Headlines

पाचोरा-भडगाव तालुक्याच्या आढावा बैठकीत कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन..!

प्रतिनिधी (गजानन क्षीरसागर)पाचोरा: -आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पाचोरा येथील निर्मल सीड्सच्या कृषीदालनात चाळीसगावचे कार्यसम्राट आमदार मंगेशजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा-भडगाव मतदारसंघातील आढावा बैठक उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती, संघटनात्मक बळकटी, तसेच गट आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीदरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “निवडणुका या फक्त राजकीय नव्हेत, तर विकासाचा आराखडा ठरवणाऱ्या असतात. प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाच्या विचारधारेसह विकासाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा.” त्यांनी संघटनशक्ती आणि तळागाळातील संवादाचे महत्त्व अधोरेखित करत कार्यकर्त्यांना उत्साहाने कामाला लागण्याचे आवाहन केले.या बैठकीत काही नव्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशही आमदार चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. बैठकीत दिलीपभाऊ वाघ, वैशालीताई सुर्यवंशी, अमोलभाऊ शिंदे, प्रताप हरी पाटील, अमोल नाना पाटील, मधुभाऊ काटे, सुभाष पाटील, संजय नाना वाघ, गोविंद शेलार, दीपक माने, शोभाताई तेली, अनिल पाटील, विनोद नेरकर यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.या आढावा बैठकीमुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवी उर्मी आणि संघटनात्मक एकात्मता जाणवली.

Read More

जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजनांनी दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा.

जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजनांनी दिल्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा. जामनेर –आज रमजान ईद निमित्त जामनेर शहरातील ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांना नमाज पठणानंतर जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या..याप्रसंगी भाजपा चे पदाधिकारी , उपस्थित होते .

Read More

आठवणीतला ऑफलाइन काळ आणि आजचं ऑनलाइन जीवन…

जामनेर प्रतिनिधी | JBN महाराष्ट्र NEWS एक काळ असा होता, जेव्हा मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हतं; पण माणसांकडे एकमेकांसाठी भरपूर वेळ होता. आज सगळं काही ऑनलाइन झालंय, मात्र त्या जुन्या आठवणींची ऊब अजूनही मनाला सुखावते…एक काळ असा होता, जेव्हा माणूस खरंच ‘ऑफलाइन’ जगायचा. मोबाईल नव्हता, टीव्ही नव्हता, इंटरनेट नव्हतं आणि प्रत्येक क्षण सोशल मीडियावर दाखवण्याची गरजही नव्हती. घरात एखादा फोन असला तरी तो श्रीमंतांच्या घरातच असायचा. गरिबाच्या घरात साधेपणा होता; पण त्या साधेपणातही समाधान होतं.रात्र झाली की घरातला दिवा लावून सगळे एकत्र बसायचे. उन्हाळा असला की घराबाहेर मोकळ्या हवेत गप्पा रंगायच्या. अंगणात किंवा ओट्यावर बसून शेजारी-पाजारी सुख-दुःखाच्या गोष्टी सांगायचे. कुणाच्या घरात एखादा पाहुणा आला की तो फक्त त्या घराचा पाहुणा राहत नसे, तर संपूर्ण गल्लीचा पाहुणा व्हायचा.बालपण म्हणजे खेळ, माती आणि मित्रांची संगत…त्या काळात मनोरंजनासाठी मोबाईलची गरज नव्हती. कबड्डी, खो-खो, लगोरी, चोर-पोलीस, डब्बा ऐसपैस, लंगडी असे कितीतरी खेळ मुलं मनापासून खेळायची. सकाळी घरातून बाहेर पडलेलं मूल संध्याकाळी आईने आवाज दिल्यावरच घरी परतायचं.कधी पतंग उडवायची, कधी सायकलवरून गावभर फिरायचं, तर कधी मित्रांसोबत मैदानात तासन्‌तास खेळायचं. पडल्यावर खरचटलं तरी पुन्हा उठून खेळायला सुरुवात व्हायची. त्या खेळांमध्ये शरीराची ताकद वाढायची आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे मैत्रीची नाती घट्ट व्हायची.सण म्हणजे आनंदाचा खरा उत्सव…दिवाळी, पाडवा, भाऊबीज, पोळा अशा सणांची वर्षभर आतुरतेने वाट पाहिली जायची. दिवाळीत वर्षातून एकदा फटाके फोडण्याची मजा काही वेगळीच होती. मामाच्या गावाला जाणं, नातेवाईकांना भेटणं, एकत्र फराळ करणं आणि घराघरात जाऊन शुभेच्छा देणं—हा सगळा आनंद प्रत्यक्ष अनुभवता यायचा.आज एका क्लिकवर शुभेच्छा पाठवता येतात; पण पूर्वी शुभेच्छा देण्यासाठी माणसं स्वतःच्या पायाने एकमेकांच्या घरी जायची. त्या भेटीतला आनंद, आपुलकी आणि जिव्हाळा वेगळाच होता.लग्न असो वा छोटासा आनंद… सगळे सहभागी व्हायचेगावात कुणाच्या घरात लग्न असेल तर पंधरा दिवस आधीपासूनच तयारी सुरू व्हायची. घरातील मंडळींबरोबर शेजारी-पाजारीही कामाला लागायचे. कुणी स्वयंपाकात मदत करायचं, कुणी पाहुण्यांची व्यवस्था करायचं, तर कुणी इतर जबाबदाऱ्या सांभाळायचं.माणसांमध्ये टिकून होती ती आपुलकी, जिव्हाळा आणि एकमेकांसाठी उभं राहण्याची भावना.पण काळ बदलला…ऑफलाइन जग ऑनलाइन झालं…आज मोबाईलच्या एका क्लिकवर संपूर्ण जग आपल्या हातात आलं आहे. बाजारात जाण्यापासून ते खरेदी करण्यापर्यंत, शिक्षणापासून मनोरंजनापर्यंत आणि नातेवाईकांशी संवाद साधण्यापासून शुभेच्छा देण्यापर्यंत सगळं काही ऑनलाइन झालं आहे.आज सेल्फी, स्टेटस, रील्स, व्हिडिओ कॉल आणि सोशल मीडिया हे जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. आपण दिवसभर ऑनलाइन असतो; पण कधी कधी आपल्या जवळच्या माणसांसाठी मात्र वेळ नसतो.पूर्वी एखाद्या मित्राला भेटण्यासाठी आपण त्याच्या घरी जायचो. आज त्याच्या ऑनलाइन असण्याचा हिरवा दिवा पाहूनच समाधान मानतो. पूर्वी सणाच्या दिवशी घराघरात भेटी व्हायच्या; आज शुभेच्छांचा एक मेसेज काही सेकंदांत शेकडो लोकांपर्यंत पोहोचतो.तंत्रज्ञानाने जीवन नक्कीच सोपं केलं आहे. ऑनलाइन जगामुळे वेळ वाचला, अंतर कमी झालं आणि अनेक सुविधा आपल्या हाताशी आल्या. पण या सगळ्या सुविधांच्या गर्दीत आपण माणसांमधला संवाद आणि नात्यांमधली उब हरवू नये, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.थोडं पुन्हा ‘ऑफलाइन’ जगूया…जुना काळ परत येणार नाही. ते दिवस, ते खेळ, ती अंगणातली गप्पा, मित्रांची टोळी आणि सणांची लगबग पुन्हा तशीच अनुभवता येणार नाही. पण त्या काळातील साधेपणा, माणुसकी, आपुलकी आणि नात्यांची किंमत आपण आजही जपू शकतो.कधीतरी मोबाईल बाजूला ठेवूया. कुटुंबासोबत बसूया. मित्रांना प्रत्यक्ष भेटूया. मुलांना मैदानात खेळू देऊया. सण फक्त स्टेटसवर न ठेवता तो आपल्या माणसांसोबत साजरा करूया.कारण शेवटी आयुष्याची खरी आठवण मोबाईलच्या गॅलरीत नसते; ती आपल्या मनात जपलेली असते.ऑनलाइन जगणं गरजेचं आहे, पण कधीतरी थोडं ‘ऑफलाइन’ जगणंही तितकंच आवश्यक आहे…!

Read More

सिद्धगड भवनी माता मंदिर व परिसराच विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार — नामदार गिरीश महाजन

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधव जामनेर —गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर रामपूर ता. जामनेर येथील श्री सिद्धगड भवानी माता मंदिर संस्थानच्या नूतन श्री सिध्दगड भवानी माता मंदिराचा भूमिपूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी सपत्नीक भूमिपूजन आज केले.श्री सिद्धगड भवानी माता मंदिर संस्थानचा अध्यक्ष म्हणून मंदिराचा व मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना संस्थानच्या इतर सहकाऱ्यांची व भाविकांची मिळणारी खंबीर साथ बळ देणारी आहे असे मनोगत नामदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केले .याप्रसंगी भाजपा पदाधिकारी , कार्यकर्ते परिसरातील नागरिक उपस्थित होते .

Read More

मासिक पाळी लाज नाही, अभिमान आहे – मीनल करनवाल

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधव सेवापंधरवड्यानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयंतीपासून ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत जामनेर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महिलांचे सशक्तीकरण आणि उत्तम आरोग्य सेवा यासाठी “स्वस्थ नारी सशक्त परिवार” हे अभियान राबवले जात आहे.या अभियानाअंतर्गत शेंदुर्णी येथे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व वैयक्तिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करून सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी जि.प. सदस्य संजयदादा गरुड यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, शेंदुर्णी नगरपरिषद मुख्याधिकारी विवेक धांडे, इंडियन डेंटल असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. आशिष महाजन, गोदावरी मेडिकल कॉलेजचे डॉ. जतिन बाविस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.“मासिक पाळी ही शाप नसून वरदान आहे. सर्व महिलांनी व किशोरवयीन मुलींनी या विषयावर मोकळेपणाने बोलले पाहिजे. मासिक पाळी लाज नसून अभिमान आहे. स्त्रीने स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे,” असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मनोगतात केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी केले तर आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहितकुमार जोहरे यांनी मानले. सूत्रसंचालन पी.जे. पाटील यांनी केले.महिला आरोग्य अधिकारी डॉ. पल्लवी राऊत यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. आदित्य पाटील, डॉ. श्रद्धा पाटील, गजानन माळी, राजश्री पाटील, सूर्यभान पाटील, विजया पाटील, अनुरथ रहाडे, योगेश पाटील, सुधाकर माळी, संयम हिवाळे, दीपक मोरे, ईश्वर कोळी, मंजू जवळे, रेखा इंगळे, विजय बेलदार आदींनी परिश्रम घेतले.

Read More

ग्रामपंचायत अधिकाऱ्यास 40 हजारांची लाच घेताना अटक

जळगांव(प्रतिनिधी)लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ला.प्र.वि.) धुळे युनिटच्या पथकाने पारोळा तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायतीचे अधिकारी दिनेश वासुदेव साळुंखे (वय 53) यांना 40,000 रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे. तक्रारदार हे शासकीय बांधकाम ठेकेदार असून त्यांनी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत तामसवाडी येथे सुमारे 5 लाख रुपये किंमतीचे रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले होते. या कामासाठी 4 लाख रुपयांची देय रक्कम ग्रामपंचायतीकडून तक्रारदारांच्या खात्यावर जमा झाली होती. या पार्श्वभूमीवर तक्रारदार आपल्या चुलत काकांसह 7 दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात इतर कामासंदर्भात गेले असता आरोपी दिनेश साळुंखे यांनी त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेच्या 10 टक्के म्हणजेच 40,000 रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कळवली. त्यानंतर 19 मे रोजी पडताळणी करून पथकाने सापळा रचला. आरोपीने अंमळनेर येथील दगडी दरवाजा समोरील राजे संभाजी चौकात तक्रारदाराकडून 40,000 रुपये स्वीकारले आणि दुचाकीवरून पळून गेला. मात्र त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू आहे. या कारवाईसाठी सापळा पर्यवेक्षण अधिकारी श्री. सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धुळे आणि तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पो.हवा. राजन कदम व पो.कॉ. प्रशांत बागुल यांनी सापळा कारवाईत सहभाग घेतला. संपूर्ण कारवाई मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नाशिक परीक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Read More

संतापलेल्या लहान भावाने चाकूने भोसकून थोरल्या भावाला संपवलं

जामनेर |प्रतिनिधी लहान भाऊ समीरने रोखण्याचा प्रयत्न केला असता दारूड्या मोहनने त्यालाही शिवीगाळ करत चाकूने मारण्याची धमकी दिली, ज्यामुळे वातावरण तापले.दारूसाठी झालेल्या वादातून भावानेच केलेल्या सख्ख्या भावाच्या हत्येची थरारक घटना समोर आली आहे. दारूच्या व्यसनामुळे घरात सतत गोंधळ घालणाऱ्या 21 वर्षीय मोहन चिंताराम बांते या तरुणावर त्याच्याच लहान भावाने चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या काही तासांत आरोपी लहान भाऊ समीर चिंताराम बांते (वय 19 वर्षे) याला अटक केली आहे. नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिनीमातानगर भागात ही घटना घडली.आईकडे पैशांची मागणी अन् घरातील सामानाची नासधूस मिळालेल्या माहितीनुसार, मृत मोहनला दारूचे प्रचंड व्यसन होते. तो काहीही कामधंदा करत नव्हता. दारूसाठी तो रोज आई-वडिलांकडे पैशांसाठी तगादा लावत असे. बुधवारी रात्री 9 च्या सुमारास मोहन दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने आईकडे पुन्हा पैशांची मागणी सुरू केली. पैसे देण्यास नकार मिळताच त्याने आई-वडिलांना अश्लील शिवीगाळ करत घरातील वस्तूंची तोडफोड सुरू केली. तसेच, वस्तू घराबाहेर फेकण्यासही सुरुवात केली. लहान भाऊ समीरने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता मोहनने त्यालाही शिवीगाळ करत चाकूने मारण्याची धमकी दिली, ज्यामुळे वातावरण तापले.संतप्त समीरकडून चाकूने वार; पोलिसात गुन्हा दाखल थोरल्या भावाच्या रोजच्या त्रासाला आणि धमकीला कंटाळलेल्या समीरने संतापाच्या भरात चाकू घेऊन येत मोहनवर हल्ला चढवला. या हल्ल्यात मोहनच्या मान, पाठ, पोट आणि हातावर गंभीर जखमा झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहनला नातेवाईकांनी शेजाऱ्यांच्या मदतीने तातडीने मेयो दाखल केले. डॉक्टरांनी रुग्णालयात उपचारादरम्यान 3 ते 4 तासांतच त्याला मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली हत्येचा गुन्हा दाखल करून समीरला अटक केली असून हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त केला आहे.

Read More

जामनेर तालुक्यातील १०७ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत तारीख जाहीर.कोणाचे उघडणार नशीब,तर कोणाचे खेळ बिघडणार.

जामनेर तालुक्यातील आगामी काळातील ग्रामपंचायतीच्या १०७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत तारीख जाहीर करण्यात आली आहे. यामधे जामनेर तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत २१ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ वाजता सोडत जाहीर करण्यात येणार आहे. यामधे खालील प्रमाणे जागा सोडत होणार आहे.अनुसुचित जातीसाठी आरक्षित सरपंचाची एकुण पदे-१०, अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचांचे एकूण पदे-१५, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचांची एकूण पदे-२८, सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेली सरपंचांची एकूण पदे-५४, अनुसूचित जातीच्या महिलांसाठी अ-५, अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी ब- ८, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी क- १४, सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी ड-२७ – एकूण अ बकड – ५४. याप्रकारे सोडत निघणार आहे.

Read More

ग्रामीण विकासात आजच्या युवतींची भूमिका मोलाची

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जनविश्वास सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात संजयदादा गरुड यांचे प्रतिपादन शेंदुर्णी येथील आप्पासाहेब रघुनाथराव गरुड महाविद्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संयुक्त आयोजित सजग युवती-सक्षम युवती उपक्रमाच्या व्याख्यान कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजयदादा गरुड यांनी अध्यक्षपदावरून ग्रामीण भागातील रचनेत आणि विकासात युवतींचा सहभाग आणि भूमिका अत्यंत मोलाची आहे असे मत मांडले.युवती केवळ कुटुंबाचा नव्हे,तर ग्रामीण समाजाचा देखील अविभाज्य घटक असल्याने त्यांनी आत्मविश्वासाने आपल्या क्षेत्रात भरारी घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या जनविश्वास सप्ताहामागील विवेचन युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षा कु.भाग्यश्री विवेकानंद ठाकरे यांनी मांडले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नाना पाटील,जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शिंदे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव थोरात,शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे सचिव सागरमल जैन,युवा नेते स्नेहदीप गरुड,नगरसेवक धीरज जैन तसेच जंगीपूरा येथील उपसरपंच मनोज पाटील यांची विशेष उपस्थिती होती. चौकट (1)अत्यंत मौलिक विषयांवर युवतींना मिळाले मार्गदर्शन : या उपक्रमात युवतींसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.ॲड.केतन सोनार यांनी ‘सोशल मीडिया हाताळताना युवतींनी घ्यावयाची काळजी’ या विषयावर दैनंदिन घडामोडी,फेक न्यूज,ऑनलाइन फसवणूक याविषयी सजग राहण्याच्या दृष्टीने सउदाहरण विदयार्थीनींना अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व्याख्यान दिले.ॲड. उमेश मराठे यांनी ‘युवती व कौशल्य विकास कार्यक्रमातून उपलब्ध संधी’ या विषयावर विवेचन करताना कौशल्य विकास म्हणजे केवळ पार्लर किंवा शिवणकाम पुरते मर्यादित नसून, सामाजिक आणि व्यवसायिक क्षेत्रातही युवतींना अनेक संधी असल्याचे असे आपल्या व्याख्यानातून नमूद केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.संजय भोळे, आर.एस. चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन दिनेश थोरात यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य साळुंखे यांनी मानले. चौकट (2) वटवृक्षारोपण व दहा युवतींना रोपांची जबाबदारी : ‘एक झाड माझ्या दादांचं…!’ या उपक्रमांतर्गत राष्ट्रवादी युवती काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दहा विद्यार्थिनींना वटवृक्षाचे रोप भेट देत त्यांच्याकडून जगविण्याचे वचन घेतले. यावेळी संस्थेच्या आवारात अध्यक्ष श्री. संजयदादा गरुड यांच्याहस्ते वटवृक्ष लावण्यात आले तृप्ती बारी,रोहिणी गुजर,नेहा न्हावी, वृषाली पाटील, गायत्री पाटील, कोमल म्हस्के, सानिया गुजर, निकिता पाटील, आरती पाटील आणि योगेश्वरी वाघ या दहा युवतींनी झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.

Read More

जामनेर तालुका मराठा सेवा संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर…!

जामनेर :- दि. 30/03/2025 रोजी मराठा सेवा संघ संचलित जिजाऊ रथ यात्रा व मराठा जोडो अभियान चे औचित्यसाधत जामनेर तालुका मराठा सेवा संघाची नुतन कार्यकारणी गठित करण्यात आली.जामनेर येथील मराठा समाज मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करत जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मा.शिवश्री सुमित पाटील तर प्रमुख अतिथी म्हणुन सेवा संघ राज्यउपाध्यक्ष मा.शिवश्री सुरेंद्र पाटील व संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष मा.शिवश्री सुरेश पाटील व निरीक्षक म्हणुन जिल्हा उपाध्यक्ष मा.शिवश्री बि.आर.पाटील सर व विशाल ला़ॅन चे संचालक डि. एन. चोैधरी विचारमंचावर उपस्थित होते. मराठा सेवा संघाच्या तालुकाध्यक्ष पदी शिवश्री दिपक ढोणी पाटील तर कार्याध्यक्षपदी शिवश्री. प्रमोद पाटील, उपाध्यक्षपदी शिवश्री दिपक वारांगणे पाटील, तालुका सचिव शिवश्री किशोर पाटील , शिवश्री प्रविण पाटील सहसचिवपदी व संघटक पदी शिवश्री दशरथ भाऊ पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या मार्गदर्शक मनोगता नंतर मान्यवरांच्या हस्ते नुतन कार्यकारणीचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व 21 एप्रील रोजी मराठा सेवा संघ संचालित जिजाऊ रथ यात्रे संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी तालुक्यातील सेवा संघ कार्यकर्ते सामाजीक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी ,शिक्षक मंडळी ,वार्तांकन करणारे वार्ताहार, बहुजन परिवर्तनवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हाकार्यध्यक्ष शिवश्री. योगेश पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. शिवश्री दिपक वारांगणे पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर नवनियुक्त तालुकाध्यक्ष शिवश्री दिपक ढोणी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली.

Read More
error: Don't Try To Copy !!