Headlines

दिपनगर (भुसावळ) येथे महाराष्ट्र वीज कामगार महासंघ मार्फत आयोजित महिला दिन व पारिवारिक कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित…

दिपनगर (भुसावळ) येथे महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने महिला दिन व पारिवारिक मेळावा तसेच २०२५-२७ या कालावधीसाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. महिला सशक्तीकरण व कुटुंबसंस्था यांच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. तसेच वीज कामगार महासंघाच्या योगदानाचे कौतुक करत संघटनेच्या भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात महिला कामगारांच्या योगदानाबाबत विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थित सदस्यांनी महासंघाच्या भविष्यातील योजनांवर चर्चा केली.

Read More

शिवसाई कन्स्ट्रक्शन ची हुकूमशाही सुरुकायद्याला न मानणाऱ्या या शिवसाई कंट्रक्शन ने माजवला हुकूमशाहीचा तांडव

दिनांक 01/112025 जे बी एन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (जब्बार तडवी) अवैध वृक्षतोड करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजने चे ही बोगस काम करून वाजवले रोड चे तीन तेरा.. मात्र अभियंता.. उप अभियंता गाढ झोपेत. या हुकूमशाहीला कंटाळून शेतकरी त्रस्त झाला आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील नांदा. तांडा ते चारूतांडा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सध्याला कोट्यावधी रुपयांचे रोड चे काम सुरू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे बोगस काम सुरू असून या कामावरती थातूरमातूर मुरूम निकृष्ट दर्जाचे बोगस मटेरियल वापरले जात आहे. त्यावरती रोलर ने व्यवस्थित दबाई केली जात नाही.त्यामुळे पूर्ण गिट्टी वरती पडलेली आहे तसेच या रोडला कोणतीही साईड ड्रम नाली काढलेली नाही त्यामुळे या ठिकाणी पाणी साचून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची व शेताची मोठी हानी होऊन नुकसान होत आहे असा संताप जनक प्रकार शेतकऱ्यांनी सांगितला आहे. तसेच मुरमाचे खोदकाम सुरू असताना शिवसाई या कंट्रक्शनच्या मालकाने कोणतीही परवानगी न घेता सर्रासपणे अवैध रित्या सागवान,लिंब, व इतर प्रजातीच्या वृक्षांची सर्रासपणे पोकलँड च्या साह्याने कत्तल करून हुकूमशाही चा तांडव माजवलेला आहे. शिवसाई कंट्रक्शन हे बोगस काम करून कोट्यावधी रुपयांचा शासनाला चुना लावून शिवसाई कंट्रक्शन फक्त पैसा कमाविण्याचे एक गोरख धंदा करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले .मागील वर्षी याच कंट्रक्शन ने नांदा.गाव येथे पुलाचे निकृष्ट दर्जाचे बोगस काम केले होते.त्या संदर्भामध्ये गावकऱ्यांनी हे बोगस काम अडविले सुद्धा होते. व अनेक ग्रामस्थांची तक्रार सुद्धा होती त्याच पद्धतीने परत या रोडचे पूर्ण बोगस काम शिवसाई कंट्रक्शन ने सुरू केलेले आहे तरी या हुकूमशाही करणाऱ्या शिवसाई कंट्रक्शन वरती तात्काळ शासनाने, प्रशासनाने कारवाई करण्यात यावी अशी ग्रामस्थांकडून मागणी केली जात आहे. अवैध कत्तल केलेल्या वृक्षांचा पंचनामा अजिंठा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत सावळदबारा वन परिमंडळ च्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी हजर होऊन पंचनामा करून पुढील कारवाईसाठी तपास सुरू आहे

Read More

तयारीला लागा… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठा निर्णय! सुप्रीम कोर्टात काय घडलं?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून सध्या राज्यात मोठे राजकीय वादळ उठले आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न सोडवला असल्याचे कोर्टात सांगण्यात आले, तरी निवडणुकांच्या तारखांसंदर्भात अनिश्चितता कायम आहे. सुप्रीम कोर्टाने आज, म्हणजे २५ फेब्रुवारीची तारीख निवडणुकीच्या सुनावणीसाठी निश्चित केली आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रीम कोर्टाने दिली पुढील तारीख सुरुवातीला या प्रकरणाची सुनावणी ५ फेब्रुवारी रोजी होणार होती. मात्र, दिल्लीतील निवडणुकांमुळे ही तारीख पुढे ढकलली गेली. आजच्या सुनावणीत ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून जो गोंधळ निर्माण झाला होता, तो दूर झाल्याचे स्पष्ट झाले. राज्य सरकारने निवडणुका लवकरात लवकर घेण्याची तयारी दर्शवली आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न क्लिअर झाला, पण निवडणुका लांबणीवर राज्य सरकार आणि याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात स्पष्ट केले की, ओबीसी राजकीय आरक्षणाचा विषय आता निकाली निघाला आहे. सर्वपक्षीय सहमती असल्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षात मतभेद नाहीत. मात्र, निवडणुकांच्या तारखा निश्चित करण्यात अजूनही वेळ लागत आहे. राजकीय वर्तुळात तणाव कायम राजकीय वर्तुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत तणावाचे वातावरण आहे. निवडणुका लांबणीवर गेल्यामुळे सर्वच पक्षांची तयारी प्रभावित झाली आहे. निवडणुका लांबणीवर जात असल्याने स्थानिक पातळीवर नेतृत्वाला आणखी वेळ मिळेल,अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. २५ फेब्रुवारीचा निर्णय महत्त्वाचा २५ फेब्रुवारीच्या सुनावणीत सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेते, यावर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. जर या तारखेला अंतिम निर्णय घेण्यात आला, तर निवडणुका एप्रिल किंवा मेमध्ये घेता येतील. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय चित्र आणखी स्पष्ट होईल. निवडणुका वेळेवर होण्यासाठी प्रयत्न सुरू राज्य सरकारच्या वतीने लवकरात लवकर निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासमोर भूमिका मांडण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटल्याने निवडणुकीला आणखी काही अडथळा येणार नाही, असे सरकारने सांगितले आहे. राजकीय आरक्षणाच्या संदर्भातील गुंता संपला ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातील प्रमुख मुद्दा राज्य सरकारने न्यायालयात मांडून निकाली काढल्याचे सांगितले.

Read More

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे दिमाखदार आयोजन करावे’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सेवा सुविधांसंदर्भात आढावा बैठक पार पाडली. या जयंती सोहळ्याचे भव्य, दिव्य आणि दिमाखदार आयोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. जयंतीसाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतात. त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंत्रणांना दिलेले निर्देश:✅सर्व यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे✅मुंबई महानगरपालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रम व अन्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने होत असलेल्या तरतुदीसाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करावे✅चैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे, महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच संबंधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे✅संबंधित यंत्रणांनी स्वच्छतेबाबतही दक्षता घ्यावी✅गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी. तसेच दादर आणि संबंधित परिसरात वाहतूक पोलिसांनी रहदारीचे योग्य नियंत्रण व जागोजागी सूचना फलक लावावेत✅चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी आणि नागरिकांसाठी उन्हापासून संरक्षणासाठी मंडप, प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करणे✅बेस्ट प्रशासनानेही दादर स्टेशन ते चैत्यभूमीदरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांना सुविधा होईल सदर बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, “लोकराज्य” विशेषांक, शासकीय जाहिरात प्रसिध्दी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सबंधीत विभाग व यंत्रणांना आवश्यक ते दिशानिर्देश दिले. बैठकीत मुंबई महापालिकेच्या वतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे मुख्यमंत्री व उपस्थितांना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या पोस्टरचे अनावरण देखील करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. संजय बनसोडे, राज्याच्या मुख्य सचिव, राज्याच्या पोलीस महासंचालक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस यांच्यासह दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Read More

शेंदुर्णीच्या नगराध्यक्षपदी भाजपचे गोविंद अग्रवाल ६११ मतांनी विजयी…महा विकास आघाडीने दिली जोरदार लढत,…

शेंदुर्णी ( ता.जामनेर ) शेंदुर्णी नगरपंचायती साठी झालेल्या निवडणुकीच्या आजच्या निकालात भाजपने हॅड्रीक करत सलग तिसऱ्यांदा आपली एकहाती सत्ता स्थापन केली असुन महाविकास आघाडीने सुद्धा जोरदार लढत दिली .भाजपा चे अधिकृत ८ नगरसेवक विजयी झाले असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ४, इंदिरा कॉंग्रेस चे २ तर अपक्ष ३ नगर सेवक विजयी झालेअसून यामध्ये१ नगरसेवक भाजप पुरस्कृत तर १ नगरसेवक आधीच बिनविरोध झाला असून त्यांनी भाजपाला पाठींबा दिला आहे. शेंदुर्णी नगरपंचायत मध्ये २०४५३ एकुण मतदान होते यापैकी १४२९३ म्हणजे ६९.८८ टक्के मतदान झाले होते.नगराध्यक्षपदासाठी मुख्य लढत भाजपचे ज्येष्ठ नेते गोविंद अग्रवाल व महाविकास आघाडीच्या वतीने सौ.उज्वला काशिद यांच्या मध्ये थेट झाली.२ अपक्ष उमेदवार सुद्धा रिंगणात होते.नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार गोविंदअग्रवाल यांना ७१७० तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ.उज्वला काशिद यांना ६५५९ मते मिळाली असुन गोविंद अग्रवाल हे ६११ मतांनी विजयी झाले आहेत.सलग तिसऱ्या वेळी जनतेने भाजपच्या ताब्यात नगरपंचायत दिली आहे एक वेळ ग्रामपंचायत व आता सलग दुसऱ्यांदा नगरपंचायत मध्ये भाजपने आपली सत्ता अबाधित ठेवलीआहे. वार्ड क्र.१.भिसे नितीन रामदास.. (अपक्ष)… ३३७ मते वार्ड क्र.२…निकम उज्वल देविदास,.. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) कॉंग्रेस..३६१ मते वार्ड. क्र.३.सय्यद कलीम सलीम.. राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) कॉंग्रेस… २०७ मते वार्ड. क्र. ४.धनगर जागृती श्रीराम.. राष्ट्रवादी ( शरद चंद्र पवार)३४६ मते वार्ड क्र.५तांबोळी मिनाजबी तैसिफ. अपक्ष(भाजपा पुरस्कत )५७४ मते वार्ड क्र.६पाटील प्रियंका अभिजीत ( भाजपा )३७२ मते वार्ड. क्र.७जैन धिरज रमेश. (भाजपा)४३४ मते वार्ड क्र.८चौधरी कल्पनाबाई रमेशअपक्ष… बिनविरोध वार्ड.९.बारी मनिषा शैलेश..( भाजपा)३८६ मते वार्ड. क्र. १०पाटील बेबी तुकाराम ( भाजपा )३०७ मते वार्ड क्र ११बारी सुनिल रतन.. (भाजपा )५९९ मते वार्ड क्र १ २गरुड अश्विनी प्रविण..राष्ट्रवादी ( शरद चंद्र पवार ) कॉंग्रेस..५७५ मते वार्ड क्र. १३गरुड अंबरिश काशिनाथ ( क्रॉग्रेस )३३३ मते वार्ड क्र. १४शेख उजमा शरीफोद्दीन.. कॉंग्रेस७३५ मते वार्ड. क्र १५भिल जया सुनिल.. भाजपा५५१ मते वार्ड क्र.१६बारी शरद बाबूराव…..भाजपा५०१ मते : वार्ड.१७बारी अतुल प्रल्हाद..भाजपा ४२५ मते

Read More

मुख्याध्यापकाचा लाचखोरीचा प्रयत्न उधळला; लाच मागणाऱ्या मुख्याध्यापकावर दुसऱ्यांदा कारवाई

निपाणे (ता. एरंडोल), जि. जळगाव | प्रतिनिधी संत हरिहर माध्यमिक विद्यालय, निपाणे येथील मुख्याध्यापकाने शाळेतील शिपायाकडून वैद्यकीय बिल मंजुरीसाठी ३६०० रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव युनिटने या प्रकरणी सापळा कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हे शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असून त्यांच्या पत्नीच्या ₹२३,८१५/- रुपयांच्या वैद्यकीय खर्चाचे बिल मंजूर करून घेण्यासाठी मुख्याध्यापक संदिप प्रभाकर महाजन (वय ४५, रा. नेपाणे) यांनी ₹५,०००/- लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ₹३,६००/- ठरली होती. या संदर्भात तक्रारदाराने २१ डिसेंबर २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करत असताना मुख्याध्यापक महाजन यांनी पुन्हा लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, लाच स्वीकारण्यापूर्वीच विभागाने कारवाई करत आरोपीविरुद्ध कासोदा पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ८५/२०२५, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८, कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही संदिप महाजन यांच्यावर वेतन निश्चितीच्या फरकाच्या ₹२,५३,७८०/- रुपयांवरून ५ टक्के लाचेची मागणी करून ₹१०,०००/- रु. स्वीकारल्याचा गुन्हा २७ जून २०२४ रोजी दाखल करण्यात आला होता (गु.र.क्र. १०५/२०२४). ही कारवाई पोलीस उप अधीक्षक श्री. योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ किशोर महाजन, पो.ना. बाळू मराठे, पोकॉ प्रदीप पोळ यांचा समावेश होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली

Read More

पाचोरा-भडगाव तालुक्याच्या आढावा बैठकीत कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन..!

प्रतिनिधी (गजानन क्षीरसागर)पाचोरा: -आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पाचोरा येथील निर्मल सीड्सच्या कृषीदालनात चाळीसगावचे कार्यसम्राट आमदार मंगेशजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा-भडगाव मतदारसंघातील आढावा बैठक उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती, संघटनात्मक बळकटी, तसेच गट आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीदरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “निवडणुका या फक्त राजकीय नव्हेत, तर विकासाचा आराखडा ठरवणाऱ्या असतात. प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाच्या विचारधारेसह विकासाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा.” त्यांनी संघटनशक्ती आणि तळागाळातील संवादाचे महत्त्व अधोरेखित करत कार्यकर्त्यांना उत्साहाने कामाला लागण्याचे आवाहन केले.या बैठकीत काही नव्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशही आमदार चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. बैठकीत दिलीपभाऊ वाघ, वैशालीताई सुर्यवंशी, अमोलभाऊ शिंदे, प्रताप हरी पाटील, अमोल नाना पाटील, मधुभाऊ काटे, सुभाष पाटील, संजय नाना वाघ, गोविंद शेलार, दीपक माने, शोभाताई तेली, अनिल पाटील, विनोद नेरकर यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.या आढावा बैठकीमुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवी उर्मी आणि संघटनात्मक एकात्मता जाणवली.

Read More

जळगाव जिल्ह्याचा विकास वेगवान – 756 कोटींपैकी 91.60% निधी वितरित

जळगाव, 22 मार्च: जळगाव जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा वार्षिक नियोजन 2024-25 अंतर्गत मंजूर झालेल्या 756 कोटी रुपयांपैकी तब्बल 91.60% निधी वितरित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. पालकमंत्र्यांनी 31 मार्च 2025 पूर्वी सर्व प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच, जळगाव जिल्ह्याचा विकास राज्यात आघाडीवर राहण्यासाठी सर्व यंत्रणांनी अधिक गतीने आणि समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि चर्चा: १. आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा: ✅ जिल्हा नियोजन निधीतून 8 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे लवकरच लोकार्पण✅ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या बळकटीकरणासाठी विशेष निधी – गोरगरीब रुग्णांना मोफत उपचारांचा मोठा दिलासा✅ पशुसंवर्धन विभागासाठी अतिरिक्त निधी – जिल्ह्यातील पशुधनासाठी दर्जेदार उपचार उपलब्ध २. पर्यटन आणि पर्यावरण संरक्षण: ✅ वन विभागासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर – विकासकामांना वेग देण्याचे आदेश✅ वन सफारी सुरू करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश✅ पारोळा किल्ल्याचे सुशोभिकरण आणि अतिक्रमण हटवण्यासाठी ठोस निर्णय ३. महिला सशक्तीकरण आणि सामाजिक प्रकल्प: ✅ महिला भवन व वन स्टॉप सेंटरची उभारणी पूर्ण✅ क्रीडा विभागाने व्यायामशाळा प्रकल्पाला गती द्यावी ४. शहरी आणि ग्रामीण पायाभूत सुविधा: ✅ सार्वजनिक बांधकाम विभागाने अपूर्ण प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत✅ महानगरपालिकेच्या प्रलंबित प्रकल्पांसाठी आयुक्तांनी विशेष लक्ष द्यावे✅ ग्रामीण भागात रस्ते आणि सिंचन प्रकल्पांना प्राधान्य बैठकीस उपस्थित प्रमुख अधिकारी: ✔ जिल्हाधिकारी: आयुष प्रसाद✔ जिल्हा पोलीस अधीक्षक: डॉ. महेश्वर रेड्डी✔ जिल्हा परिषदेच्या CEO: मीनल करनवाल✔ महानगरपालिका आयुक्त: ज्ञानेश्वर ढेरे✔ जिल्हा नियोजन अधिकारी: विजय शिंदे✔ समाजकल्याण विभाग सहायक आयुक्त: योगेश पाटील✔ आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी: अरुण पवार निष्कर्ष: ✔ 31 मार्च 2025 पूर्वी सर्व विकासकामे पूर्ण करण्याचा निर्धार✔ विभागीय समन्वय वाढवून जिल्ह्याचा विकास वेगाने पुढे नेण्याचे निर्देश✔ जळगाव जिल्हा राज्यातील आघाडीच्या विकास जिल्ह्यांपैकी एक राहणार!

Read More

22 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधीजामनेर तालुक्यातील चिंचखेडा (तपोवन) येथील एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत तरुणाचे नाव शेखर श्रीराम पाटील (वय २२) असे आहे. तो बी.एस्सी. शिक्षण पूर्ण करून शेती करत होता. आज सकाळी शेखर शेतात गेला, परंतु काही वेळाने त्याने शेतातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ पोलिसांना याची खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उपविभागीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. शेखरच्या कुटुंबात आई-वडील आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. अभ्यासू आणि शांत स्वभावाचा म्हणून तो ओळखला जात होता. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. जामनेर पोलिस ठाण्याचे पथक पुढील तपास करीत आहे.

Read More

खरीप हंगाम २०२६साठी जळगावात युरिया खतांची पहिली रेक दाखल

खरीप हंगाम २०२६साठी जळगावात युरिया खतांची पहिली रेक दाखलजळगाव, दि. ८ एप्रिल —(प्रतिनिधी ) खरीप हंगाम २०२६च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खतांचा वेळेवर व पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला असून, आज युरिया खतांची पहिली रेक जिल्ह्यात दाखल झाली.या रेकद्वारे सुमारे २६५० मेट्रिक टन युरिया खत जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहे. सदर खत पुरवठा Rashtriya Chemicals & Fertilizers (RCF) कंपनीमार्फत करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन खत साठ्याची पाहणी केली तसेच कंपनी प्रतिनिधी, वाहतूकदार व हमाल प्रतिनिधींशी संवाद साधून उतरवणूक आणि वितरण प्रक्रियेचा आढावा घेतला.खत वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत. खतांची विक्री आधार संलग्न (e-POS) प्रणालीद्वारेच करण्याचे आदेश देण्यात आले असून, साठवणूक, वाहतूक व विक्री प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होऊ नये यासाठी यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत, रास्त दरात आणि आवश्यक प्रमाणात खत उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.जिल्हा प्रशासनाने खतांचा तुटवडा भासू नये यासाठी सातत्याने नियोजन व पाठपुरावा सुरू ठेवला असून, या उपक्रमामुळे जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला बळकटी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.“शेतकऱ्यांची सोय आणि कृषी निविष्ठांची वेळेवर उपलब्धता ही प्रशासनाची प्राथमिकता आहे. खत विक्रीत पारदर्शकता राखण्यासाठी तांत्रिक प्रणालीचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असे जिल्हा प्रशासनाने नमूद केले.

Read More
error: Don't Try To Copy !!