्ष वयोगटात (मुले)48 किलो वजन गटात कु. गोपाल आनंद सोनेत19 वर्ष वयोगटात(मुली) 57 किलो वजन गटात कुमारी गायत्री रणजीत सोनेत विजय होऊन जिल्हास्तरावर निवड झाली या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन आदरणीय दादासाहेब श्री. संजयरावजी गरुड संस्थेचे व्हा. चेअरमन आबासाहेब श्री.भीमराव शेळके संस्थेचे सचिव काकासाहेब श्री.सागरमलजी जैन संस्थेचे सहसचिव दादासो श्री.यु.यु.पाटील संस्थेचे कार्यालयीन सचिव भाऊसाहेब श्री.दीपकरावजी गरुड ,वस्तीगृह सचिव सूर्यवंशी भाऊसाहेब संस्थेचे सर्व संचालक मंडळ जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय श्री. अशोक भाऊ जैन जैन फॉर्म वाकोद व्यवस्थापक आदरणीय श्री. विनोद सिंहजी राजपूत गावचे सरपंच, पोलीस पाटील, पंचक्रोशीतील गावकरी,खेळाडूंचे पालक शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस.टी.चिंचोले पर्यवेक्षक श्री एन.टी.पाटील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, वस्तीगृहाचे कर्मचारी, यांनी खेळाडूचे कौतुक केले.

Read More

सिद्धगड भवनी माता मंदिर व परिसराच विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार — नामदार गिरीश महाजन

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधव जामनेर —गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रामपूर ता. जामनेर येथील श्री सिद्धगड भवानी माता मंदिर संस्थानच्या नूतन श्री सिध्दगड भवानी माता मंदिराचा भूमिपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी सपत्नीक भूमिपूजन आज केले.श्री सिद्धगड भवानी माता मंदिर संस्थानचा अध्यक्ष म्हणून मंदिराचा व मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना संस्थानच्या इतर सहकाऱ्यांची व भाविकांची मिळणारी खंबीर साथ बळ देणारी आहे असे मनोगत नामदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केले .याप्रसंगी भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते परिसरातील नागरिक उपस्थित होते .

Read More

भारतीय जैन संघटना व महावीर पब्लिक स्कूल आयोजित शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात व आनंदात संपन्न झाला

पहुर : भारतीय जैन संघटना आणि महावीर पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षक सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. प्रमोद कठोरे (पी.आय, पहुर पोलीस स्टेशन) होते. प्रमुख उपस्थितीत श्री. प्रदीपभाऊ लोढा (चेअरमन, महावीर पब्लिक स्कूल), श्री. पवन रुणवाल (सह सचिव, भारतीय जैन संघटना, जळगाव जिल्हा), श्री. स्वप्निल छाजेड़ (शहराध्यक्ष, भारतीय जैन संघटना), श्री. अरविंद चौरडिया, श्री. सुनील लोढा, श्री. रूपेश लोढा आणि श्री. दीपक लोढा आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. ईश्वर मूळचंद चौरडिया, सुनयना मनोज रुणवाल, शंकर रंगनाथ भामरे यांच्यासह एकूण २० आदरणीय शिक्षकांना सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहराध्यक्ष स्वप्निल भैया छाजेड़, श्री. सुनील लोढा, श्री. रूपेश लोढा, सौ. भाग्यश्री बेदमुथा, सौ. आरती कोटेचा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या सोहळ्याला पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डॉ. क्षीरसागर, उपाध्यक्ष जोशी, सचिव भामरे सर, शरद बेलपत्रे तसेच अन्य पत्रकार बांधव आणि भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेच्या वतीने सर्व मान्यवर, शिक्षक आणि उपस्थितांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले

Read More

गरुड महाविद्यालयाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मदत फेरीचे आयोजन…. .

आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी येथील करिअर कट्टा, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील व विशेषतः मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकरी, विद्यार्थी व सामान्य नागरिक यांच्या मदतीसाठी महाविद्यालयाच्या वतीने शेंदुर्णी गावात मदत रॅलीचे आयोजन करण्यात आले .सदर रॅलीमध्ये महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता या रॅलीच्या माध्यमातून शेंदुर्णी गावात विद्यार्थी व विद्यार्थिनींनी नागरिकांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन करून एकूण १३०००(तेरा हजार) रुपयाची आर्थिक मदत मिळविली .यामध्ये नागरिकांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आपल्या स्वेच्छेने मदत दिली .सदर मदत फेरीमध्ये महाविद्यालयातील करिअर कट्टा समन्वयक प्राध्यापिका डॉ. योगिता पांडुरंग चौधरी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. भूषण पाटील, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. अजिनाथ जीवरग ,विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सुजाता चंद्रकांत पाटील ,सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. रोहिदास धोंडीबा गवारे, कनिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप कुंभार , सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. मुकेश पाटील तसेच महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.संजय भोळे, उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे, उपप्राचार्य डॉ. अमर जावळे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. आप्पा महाजन, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ. महेश पाटील व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. महाविद्यालयाच्या रॅलीबद्दल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन मा. दादासाहेब संजयराव गरुड , संस्थेचे व्हा चेअरमन मा. श्री. आबासाहेब भीमराव शामराव शेळके, संस्थेचे सचिव काकासाहेब सागरमलजी जैन, सह सचिव दादासाहेब यू यू पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसाहेब दीपकजी काशिनाथराव गरुड व सर्व संचालक मंडळ यांनी सदर उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे अभिनंदन केले..

Read More

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलिसांची धडक कारवाई

हद्दपार गुन्हेगारासह ५५ जणांवर कारवाई; ११ अजामीनपात्र वॉरंट तामील पाचोरा : आगामी गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावा तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पाचोरा पोलिसांनी सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी पहाटे ३ ते सकाळी ६.३० वाजेपर्यंत पाचोरा शहर तसेच ग्रामीण हद्दीत व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत ५ पोलीस अधिकारी, २५ पोलीस अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाचा सहभाग होता. या कारवाईदरम्यान पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार, शरीर व मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल असलेले आरोपी तसेच अवैध धंद्यांशी संबंधित संशयितांच्या ठिकाणी अचानक तपासणी व झडती घेण्यात आली. ५५ रेकॉर्डवरील आरोपींवर कारवाई कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांनी अभिलेखावरील एकूण ५५ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य अथवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारी कृती करू नये, याबाबत त्यांना कडक समज देण्यात आली. हद्दपार गुन्हेगारावर गुन्हा दाखल पाचोरा शहरातून हद्दपार करण्यात आलेला सराईत गुन्हेगार मुख्तार शेख उर्फ धाड्या हा पोलिसांना हद्दीत आढळून आला. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली. ११ अजामीनपात्र वॉरंट तामील न्यायालयात प्रलंबित असलेल्या विविध प्रकरणांतील ११ अजामीनपात्र वॉरंट (NBW) पोलिसांनी यशस्वीरीत्या तामील केले. त्यामुळे प्रलंबित आरोपींवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अवैध दारू विक्रीवर धाड पोलिसांनी प्रोहिबिशन रेड अंतर्गत अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्धही कारवाई केली. या कारवाईत २२ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोवंश वाहतूक व बेकायदेशीर शस्त्राविरुद्धही कारवाई मोहिमेदरम्यान अवैध गोवंश वाहतुकीप्रकरणी एक कारवाई, तर आर्म्स ॲक्टअंतर्गत बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी एक कारवाई करण्यात आली. पोलिसांचा स्पष्ट इशारा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या, कायदा हातात घेणाऱ्या तसेच अवैध धंदे चालविणाऱ्या असामाजिक घटकांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पाचोरा पोलिसांकडून देण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात अशाच प्रकारे धडक तपासणी, कॉम्बिंग ऑपरेशन आणि पोलिसांचे पेट्रोलिंग यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Read More

विटनेर येथे स्व. ललितदादा हरीशेठ साठे यांच्या स्मरणार्थ एक्वा पाणपोईचे लोकार्पण

विटनेर (ता.जळगांव ) – गावाचे सुपुत्र स्वर्गीय ललितदादा हरीशेठ साठे यांच्या स्मरणार्थ विटनेर येथे उभारण्यात आलेल्या एक्वा पाणपोईचे लोकार्पण मा. ना. गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा) यांच्या हस्ते संपन्न झाले.गावकऱ्यांच्या वतीने उभारण्यात आलेली ही पाणपोई नागरिकांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार असून, येणाऱ्या उन्हाळ्यात ग्रामस्थांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. स्व. ललितदादा साठे यांनी गावाच्या सामाजिक, शैक्षणिक व विकासकामांत दिलेल्या योगदानाची आठवण यावेळी मान्यवरांनी कृतज्ञतापूर्वक केली.कार्यक्रमास मा. श्री. पप्पूदादा सोनवणे (जि.प. सदस्य), मा. श्री. हरीशेठ साठे (माजी पं. स. सभापती), मा. श्री. साहेबरावदादा वराडे (माजी पं.स. सदस्य), नेहाताई ललित साठे (लोकनियुक्त सरपंच, विटनेर), मा. श्री. रमेशआप्पा पाटील, मा. श्री. शिवराज पाटील, मा. श्री. पी. के. पाटील तसेच गावातील व पंचक्रोशीतील मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात स्व. ललितदादा साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत, समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती जपण्याचा संकल्प व्यक्त केला.

Read More

वाकडी येथे मॅरेथॉन स्पर्धा संपन्न इगतपुरीचा ऋषिकेश वावरे प्रथम

वाकडी.ता.जामनेर.दि.२६/०७/०२५ आज वाकडी गावांमध्ये प्रथमच मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, वाकडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रविण गायकवाड व ग्रामस्थांच्या सहभागातून घेण्यात आले, यावेळी स्पर्धांचे उद्घाटन फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले,यावेळी अंकुश जाधव यांनी हिरवी दिंडी दाखवून स्पर्धाला सुरुवात करण्यात आली, उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर यामध्ये अनिसचे जिल्हा सचिव प्रल्हाद बोराडे,लक्ष अकॅडमीचे संचालक जळगाव पोलीस निलेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते राहुल मुळे, रमेश गायकवाड, पोलीस पाटील घनश्याम पाटील, शिक्षक प्रेमी विनोद तेली,अहजर तांबोळी,विजय राजपूत, राजेंद्र भोई, अतुल पाटील, शब्बीर तडवी, अनिल जाधव,रवी परदेशी,कुणाल बारबुदे, निलेश वाणी, देशदूत प्रतिनिधी ज्ञानेश्वर वंजारी,व रनर गृपचे सदस्य प्रथमच होत असलेल्या स्पर्धांसाठी तालुक्यातील व जिल्हा भरातून इगतपुरी नाशिक बुलढाणा, येथून आलेले स्पर्धक यामध्ये मुला व मुलीसह एकुण ७० ते ८० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असता, स्पर्धेचे ठिकाण तळेगाव रोड पाच किलोमीटर पर्यंत ठेवण्यात आले होते,सर्व आलेल्या स्पर्धकांनी आपले प्राविण्य दाखवत जिंकण्यासाठी प्रयत्न केले, यापैकी मुलांमधून पाच व मुली मधून पाच स्पर्धक यशस्वी झाले, यावेळी यशस्वी झालेल्या स्पर्धकांना रोख बक्षीस व ट्राॅफी पोलीस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या हस्ते देण्यात आली, यावेळी अंकुश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या स्पर्धेमुळे मुलांना चैतन्य निर्माण होऊन स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय छान असा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक करुन पुढील काळात मुख्यमंत्री यांनी घोषित केलेल्या पोलीस भरतीसाठी स्पर्धकांना नक्कीच फायदाचे ठरेल असे त्यांनी व्यक्त केले, स्पर्धक मुलांसाठी बक्षीस देणारे प्रथम आलेले इगतपुरीचा ऋषिकेश वावरे आला ३००० हजार व द्वितीय आलेला तेजश सपकाळे,याला २००० हजार देण्यात आले, तसेच तळवेल बक्षीस सामाजिक कार्यकर्ते प्रविण गायकवाड यांच्या कडून तृतीय आलेला शुभम ओलांडे, देण्यात आले,चतुर्थ आलेला आदित्य येवले यांना देण्यात आले, जळगाव राजेंद्र भोई व ट्राॅफी देणारे बजरंग दल वाकडी स्पर्धक मुलींसाठी प्रथम बक्षीस जानवी रोजोदे जळगाव हिला अनिल जाधव पहूर यांच्या हस्ते पंधराशे रोक देण्यात आले, यावेळी स्पर्धकांच्या आरोग्याची काळजी घेत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धकांच्या पाठोपाठ राहून अम्बुलन्स सेवा जावेद तडवी, रुपाली जोनवाळ,व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले, दूर आलेल्या स्पर्धकांना भोजनाची व्यवस्था प्रविण गायकवाड व राजेंद्र भोई यांनी केली, यावेळी रनर गृपच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

Read More

पॅरागॉनकडून महिला उत्पाद श्रेणीवर कॅशबॅक ऑफर;आधुनिक फॅशनकडे अधिक भर

मुंबई, एप्रिल २०२६: भारतातील विश्वासार्ह पादत्राणे ब्रँड पॅरागॉन फुटवेअर यांनी महिलां उत्पाद श्रेणीवर कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे. या उपक्रमाचा उद्देश महिला ग्राहकांना खरेदीस प्रोत्साहन देणे आणि आधुनिक, फॅशनप्रधान डिझाइन्स अधिक सुलभ करणे हा आहे.या ऑफरअंतर्गत ग्राहकांना सुलभ क्यूआर-आधारित प्रक्रियेद्वारे हमखास रु. ३० तत्काळ कॅशबॅक मिळणार आहे. प्रत्येक उत्पादनाच्या टॅगवर स्क्रॅच-सक्षम क्यूआर कोड दिलेला आहे. हा कोड स्कॅन करून कॅशबॅक पृष्ठावर जाता येते. व्हाउचर कोड आणि आवश्यक माहिती भरल्यानंतर ग्राहक सहजपणे कॅशबॅक मिळवू शकतात. यामुळे खरेदीचा अनुभव अधिक सोपा आणि मूल्यवर्धित होतो.पॅरागॉनची महिला उत्पाद श्रेणी हा आधुनिक ट्रेंडनुसार आणि आकर्षक डिझाइन्सवर आधारित आहे. आजच्या महिला ग्राहकांना केवळ आरामदायक आणि टिकाऊ पादत्राणेच नव्हे, तर विविधता, शैली आणि सध्याच्या फॅशनशी सुसंगतता देखील अपेक्षित असते. या उपक्रमाद्वारे पॅरागॉन आपल्या महिला उत्पाद श्रेणी अधिक व्यापक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.सध्या एकूण विक्रीत १५–२० टक्के योगदान देणाऱ्या या विभागाचा वाटा पुढील तीन वर्षांत ४० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यामुळे या विभागात कंपनीचा वाढता भर अधोरेखित होतो.या उपक्रमाबाबत बोलताना, पॅरागॉन फुटवेअरचे मार्केटिंग आणि आयटी विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष सचिन जोसेफ म्हणाले, “महिला उत्पाद श्रेणी हा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शैली, आराम आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्तता यांचा समतोल साधणारी उत्पादने देण्यावर आम्ही भर देत आहोत. कॅशबॅक उपक्रमाद्वारे अधिकाधिक ग्राहकांना आमच्या आधुनिक आणि विविध प्रकारच्या पादत्राणांचा अनुभव घेण्यास प्रोत्साहन मिळेल. विविध बाजारपेठांतील महिलांसाठी फॅशनप्रधान पादत्राणे अधिक सुलभ करण्यावर आमचा सातत्याने भर राहील.”*विविध प्रकारच्या उत्पादनांनी सजलेल्या पोर्टफोलिओसह पॅरागॉन ग्राहकांच्या गरजेनुसार उपयुक्त डिझाइन, दैनंदिन आराम आणि विश्वासार्ह गुणवत्ता प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. येत्या काळात महिला उत्पाद श्रेणी हा कंपनीच्या उत्पन्नवाढीसह ब्रँडच्या नव्या प्रतिमेला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!