Headlines

राज्यभरात ‘जामनेर’ पंचायत समिती चा नावलौकिक

जामनेर पंचायत समितीचा राज्यात नावलौकिक 2023-24 साठी उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर समितीला राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक १७ लाख रुपये आणि विभागीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ११ लाख रुपये असे एकूण २८ लाख रुपयांचे पुरस्कार घोषित झाले जामनेर प्रतिनिधीराज्यभरात ‘जामनेर’ पंचायत समिती चा नावलौकिक जामनेर पंचायत समिती दुहेरी पुरस्कार ने सन्मानित गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली जामनेर पंचायत समितीचं घवघवीत यशसविस्तर..जामनेर (जि. जळगाव) पंचायत राज संस्थांमधील उत्कृष्ट कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानात जामनेर पंचायत समितीने राज्यभरात आपला ठसा उमटवत मोठे यश संपादन केले आहे. वर्ष 2023-24 साठी उत्कृष्ट कामगिरीच्या आधारावर समितीला राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक १७ लाख रुपये आणि विभागीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ११ लाख रुपये असे एकूण २८ लाख रुपयांचे पुरस्कार घोषित झाले आहेत.ग्रामविकास, प्रशासन व्यवस्थापन, नवोपक्रम, पारदर्शकता आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांचा सखोल आढावा घेत ही निवड केली गेली. जामनेर पंचायत समितीने या सर्वच निकषांवर आपली ठसा उमटवत इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.या यशामागे गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांचे कुशल नेतृत्व, समर्पित अधिकारी-कर्मचाऱ्यांची मेहनत आणि गाव पातळीवरील लोकप्रतिनिधींचा व कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग या सर्वांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून जामनेर तालुक्याचा विकास मार्ग सुकर झाला असून, ग्रामविकासाच्या दिशेने एक नवे पर्व सुरू झाले आहे.या दणदणीत यशामुळे जामनेर तालुक्याचा राज्यस्तरीय नावलौकिक वाढला असून, पुढील वाटचालीसाठी एक भक्कम पायाभूत आधार मिळाला आहे

Read More

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर दक्षता पथकांची होणार स्थापना

मुंबई, : राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करण्यासह शासनाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोगस बांधकाम कामगार आणि दलालांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध भागातून लोकप्रतिनिधी व बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नोंदणी, कीट वाटप व अन्य बाबतीत गैरप्रकार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यभरात जिल्हास्तरावर कामगारांची पडताळणी करण्यासाठी दक्षता पथके स्थापन करून प्रभावी तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक विभागात, प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कार्यालय प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र जिल्हास्तरीय दक्षता पथक गठीत करण्यात येणार आहे. या पथकांचे कार्यक्षेत्र मात्र त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्याऐवजी दुसऱ्या जिल्ह्यावर असेल, जेणेकरून कारवाई अधिक निष्पक्ष आणि प्रभावी राहील. दक्षता पथकांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे होणारी नोंदणी, नोंदणीसाठी पैसे मागण्याचे प्रकार तसेच खोटे दाखले सादर करून मिळविले जाणारे लाभ या बाबींवर लक्ष केंद्रित करून तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. संबंधित दलालांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल. या मोहिमेसाठी क्षेत्रीय कार्यालयांना वाहन भाडेतत्वावर घेण्याची परवानगी देण्यात आली असून, तपासणीसाठी आवश्यक इतर खर्चही प्रशासकीय निधीतून नियमानुसार करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय दक्षता पथक प्रमुखांनी त्यांच्या कारवाईचा सविस्तर अहवाल विभागीय प्रमुखांना सादर करावयाचा आहे. विभागीय प्रमुख सर्व जिल्ह्यांचे अहवाल एकत्र करून आपल्या अभिप्रायासह मंडळ मुख्यालयास सादर करतील.ही विशेष तपासणी मोहीम प्रथम टप्प्यात १० जुलै, २०२५ अखेरपर्यंत राबविली जाणार आहे. या तपासणी दरम्यान ज्यांना काही तक्रारी असतील त्यांना त्या दक्षता पथकाकडे देता येतील. प्रत्येक पथकाने दरमहा किमान एक तपासणी करणे बंधनकारक असून, त्या तपासण्यांचे संकलित अहवाल मंडळास दरमहा सादर करणे आवश्यक राहील. या निर्णयामुळे राज्यातील बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर प्रभावी आळा बसेल, अशी अपेक्षा कामगारमंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली आहे.

Read More

भाजपा जळगांव जिल्ह्याची “संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक” मंत्री श्री.गिरीषजी महाजन यांच्या उपस्थितीत संपन्न

जळगांव –येथे भारतीय जनता पार्टी जळगांव जिल्हा ची “संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक” चे मंत्री श्री.गिरीष महाजन, मंत्री श्री.संजयजी सावकारे व खासदार तथा मंत्री रक्षा खडसे यांचे प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत उपस्थित प्रमुख मान्यवर यांनी भाजपा प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांना केंद्र व राज्य स्तरावरून पक्षामार्फत आलेल्या विविध आगामी कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करून माहिती दिली. तसेच प्राथमिक सदस्य नोंदणी, सक्रीय सदस्य नोंदणी, नवीन मंडल रचना व बूथ रचना बाबत मार्गदर्शन करून कार्यकर्ते यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी मंत्री श्री.गिरीष महाजन, मंत्री श्री.संजयजी सावकारे, आमदार श्री.अमोल हरिभाऊ जावळे, आमदार श्री. सुरेशजी भोळे, आमदार श्री.मंगेशजी चव्हाण व भाजपा जिल्हा प्रमुख पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

Read More

कायदा-सुव्यवस्थेसाठी कटिबद्ध… जामनेर पोलीस स्टेशनला उपनिरीक्षक किशोर पाटील यांची नियुक्ती

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजामनेर: जामनेर शहराच्या सुरक्षेसाठी आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, किशोर पाटील यांची जामनेर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या आगमनामुळे शहरातील नागरिकांमध्ये नवीन विश्वास निर्माण झाला असून, कायद्याच्या अंमलबजावणीला अधिक बळकटी मिळणार आहे किशोर पाटील यांनी जामनेर शहराच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. पोलिस आणि नागरिक यांच्यात समन्वय वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.संवादादरम्यान, उपनिरीक्षक पाटील यांनी जामनेरमध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील असे स्पष्ट केले. बेकायदेशीर कृत्यांवर त्वरित कारवाई केली जाईल, तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील.नवनियुक्त उपनिरीक्षक पाटील यांची नियुक्ती झाल्यापासून स्थानिक नागरिक, व्यापारी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्व स्तरांतून त्यांचे स्वागत होत असून, शहराच्या सुरक्षेसाठी त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे.जामनेरच्या विकासात आणि सुरक्षिततेच्या दिशेने ही एक मोठी पावले उचलली गेली असून, उपनिरीक्षक किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली जामनेर पोलिसांकडून प्रभावी कार्यवाही अपेक्षित आहे.

Read More

७० वर्षाची परंपरा जोपासत श्रीराम पेठेत बारागाड्या उत्साहात साजर्‍या.

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर /प्रतिनिधी – आपले सण आपले उत्सव आपणचं साजरे करणार या ब्रिद वाक्याखाली पारंपरिक पद्धतीने सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य बारागाड्या उत्सव शहरातील श्रीराम पेठ भागातील दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत ओढल्या गेल्या स्व. देवचंदबाबा शिंदे यांच्या प्रेरणेने सुरु केलेल्या बारागाड्या उत्सवाला आज सुमारे ७० वर्षाची परंपरा लाभली आहे. सविस्तर माहिती अशी श्रीराम पेठ भागात असलेले श्रीराम पेठ वासियांचे ग्रामदैवत तथा आराध्य दैवत असलेले खंडेराव महाराज यांच्या नावाने या भागात बारागाड्या ओढल्या जातात. या उत्सवास आज ७० वर्षाची परंपरा लाभली आहे सामाजिक एकात्मता हिच श्रीराम पेठ वासियांची ओळख असल्याने हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. सद्ध्या तरी या बारागाड्या उत्सव काठीचा मान हा शिंदे परीवारा कडे असुन श्रीराम पेठ भागातील रहिवाश्यांकडुन तसेच शिंदे परीवारातील सदस्यांनी हा पारंपरिक व पुरातन वारसा कायम ठेवला आहे. दसरा मैदान ते हनुमान मंदिरात पर्यंत या बारागाड्या ओढल्या जातात तर पंचक्रोशीतील हजारोंच्या संख्येने भाविक या उत्स्वात हजारोंच्या संख्येने सहभागी होत सोहळा साजरा करतात तर “खंडेराव महाराज की जय” तर “येळकोट येळकोट जय मल्हार” या घोषणांनी आसमान दणाणून सोडला जातो. आज जरी श्रीराम पेठ भागातील रहिवासी शहराच्या अन्य भागात विखुरलेले असले तरी आजच्या दिवशी लहान पासुन ते वयोवृद्ध व्यक्ती तसेच महिला आवर्जून मोठ्या संख्येने उपस्थित होतात. आज इंटरनेट युगात सुद्धा हि परंपरा टिकवून ठेवल्याचा आनंद आहे असा विश्वास श्रीराम पेठ भागातील रहिवासी मान्य करतात. त्यामुळे हिच सामाजिक एकता शहरात कुतुहलाचे मुख्य कारण ठरले आहे हा भव्य दिव्य सोहळा मोबाईलच्या कॅमेर्‍यात भाविकांनी कैद केला. खोबरे भंडाऱ्याची उधळण करुन मोठ्या धार्मिक वातावरणात नियोजित भक्तां करवी बारागाड्या ओढल्या जातात तर बारागाड्या ओढल्या नंतर उडीद व भाकर भंडाऱ्याची तथा महाप्रसादाचा लाभ भाविक घेत असतात या महाप्रसाद वाटपासाठी खंडेराव महाराज सेवा समिती कार्यान्वित असते.

Read More

प्रॉपर्टी डीलर म्हणून ओळख असलेल्या रामेश्वर नथू बिजागरे यांची गळफास घेऊन आत्महत्या

जामनेर तालुक्यात मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. प्रॉपर्टी डीलर म्हणून ओळख असलेल्या रामेश्वर नथू बिजागरे (वय 40, रा. चिंचखेडा तवा) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एका मित्राला फोन करून ही माहिती दिली होती, मात्र मदतीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, रामेश्वर बिजागरे हे लाखोंच्या जमिनीच्या व्यवहारांमुळे जामनेर परिसरात परिचित होते. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे जामनेर-बोदवड रोडवरील भवानी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. नंतर काही मित्रांसह धाब्यावर जेवणही केले. त्यानंतर त्यांनी एका निकटवर्तीय मित्राला फोन करून “आपण आत्महत्या करत आहे,” असे सांगितले. संबंधित मित्राने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु काही वेळाने त्यांचा फोन बंद यायला लागला. यानंतर मित्रांनी लोकेशनवरून शोध घेत भवानी घाट परिसर गाठला असता, बिजागरे यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, या चिठ्ठीत काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली असून, पैशांचे व्यवहार, देणे-घेणे यांचा उल्लेख असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, मृत्यूमागील कारणे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. रामेश्वर बिजागरे यांनी अल्पावधीतच आर्थिक प्रगती केली होती. प्रॉपर्टी डीलिंगच्या माध्यमातून त्यांचे अनेकांशी व्यवहार होते. या व्यवहारांमुळे मानसिक तणाव होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चिंचखेडा गावात तसेच जामनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

लेवा पाटीदार महासंघाकडून सौ. पुनम विजय फालक यांचा गौरव म्हणजे आमच्या फालक परिवाराचा अभिमान— ताप्ती एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष मोहन फालक

भुसावळ –येथील ताप्ती पब्लिक विद्यालयाच्या ऊपशिक्षीका, आदर्श शिक्षिका पुरस्कार तसेच मानाचा शाहु महाराज मानाचा नारी रत्न पुरस्कार प्राप्त व आंतरराष्ट्रीय संस्थेकडून शिक्षा शिरोमणी पुरस्कार प्राप्त सौ.पूनम विजय फालक यांनी केलेल्या कार्याची दखल लेवा पाटीदार महासंघाने घेतली असून त्यांना थोपटे लॉन्स, रहाटणी, पुणे येथे लेवा पाटीदार महासंघातर्फे कर्तृत्ववान महिला हा पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक व महानगरपालिकेचे सभागृह नेते तसेच स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे संचालक,नामदेव दादा ढाके, लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, डि.जी.पी डाँ सुहास वारके, गोदावरी फाउंडेशन च्याअध्यक्षा व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डाॅ. केतकी उल्हास पाटील, जळगाव लेवा समाज मंडळ अध्यक्ष , एल एम सी ग्रुप चे अध्यक्ष मिलींद चौधरी, तसेच लेवा पाटीदार महासंघाचे सदस्य विजय फालक ,भंगाळे गोल्ड जळगावच्या संचालिका सुरेखा भंगाळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते त्यांना गौरवण्यात आले. या प्रसंगी मोठ्या संखेने समाज बांधव व महिला ऊपस्थित होते.पुरस्कार सोहळ्यानंतर अँड.जयश्री पाचपांडे,दिपक पाचपांडे,समाजसेवी खुशबु फिरके,चंदन फिरके यांचेसह अनेक ऊपस्थीतांनी त्यांचे अभिनंदन केले. सौ.पुनम फालक यांनी पुरस्कारांचा चौकार मारल्याबद्यल कुर्‍हे पानाचे येथील जयलक्ष्मी अँकेडेमी ने अभिनंदन समारोहचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गणेश आरतीने झाली.हा पुरस्कार फक्त पुरस्कार नसुन फालक परिवाराचा अभिमान असून सौ. पूनम फालक यांनी घेतलेल्या मेहनतीचे, आदर्शाचे व कार्य तप्तरतेचे, चिकाटीचे,कार्यक्षमतेचे द्योतक आहे. यामुळे परीवाराला,समाजाला प्रेरणा मिळते. मला नमूद करावेसे वाटते की मी अध्यक्ष असलेल्या संस्थेत त्या कार्यरत आहे . त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटला असून यापुढे सुद्धा त्यांनी जिद्दीने, मेहनतीने नवनवीन क्षेत्र पदांक्रांत करून संस्थेचे, विद्यालयाचे व परिवाराचे नाव उज्वल करावे. त्यांनी आजपर्यंत घेतलेल्या मेहनतीचे कष्टाचे प्रयत्नाचे व संसार रुपी भवसागरात ठामपणे उभे राहिलेल्या व आदर्श निर्माण करणाऱ्या आदर्श व्यक्तीचा सत्कार करतांना आम्हाला धन्यता वाटत आहे व यांचाच आम्हाला अभिमान आहे असे संस्थाध्यक्ष मोहन मोरेश्वर फालक यांनी नमुद केले.

Read More

मैत्रेंय प्रकरण:- कोर्टात महत्त्वाची सुनावणी, मालमत्ता विक्रीसाठी आदेश.

मुंबई: 17 फेब्रुवारी 2025 – मुंबई सत्र न्यायालयात आज वर्षा मधुसुदन सत्पाळकर आणि अन्य आरोपींविरुद्ध महत्त्वाची सुनावणी पार पडली. विशेष सत्र न्यायालय क्रमांक 20 मधील न्यायमूर्ती एन. जी. शुक्ला यांच्या समोर ही सुनावणी झाली. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि विविध गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे.राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील (SPP) प्रदीप घरत यांनी बाजू मांडली, तर एपीआय (EOW) श्री. सालुंके आणि पीसी श्री. डी. सुर्यभान हे देखील उपस्थित होते. गुंतवणूकदारांचे प्रतिनिधित्व करणारे अधिवक्ता एस. बी. भटगुनाकी आणि त्यांच्या संघाने युक्तिवाद केला. मात्र, आरोपी जामिनावर असूनही कोर्टात अनुपस्थित होते, याची नोंद घेण्यात आली. यावेळी, सीए श्री. रविंद्र शिंगाडे यांनी मालमत्ता विक्रीसंदर्भातील अहवाल सादर केला, ज्याला “टॉर एक्झ.16” म्हणून चिन्हांकित करण्यात आले. या अहवालानुसार, राज्य सरकारने क्विकर रिअॅलिटी प्रा. लिमिटेड या वित्तीय आस्थापनेची नेमणूक केली आहे. मैत्रेया ग्रुप ऑफ कंपन्या या गटाच्या संलग्न मालमत्तांची लिलाव विक्री करण्यासाठी ही नेमणूक करण्यात आली आहे.कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 मार्च 2025 रोजी ठेवली असून, त्यापर्यंत लिलाव प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांबाबत सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.आर्थिक गैरव्यवहार, गुंतवणूकदारांची फसवणूक आणि मालमत्ता जप्ती यामुळे गाजत असलेल्या या प्रकरणाकडे सर्वांचेच लक्ष आहे. पुढील सुनावणीत लिलाव प्रक्रियेचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

Read More

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सहकारी सूतगिरणीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मंत्रालयात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

मुंबई, दि. ७ एप्रिल (प्रतिनिधी) — जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सहकारी सूतगिरणीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मंत्रालयात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात ही बैठक झाली.बैठकीत वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार यांनी सूतगिरणीच्या सद्यस्थितीचा आढावा सादर करत कामकाजातील अडचणी व प्रलंबित मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सूतगिरणीच्या कार्यपद्धती, तांत्रिक बाबी व उत्पादन क्षमतेसंदर्भात चर्चा केली. सूतगिरणीसमोरील अडचणी दूर करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत मंत्री श्री. महाजन यांनी वस्त्रोद्योग विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यामुळे सूतगिरणीच्या कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.या बैठकीस वस्त्रोद्योग आयुक्त श्री. संजय दैने, मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव श्री. प्रल्हाद रोडे, मंत्री श्री. महाजन यांचे खाजगी सचिव जयराज कारभारी, प्रादेशिक उपआयुक्त श्री. दीपक खांडेकर, कक्ष अधिकारी श्री. हरीशकुमार कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी ऑनलाइन प्रणालीद्वारे उपस्थित होते.सदर बैठकीत सूतगिरणीच्या प्रगतीसाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला असून, लवकरच ठोस निर्णयांची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read More

जामनेर तालुका मराठा सेवा संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर…!

जामनेर :- दि. 30/03/2025 रोजी मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथ यात्रा व मराठा जोडो अभियान चे औचित्यसाधत जामनेर तालुका मराठा सेवा संघाची नुतन कार्यकारणी गठित करण्यात आली.जामनेर येथील मराठा समाज मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करत जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मा.शिवश्री सुमित पाटील तर प्रमुख अतिथी म्हणुन सेवा संघ राज्यउपाध्यक्ष मा.शिवश्री सुरेंद्र पाटील व संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष मा.शिवश्री सुरेश पाटील व निरीक्षक म्हणुन जिल्हा उपाध्यक्ष मा.शिवश्री बि.आर.पाटील सर व विशाल ला़ॅन चे संचालक डि. एन. चोैधरी विचारमंचावर उपस्थित होते. मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्ष पदी शिवश्री दिपक ढोणी पाटील तर कार्याध्यक्षपदी शिवश्री. प्रमोद पाटील, उपाध्यक्षपदी शिवश्री दिपक वारांगणे पाटील, तालुका सचिव शिवश्री किशोर पाटील , शिवश्री प्रविण पाटील सहसचिवपदी व संघटक पदी शिवश्री दशरथ भाऊ पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या मार्गदर्शक मनोगता नंतर मान्यवरांच्या हस्ते नुतन कार्यकारणीचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व 21 एप्रील रोजी मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ रथ यात्रे संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी तालुक्यातील सेवा संघ कार्यकर्ते सामाजीक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी ,शिक्षक मंडळी ,वार्तांकन करणारे वार्ताहार, बहुजन परिवर्तनवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हाकार्यध्यक्ष शिवश्री. योगेश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. शिवश्री दिपक वारांगणे पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर नवनियुक्त तालुकाध्यक्ष शिवश्री दिपक ढोणी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली.

Read More
error: Don't Try To Copy !!