22 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधीजामनेर तालुक्यातील चिंचखेडा (तपोवन) येथील एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत तरुणाचे नाव शेखर श्रीराम पाटील (वय २२) असे आहे. तो बी.एस्सी. शिक्षण पूर्ण करून शेती करत होता. आज सकाळी शेखर शेतात गेला, परंतु काही वेळाने त्याने शेतातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ पोलिसांना याची खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उपविभागीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. शेखरच्या कुटुंबात आई-वडील आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. अभ्यासू आणि शांत स्वभावाचा म्हणून तो ओळखला जात होता. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. जामनेर पोलिस ठाण्याचे पथक पुढील तपास करीत आहे.

Read More

लोहारा येथे मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न.विजेते र्धकांना रोख बक्षिसे, ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

लोहारा ता.पाचोरामहात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने समता,बंधुता,सदाचार व शांतीचा संदेश देण्यासाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दादाश्री विश्व लॉन्स डॉ जे जी पंडित माध्यमिक विद्यालय पाचोरा रोड लोहारा येथे आयोजित करण्यात आले होते. रेबीन कापून स्पर्धेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. खुला गट वय १६ ते ४०रन अप ६ किलोमीटर, प्रथम बक्षीस दीपक भोई शेंदुर्णी, द्वितीय क्रमांक बक्षीस गोपाल कोळी ,तृतीय क्रमांक सौरव राजपूत, तीन किलोमीटर खुल्या गटात प्रथम बक्षीस सुरज माळी शाहपुरा द्वितीय बक्षीस हर्षल भोई शेंदुर्णी तृतीय बक्षीस कराड नवघरे शेंदुर्णी 200 मीटर स्पर्धेत शालेय मुलांच्या गटात प्रथम बक्षीस प्रथमेश धोबी लोहारा, द्वितीय बक्षीस प्रितेश कुंभार लोहारा तृतीय बक्षीस भूषण मीना कासमपुरा 200 मीटर मुलींच्या गटात प्रथम बक्षीस निहार राजपूत कासमपुरा,द्वितीय बक्षीस मोनाली कोळी लोहारा ,तृतीय बक्षीस डिंपल थोरात कासमपुरा. 100 मीटर शालेय मुलींच्या गटात प्रथम बक्षीस दुर्गेश्वरी परदेशी कासमपुरा,द्वितीय बक्षीस खुशी गोंधळे लोहारा ,तृतीय बक्षीस विशाखा खाटीक लोहारा. 100 मीटर शालेय गट मुलांचा प्रथम बक्षीस आसिफ पिंजारी लोहारा,द्वितीय बक्षिस मोहन कोळी लोहारा, तृतीय बक्षीस सार्थक चौधरी लोहारा, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी यशोदाबेन मोदी कृषीभूषण कृषीरत्न विश्वासराव पाटील, ,डॉ सागर गरुड,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे, सरपंच अक्षय जैस्वाल, डॉ प्रितेश चौधरी,विकासो चेअरमन प्रभाकर चौधरी, माजी सरपंच अमृत चौधरी, माजी मुख्याध्यापक अ अ पटेल, ज्येष्ठ नागरिक लक्ष्मण माळी, भोसंडे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्य ईश्वर देशमुख, सुरेश चौधरी, पत्रकार दीपक पवार, रमेश शेळके, चंद्रकांत पाटील, दिलीप चौधरी, ज्ञानेश्वर राजपूत, गजानन क्षीरसागर, अनिल तडवी, उपस्थित होते. स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून तडवी सर,धोनी सर,गायकवाड सर, गुजर सर, पी .एम.सुर्वे सर यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी उमेश देशमुख,नंदू सुर्वे,हितेश पालीवाल,रमेश कोळी,नाना चौधरी,गुणवंत सरोदे,सुनील बाविस्कर,भूषण शिवदे, यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम कलाल यांनी केले या कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे जेष्ठ नेते शरद सोनार,ईश्वर देशमुख, सुरेश चौधरी,जनजागृती बहुउद्देशीय संस्था लोहारा यांनी केले होते.

Read More

जामनेर – बीजेएस कार्यकर्ता सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधीभारतीय जैन संघटनेच्या(बीजेएस)40 वर्षाच्या इतिहासात प्रथमतः ग्राउंड लेव्हलच्या कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्ता सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या प्रेरणेने व मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 7 मे 2026 रोजी संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान आधी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून 288 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला.कार्यक्रमाची सुरुवात नमस्कार महामंत्राने करून सुरुवातीला संघटनेच्या सामुदायिक विवाह कार्यक्रम ज्यात शांतीलाल मुथा यांच्या मुलांचा विवाह केला होता. त्यानंतर परिचय संमेलन, 1993 मधील लातूर भूकंप,जम्मू कश्मीर अंदमान निकोबार, नेपाळ , मेळघाट येथील कामे, 2018 मध्ये पाण्याच्या संदर्भात बुलढाणा येथे पायलट प्रोजेक्ट,2024 मध्ये भारतातील 100 शहरे जल पर्याप्त म्हणून पर्यंत घेतले, 2019 पासून मूल्यवर्धन शिक्षण, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार आदी कामांची माहिती कोमल जैन यांनी दिली.यानंतर संघटना परिवार व नातेसंबंध, मूल्य आणि आचरण,प्राकृतिक संसाधनाचे रक्षण, शिक्षण विकास, नैसर्गिक आपत्ती, आरोग्य संपदा व भ्रमण या 7 बाबींवर काम करीत असल्याचे सांगितले.संघटनेच्या बास्केटमध्ये वर्षभरातील 14फाउंडेशन कार्यक्रम याशिवाय स्मार्ट गर्ल,एमएसएमई,परिणय पथ,कपल एम्पॉवरमेंट आदी व नव्याने येत असलेल्या कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच शाखा म्हणजे काय,स्थापना कशी करावी, कार्यकारणी किती सदस्यांची असावी, आर्थिक नियोजन कसे करावे याबाबत ऊहापोह केला गेला. देशात बारा राज्यात संघटनेची कार्य असून एकूण 700 शाखा व 50 हजार कार्यकर्ते आहेत.राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी पंकज चोपडा दिनेश पालरेचा, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष केतन शहा, राज्य महासचिव प्रवीण पारख,राज्य उपाध्यक्ष विनय पारख, राज्य सचिव, राज्य कार्यकारणीखान्देश विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा ,अशोक राखेचा,विभाग उप अध्यक्ष सुमित मुनोत, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अल्पेश जैन,जलगांव जिल्हा सचिव दर्शन जैन,जामनेर महिला अध्यक्ष मोना चोरड़िया आणि मुख्य कार्यालयाकडून अमित ढाणे,अभिजीत पेटकर, विविध शाखांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.असे प्रशिक्षण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे कोमल जैन यांनी सांगितले.

Read More

जामनेर पंचायत समितीमार्फत 9820 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास घरकुल मंजुरीपत्र वाटप

जामनेर रविवार, 23 फेब्रुवारी, 2025 जामनेर प्रतिनिधी (सुपडू जाधव )प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा क्रमांक दोन अंतर्गत देशभरात 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे आदेश देण्यात आले असून, त्यामध्ये जामनेर तालुक्यातील 9820 लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. पंचायत समितीमार्फत लाभार्थ्यांना मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले असून, त्यातील 7744 लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याचे 15,000 रुपये जमा करण्यात आले आहेत. यावेळी झालेल्या कार्यक्रमात माजी बांधकाम अभियंता जे. के. चव्हाण, माजी उपसभापती नवल राजपूत, माजी पंचायत समिती सदस्य अमर पाटील, रमण चौधरी, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, माजी सरपंच कमलाकर पाटील, तुकाराम निकम, शांताराम बिलोरे, धनराज मोरे, आनंदा लावरे, जितेंद्र माळी, विस्तार अधिकारी अशोक पालवे यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला एकूण ₹1,46,000 अनुदान मिळणार आहे. पहिला हप्ता जमा झाल्यानंतर लाभार्थ्यांनी तात्काळ घरकुल बांधकाम सुरू करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असून, सरकारच्या घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे.

Read More

जामनेर नगरपरिषद निवडणूक : प्रभाग 12-अ मधून अरविंद शांताराम तायडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

जामनेर – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होताच प्रभाग क्रमांक 12-अ मध्ये राजकीय तापमान चढले आहे. अजित पवार गटाकडून अरविंद शांताराम तायडे यांनी आज दिमाखात आपला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढविण्याची अधिकृत घोषणा केली. अर्ज दाखल करताना कार्यकर्त्यांची उपस्थिती, उत्साह आणि घोषणाबाजी यामुळे परिसरात निवडणुकीची रंगत चांगलीच वाढलेली दिसली. समाजसेवक, सक्रिय युवा नेता म्हणून प्रभागात ठसठशीत ओळख निर्माण केलेले अरविंद तायडे गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहेत. नागरिकांशी थेट संवाद, सामाजिक कार्यात सहभाग आणि प्रभागातील मूलभूत सुविधांसाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांची जनसंपर्काची मजबूत पकड निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना तायडे म्हणाले, “पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता यांसह नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना प्राधान्य देऊन काम करणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. जनतेचा विश्वास जिंकून त्यांच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.” तायडे यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग 12-अ मध्ये चुरस अधिक तीव्र होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. युवा मतदारांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात असून, अंतिम टप्प्यात कोणाच्या बाजूने जनमत कलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read More

कुऱ्हाड ता पाचोरा येथे भारतीय जनता पार्टी विकसित भारत संकल्प सभा संपन्न

लोहारा ता. पाचोरा दि.१९कुऱ्हाड ता पाचोरा येथे भारतीय जनता पार्टी विकसित भारत संकल्प सभा संपन्नपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखालील भाजपा सरकारला अकरा वर्षे पूर्ण झाली.विकसित भारताचा अमृत काळ सेवा, सुशासन ,गरीब कल्याणाची या अकरा वर्षाच्या काळातील लेखा जोखा मांडण्यासाठी मा. नामदार गिरीषभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शना खाली विकसित भारत संकल्प सभेचे आयोजन कुऱ्हाड येथे दि.१९ रोजी आयोजन करण्यात आले.या सभेचे अध्यक्ष पाचोरा तालुक्याचे माजी आमदार दिलीप ओंकार वाघ हे होते. सभेचे वक्ते जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, पंचायत समिती माजी सभापती सुभाष पाटील, कैलास चौधरी, शरद सोनार हे होते. यावेळी क्त्यांनी मोदीजींच्या काळात झालेली विकास कामे सांगितले. , तसेच कलम 35 अ,देशातील जनतेच्या भावनांची कदर करून ३७० वे कलम रद्द करण्याचा धाडसी निर्णय मोदी सरकारने घेऊन दाखवला. भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानला भारतीय सैन्य दलाने ‘दे माय धरणी ठाय’ करून सोडले. पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानप्रेरित होता हे भारताने जगाला ठणकावून सांगितले.तसेच शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना, महा डीबीटी द्वारे शेतकऱ्यांना मिळणारे थेट अनुदान, शेतीसाठी लागणारे उपकरणे जसे की ट्रॅक्टर, रोटर, पेरणी यंत्र, उज्वला योजनेत मोफत गॅस सिलेंडर. तसेच शेतकऱ्यां साठी मागेल त्याला सोलर, सूर्य घर योजना, प्रधानमंत्री घरकुल आवास योजना कुठलीही पायपीट न करता मिळत असल्याचे सांगितले. खाजगी वाहनधारकांना तीन हजार रुपयां मध्ये वर्ष भारतासाठी नॅशनल हायवे वरील टोल साठी पास मिळत आहे.देशात ८० कोटी गरीब जनतेला दरमहा पाच किलो अन्नधान्य मोफत दिले जात आहे. अश्या अनेक योजना मोदीजींच्या काळात जनतेला मिळत आहे.मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा गेल्या अकरा वर्षांत कायापालट झाला आहे व होतो आहे. मोदी यांच्या नेतृत्वावर देशातील जनतेचा मोठा विश्वास आहेच, यापुढेही जनता त्यांना साथ देईल असा आम्हाला विश्वास आहे असे वक्त्यांनी सांगितले.यावेळी भाजपा पाचोरा पूर्व अध्यक्ष शोभाताई तेली,भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस मुकेश पाटील,शेतकी संघ संचालक शिवदास तात्या पाटील, प्रकाश पाटील, नरू बापू पाटील तसेच लोहारा-कुऱ्हाड-गोराडखेडा गटातील शेतकरी, नागरिक, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते , गट प्रमुख, गण प्रमुख, शक्ती प्रमुख, केंद्रप्रमुख , बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख , विभागातील सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, सदस्य ग्रामपंचायत सदस्य उपस्थितीत होते.प्रास्ताविक शरद सोनार, सूत्रसंचालन कैलास चौधरी तर आभार चंद्रकांत पाटील यांनी मानले.

Read More

जामनेर तालुक्यात स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसीची मोहीम सुरू

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर, (प्रतिनिधी)सुपडू जाधव : तालुक्यातील रेशन धान्यास पात्र कुटुंबाची ई-केवायसी सुरू झाली आहे. प्रत्येक लाभार्थ्याने स्वस्त दुकानदाराकडे आवश्यक कागदपत्रे सादर करून ई-केवायसी करणे आवश्यक असून ३१ मार्च पर्यंत या करिता मुदत दिली आहे. वेळेत लाभार्थ्यांनी ई-केवायसी करावी असे अवाहन जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे व पुरवठा निरीक्षण अधिकारी नारायण सुर्वे यांनी केले आहे.अंतोदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे सर्व शिधा पत्रिका धारकांना ते अनिवार्य असून त्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत आहे. मुदतीत आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी न केल्यास धान्य मिळणार नसल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे व पुरवठा निरीक्षण अधिकारी नारायण सुर्वे माहिती यांनी दिली.

Read More

प्रॉपर्टी डीलर म्हणून ओळख असलेल्या रामेश्वर नथू बिजागरे यांची गळफास घेऊन आत्महत्या

जामनेर तालुक्यात मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. प्रॉपर्टी डीलर म्हणून ओळख असलेल्या रामेश्वर नथू बिजागरे (वय 40, रा. चिंचखेडा तवा) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एका मित्राला फोन करून ही माहिती दिली होती, मात्र मदतीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, रामेश्वर बिजागरे हे लाखोंच्या जमिनीच्या व्यवहारांमुळे जामनेर परिसरात परिचित होते. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे जामनेर-बोदवड रोडवरील भवानी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. नंतर काही मित्रांसह धाब्यावर जेवणही केले. त्यानंतर त्यांनी एका निकटवर्तीय मित्राला फोन करून “आपण आत्महत्या करत आहे,” असे सांगितले. संबंधित मित्राने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु काही वेळाने त्यांचा फोन बंद यायला लागला. यानंतर मित्रांनी लोकेशनवरून शोध घेत भवानी घाट परिसर गाठला असता, बिजागरे यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, या चिठ्ठीत काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली असून, पैशांचे व्यवहार, देणे-घेणे यांचा उल्लेख असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, मृत्यूमागील कारणे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. रामेश्वर बिजागरे यांनी अल्पावधीतच आर्थिक प्रगती केली होती. प्रॉपर्टी डीलिंगच्या माध्यमातून त्यांचे अनेकांशी व्यवहार होते. या व्यवहारांमुळे मानसिक तणाव होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चिंचखेडा गावात तसेच जामनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

श्री शामराव पाटील कुरे व सौभाग्यवती चौत्राबाई शामराव कुरे यांचा 51 वा लग्नाचा सुवर्ण महोत्सव उत्साहात साजरा

प्रतिनिधी हानुमंत चंदनकर ====================== नांदेडच्या नायगांव तालुक्यातील ताकबीड येथील श्री शामराव पाटील कुरे सौभाग्यवती चौत्राबाई शामराव कुरे यांच्या लग्नाचा 51 वा सुवर्ण महोत्सव आज दिनांक 19 मे रोजी साई तीर्थ मंगल कार्यालय नायगाव येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला त्यांच्या मुलांनी यशवंत कुरे, बसवंत कुरे, भास्कर कुरे,कैलास कुरे या चार भावांच्या संकल्पनेतून आयोजित केलेला हा सोहळा आनंदी उत्साहात संपन्न झाला यांत आई वडीलांचा आनंद साजरा करण्यासाठी विवाह प्रसंगा प्रमाणे आई वडीलांना दाग दागिने, पारंपारिक शाही पोशाख धोतर सदरा फेटा दोन अंगठी, गळ्यातील चैन आईसाठी नववधू प्रमाणे सर्व अलंकार ऐटबाज दोघांची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक लग्नाचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी श्री केशवराव बळवंतरावजी पाटील चव्हाण, सुधाकररावजी पाटील चव्हाण व नायगांव नगरपंचायतीचे नगर उपाध्यक्ष युवा नेते विजय पाटील चव्हाण, तंटामुक्त समितीचे तालुका अध्यक्ष हनमंतराव पाटील चव्हाण, नायगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रीनिवासरावजी पाटील चव्हाण, माधवरावजी बेळगे, देविदासजी बोमनाळे व जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजयजी बेळगे साहेब डॉ. शिंपाळे साहेब, डॉ. कुऱ्हाडे साहेब व पत्रकार बाळासाहेब पांडे सर, चंदनकर सर, राम मोरे सर व नगरसेवक संजय पा. चव्हाण, शिवाजी पा. कल्याण नगरसेवक विठ्ठल आप्पा बेळगे, नगरसेवक पांडुरंग पा. चव्हाण, साहेबराव पा शिंदे, माधव शंकरराव बेळगे, दत्तात्रय शिंदे सर, पवन गादेवार, बसंतराव मुंके सुभाषराव मुंके आणि चव्हाण पाटील मित्र मंडळ व ताकबीड येथील सरपंच रंजीत पा. कुरे, सराफा व्यापारी ज्ञानेश्वर सावकार कवटीकवर, हनमंत पा. चव्हाण कैलास पा. कल्याण व इतर सर्व सराफा व्यापारी व किराणा व्यापारी रमेश सावकर चिद्रावार प्रकाश सावकार कवटीवार अनिल गादेवार व सर्व किराणा व्यापारी तसेच सौभाग्यवती चौत्राबई शामराव कुरे यांचे माहेर लालवंडी येथील बाबुरावजी लंगडापुरे ,भगवानरावजी लंगडापुरे व शंकररावजी दगडगावे विश्वनाथजी केरुरे पिराजी भुसेवाड बाबुराव दगडगावे व लालवंडी, ताकबीड व नायगाव येथील सर्व नागरिक कुरे परिवारातील सर्व बाईलेकीचे पाहुणे मंडळी व करामुंगे,शिराळे, जनकवाडे, परिवार, व इतर सर्व आप्तस्वकीय नातेवाईक यांसह परिसरातील नागरिक उपस्थित राहून भरभरून शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमात आई-वडिलांबद्दल या चार भावंडांनी केलेला हा आई-वडिलांचा सोहळा आज उपयोगी समाजाला प्रेरणादायी ठरू शकते असे मनोगत व्यक्त केले आणि या चार भावंडांचे कौतुक व शुभेच्छा रुपी आशीर्वाद दिले व मोलाचे मार्गदर्शन नगर पंचायत उपाध्यक्ष विजयजी पाटील चव्हाण ,संजयजी बेळगे साहेब व सौ. सरोजिनी शिंपाळे मॅडम यांनी केले कार्यक्रमाची प्रस्तावना व्यंकट पाटील शिंदे व कार्यक्रमाचे आभार कैलास कुरे यांनी केले

Read More

ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासह महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी जिल्हादंडाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा

जळगाव, दि. ७ एप्रिल (प्रतिनिधी) — ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासह महसूल प्रशासनाला गती देण्यासाठी जिल्हादंडाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पोलीस पाटलांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा जिल्हा नियोजन सभागृहात उत्साहात पार पडली. या कार्यशाळेस जिल्हाभरातील पोलीस पाटलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी श्री. श्रीमंत हारकर, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते तसेच अपर जिल्हादंडाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विविध विभागांच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी पोलीस पाटलांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.महसूल प्रशासनासंदर्भात उपविभागीय दंडाधिकारी (फैजपूर) श्री. बबन काकडे यांनी पोलीस पाटलांची भूमिका स्पष्ट केली, तर उपविभागीय पोलीस अधिकारी (जळगाव) श्री. नितीन गणापुरे यांनी गुन्हे नियंत्रणासाठी पोलीस दलाशी समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. नरवीर रावळ यांनी आपत्तीच्या काळात प्रथम प्रतिसादक म्हणून पोलीस पाटलांची जबाबदारी विशद केली. तसेच उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती अर्चना मोरे यांनी आचारसंहिता पालन व सुरक्षित मतदान प्रक्रियेतील कर्तव्यांबाबत माहिती दिली.गाव पातळीवर प्रशासन व नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील कार्यरत असून त्यांच्या सजगतेमुळे ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ होते. या कार्यशाळेमुळे त्यांच्या कामकाजात अधिक स्पष्टता व गती येणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.“पोलीस पाटील हे गावातील प्रशासनाचे डोळे आणि कान आहेत. त्यांच्या सजगतेमुळेच ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्थेचे पालन सुलभ होते,” असे जिल्हा प्रशासनाने नमूद केले.जिल्हा प्रशासनाने अशा प्रशिक्षणात्मक उपक्रमांद्वारे ग्रामीण प्रशासन अधिक सक्षम व उत्तरदायी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Read More
error: Don't Try To Copy !!