Headlines

बीडच्या मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी – शिवसेनेच्या वतीने जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना निवेदन

जामनेर (प्रतिनिधी सुपडू जाधव) – बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला अनेक महिने लोटले असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडसह सर्व दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी जामनेर तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जामनेरचे पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार यांना निवेदन दिले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेने संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे. तपासादरम्यान काही धक्कादायक फोटो समोर आले असून, आरोपींनी दाखवलेली क्रूरता पाहता, त्यांना जलदगतीने कठोरातील कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी शिवसेनेची ठाम मागणी आहे. शिवसेना तालुका अध्यक्ष भरत पवार, उपजिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, शहर प्रमुख नरेंद्र धुमाळ, तालुका संघटक प्रवीण ठाकरे, गटप्रमुख सचिन सोनार, उपशहर प्रमुख खुशाल पवार, नितीन राजूरकर, विशाल, सुरेश चव्हाण आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. या मागणीची वरिष्ठ स्तरावर दखल घेतली जावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

Read More

जैन इंटरनॅशनल स्कूल, जामनेर येथे विज्ञान व भाषा प्रदर्शन उत्साहात संपन्न

जामनेर | प्रतिनिधीजैन इंटरनॅशनल स्कूल, जामनेर येथे दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी विज्ञान तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी विषयांचे प्रदर्शन उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक मॉडेल्स, प्रयोग, भाषाविषयक चार्ट, कविता तसेच सर्जनशील लेखन सादर करून आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे सचिव आदरणीय श्री. मनोज कुमारजी कावडिया व संस्थेचे सदस्य आदरणीय श्री. मयूर कावडिया प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका फिरोजा खान मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रदर्शनास शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना व सादरीकरणाचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, भाषिक कौशल्ये तसेच सर्जनशीलतेला चालना मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Read More

माजी सभापतींच्या पतीची आत्महत्या; चिठ्ठ्या सापडल्याने गूढ वाढले

जामनेर, ता.२२ (प्रतिनिधी) जामनेर शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनबर्डी परिसरातील एका निर्जनस्थळी माजी सभापती सुनंदाबाई पाटील यांचे पती प्रल्हाद पाटील (वय ६२, रा. मोयखेडा, ता. जामनेर) यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली असून, मयत प्रल्हाद पाटील यांच्या खिशात काही चिठ्ठ्या सापडल्याची प्राथमिक माहिती मिळत असल्याने आत्महत्येमागील गूढ वाढले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मोयखेडा येथील रहिवासी असलेले प्रल्हाद पाटील यांनी आज संध्याकाळी सोनबर्डी परिसराच्या मागील बाजूस असलेल्या एका निर्जनस्थळी झाडाला गळफास लावून आपले जीवन संपवले. प्रल्हाद पाटील हे व्यवसायाने शिक्षक होते आणि त्यांनी २०२१ साली स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्याच सुमारास त्यांच्या पत्नी सुनंदाबाई पाटील जामनेर पंचायत समितीच्या सभापती म्हणून कार्यरत होत्या.घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्रल्हाद पाटील यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठ्यांमुळे आत्महत्येमागे काही कारण असावे असा पोलिसांना संशय आहे. जामनेर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.प्रल्हाद पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि तीन नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या आत्महत्येने मोयखेडा आणि जामनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

डॉ.ऐश्वर्री राठोड यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मध्ये “सचिव पदी “निवड झाल्याबद्दल जळगाव जिल्हा व तसेच जामनेर तालुक्यामध्ये सर्वत्र अभिनंदन चा वर्षाव.

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी जामनेर – महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतलेले कार्य अहवालाची दखल. जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाली असताना, पक्ष सोबत खंबीरपणे एकनिष्ठतेने उभे राहणे. आणि तसेच पक्षाच्या संघटनांमध्ये मजबुतीने सहभाग घेणे व संघटनाला महत्त्व देणे. प्रत्येक आंदोलन पक्षासाठी विविधरित्या कार्य करण्याची क्षमता .ही भूमिका डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी नेहमीच आपल्या पक्षासाठी एकनिष्ठतेने दाखवली. आणि त्याचीच ही पोचपावती. वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा बरेच आरोग्य शिबिरे ,सामाजिक उपक्रम ,विविध उत्कृष्टरित्या जळगाव जिल्ह्यामध्ये तसेच जामनेर तालुक्यामध्ये डॉ. ऐश्वर्री राठोड यांनी राबविलेले आहेत. त्याची दखल AICC न्यू दिल्ली अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी आणि के.सी वेणूगोपालजी यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री .हर्षवर्धन सपकाळ यांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र काँग्रेस कमिटी मध्ये सचिव पदी डॉ. ऐश्वर्री राठोड यांची निवड झाली.

Read More

भुसावळमध्ये 30 हजारांची लाच घेताना सहकार विभागातील अधिकारी व दोन लेखापरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

जळगाव, दि. 15 जून : भुसावळ येथील सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संबंधित एका प्रकरणात सहकार अधिकारी व दोन लेखापरीक्षकांना 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी भुसावळ शहरात करण्यात आली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला सावकारी व्यवसायासाठी आवश्यक परवाना काढायचा होता. त्यासाठी संबंधित कार्यालयात अर्ज केल्यानंतर परवाना मंजूर करून देण्यासाठी सहकार अधिकारी विजय विनायक गारूड (वर्ग-3) यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती.तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. तपासादरम्यान सुरेश जनार्दन विसपुते आणि हेमंत प्रकाश काळे या प्रमाणित लेखापरीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांसाठी व स्वतःसाठी मिळून 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.सोमवारी भुसावळ शहरातील नाहाटा चौफुली परिसरात सापळा कारवाईदरम्यान सुरेश विसपुते यांनी तक्रारदाराकडून 30 हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर एसीबीने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी विजय गारूड, सुरेश विसपुते आणि हेमंत काळे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.

Read More

जामनेर येथे विश्व कॅन्सर दिनानिमित्त जनजागृती

*जामनेर येथे विश्व कॅन्सर दिनानिमित्त जनजागृती* जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर प्रतिनिधीजामनेर (वा.)-भारतीय जैन संघटना जामनेर शाखा यांच्यातर्फे विश्व कैंसर दिवसा निमित्त कैंसर जनजागृती व मार्गदर्शन संबधी व्याख्यानाचे आयोजन नविन महावीर भवन येथे आयोजित करण्यात आले.

Read More

निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्संग व सफाई अभियान

जामनेर : संत निरंकारी मिशनच्या वतीने परम पूज्य निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सत्संग व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत “मिशन अमृत – स्वच्छ जल, स्वच्छ मन” या मोहिमेअंतर्गत जामनेर शहरातील जलशुद्धीकरण केंद्र सोनबर्डी येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या अभियानामध्ये जामनेर ब्रांच आणि सेवादल UNIT – 1359 चे सर्व सेवादल भाई आणि बहन यांनी सक्रिय सहभाग घेतला. सद्गुरु माता सुदिक्षा जी महाराज यांच्या असीम कृपेने हे अभियान यशस्वीपणे पार पडले. या प्रसंगी प्रल्हादजी वाघ, रतनसिंग परदेशी, देविदास पाटील, रवींद्र शिंदे, शंकर माळी, शालिग्राम घुले, नामदेव सुरळकर, देविदास चिंचोले तसेच जामनेर, नवी दाभाडी, सोनारी, बोरगाव, पहूर येथून अनेक सेवादल सदस्य उपस्थित होते.

Read More

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी पळसखेडे (मिराचे), दि. १४ एप्रिल –धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि., शेंदुर्णी संचलित नीळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालय, पळसखेडे मिरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात व अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक किरण सोनवणे होते. यावेळी मुख्याध्यापक विकास रघुनाथ पाटील, पर्यवेक्षक जे. आर. पाटील सर, उपशिक्षक संदीप सोनवणे सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर मुख्याध्यापक विकास पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची प्रसंगिकता विषद केली. पर्यवेक्षक जे. आर. पाटील सर आणि संदीप सोनवणे सर यांनीही आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनीही आपल्या प्रभावी भाषणांतून डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा गौरव केला. कार्यक्रमाचे संयोजन व सुत्रसंचालन तीर्थराज इंगळे सर यांनी प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रमाचा समारोप आभारप्रदर्शनाने झाला, डी. आर. चौधरी सर यांनी केले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समतेचे भान आणि संविधानिक मूल्यांची जाणीव जागवली गेली.

Read More

दुभाजकावर धडकून कारने घेतला पेटगर्भवती पत्नीचा जळून मृत्यू ; पती जखमीअर्ध्यावरती डाव मोडला . . . अधुरी एक कहाणीपहूर – वाकोद मार्गावर घडली दुर्घटना

पहूर ता जामनेर रस्ता दुभाजकावर धडकलेल्या कारने क्षणात पेट घेतला आणि भडकलेल्या ज्वाळांमध्ये गर्भवती मातेचा दुर्दैवी जळून मृत्यू झाला तर कारचालक पती जखमी झाल्याची दुर्घटना जळगाव – छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ वर पहूर वाकोद दरम्यान दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली .याबाबत अधिक माहिती अशी की , संग्राम मोरे ( रा . पूलमखेडा , ता . जि . बुलढाणा ) हे भुसावळ तालुक्यातील सासूरवाडीहून छत्रपती संभाजीनगरकडे पहूरमार्गे पत्नी जान्हवी संग्राम मोरे यांच्यासह मारुती ग्रँड व्हिटारा कारने जात होते . दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांची कार वाकोद नजीक येताच समोरच्या डिव्हाइडरवर धडकली .कार डिव्हायडर वर धडकताच मोठा आवाज झाला आणि क्षणात गाडीने पेट घेतला . काही कळायच्या आतच कारमधून प्रचंड ज्वाला आणि धुराचे लोट बाहेर पडू लागले . अशाच अवस्थेत वाहनचालक संग्राम मोरेबाहेर पडले मात्र कार मध्ये असलेल्या त्यांच्या पत्नी जान्हवी संग्राम मोरे ( वय २१ वर्षे ) या मात्र आगीच्या ज्वाळांनी होरपळून जागीच मृत्युमुखी पडल्या . घटना घडतात महामार्गावर असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पाटील , परेश महाजन यांच्यासह स्थानिक नागरिक व ये -जा करणाऱ्या प्रवाशांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला .घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कोठारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली .जखमी अवस्थेत असलेले संग्राम मोरे यांना तात्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले . डॉ .राहुल निकम ,डॉ . जितेंद्र राजपूत ऋषिकेश भालेराव व सहकार्यांनी प्रथमोपचार केले .पुढील उपचारासाठी संग्राम पाटील यांना जळगाव येथे हलविण्यात आले आहे . मयत जान्हवी मोरे यांचे शवविच्छेदन पहूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले . दरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ . राहुल निकम यांच्या खबरीवरून पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कोठारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे . अग्निशमन दलाचे प्रयत्न –शेंदुर्णी नगर परिषदेच्या अग्निशमन दलास घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते . वाकोद येथील रहिवाशांनी देखील टँकरद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला . उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट –दरम्यान पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहाम यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली . अर्ध्यावरती डाव मोडला . . . अधुरी एक कहाणी मार्च महिन्यात जान्हवी आणि संग्राम यांचा विवाह झाला होता . सुखी संसाराचे स्वप्न रंगवत लवकरच आपण आई होणार असल्याची चाहूल जान्हवी यांना लागली होती . मात्र दुर्दैवाने सहा महिन्यांचे बाळ उदरात असताना कारमध्येच अग्निज्वाळांच्या भडक्यामुळे जान्हवी मोरे यांची प्राणज्योत मालवली . कारमध्ये सीएनजी गॅस ?नेमका स्पोट कशामुळे झाला ? याबाबत घटनास्थळी वेगवेगळे तर्क लावले जात होते . कार सीएनजी गॅस इंधनावर होती की पेट्रोलवर याविषयी आरटीओ इन्स्पेक्शन मधून माहिती समोर येणार आहे . तथापि या घटनेमुळे पहूर आणि वाकोद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

Read More

मोठी अपडेट | अपघातातील ठार झालेल्या तरुणाची ओळख पटली

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी जामनेरबुधवार, २२ एप्रिलजामनेर शहरातील बोदवड रस्त्यावरील नर्सरी जवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेत मृत व्यक्तीची ओळख आता पटली आहे.मृत तरुणाचे नाव विजय शिवाजी इंगळे असे असून, तो नाद्रा हवेली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!