जळगाव महानगरपालिका स्थायी समितीत अरविंद देशमुख यांची निवड

जळगाव (प्रतिनिधी) – पहूर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून राजकारणात आलेल्या अरविंद देशमुख यांनी जळगाव शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा आपली छाप पाडली आहे. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजय मिळवल्यानंतर आता सुमारे 2000 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्प असलेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समितीवर त्यांची निवड झाली आहे.महानगरपालिकेची स्थायी समिती ही आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शहरातील विकासकामे, विविध प्रकल्पांची मंजुरी, खर्चाचे नियोजन आणि आर्थिक धोरणांबाबतचे महत्त्वपूर्ण निर्णय या समितीत घेतले जातात. त्यामुळे देशमुख यांची या प्रभावी समितीत झालेली निवड जळगाव शहरासाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.अरविंद देशमुख यांची ओळख केवळ नगरसेवक म्हणून मर्यादित नसून ते महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी व ‘संकटमोचक’ कार्यकर्ता म्हणूनही ओळखले जातात. जिल्ह्यातील विविध राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी प्रभावी नियोजन व संघटन कौशल्य दाखवत नेतृत्वाला बळकटी दिली आहे.स्थायी समितीतील त्यांच्या कामगिरीकडे आता जळगावकरांचे लक्ष लागले असून, शहराच्या विकासाला गती देण्यासाठी ते ठोस आणि परिणामकारक निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read More

जामनेर तालुक्यातील शिवभक्त अविनाश बोरसे ला अपघात झाल्याचे खोटे सांगुन त्याचा घातपात करण्याचा प्रयत्न, बोरसे पुराव्यानिशी पोलिसात तक्रार दाखल करणार

जे बी एल महाराष्ट्र न्यूज जामनेरजामनेर प्रतिनिधीजामनेर शहरात पुर्ण तालुक्यात शिवभक्त म्हणुन ओळख असलेले अविनाश बोरसे कुठत्त्याही राजकीय पक्षात नाही संघटनेत नाही छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावानी अशिर्वादानी जनतेला अबडणारी सामाजिक क्षेशत अनेक मोव मोठी काम बोरसेनी कुणालाही न घाबरता केली. जामनेरातील तरुण वर्ग नेहमी बोरसेच्या पाठीशी ऊभा दिसतो. काही दिवस आधीच कॅफेचा मूद्रा बोरसेनी लाबुन घरला या कैफे मुळे पूर्ण जामनेर तालुक्यातील पालक वर्ग उस्त होते. बोरसेनी हा महत्वाचा विषय लाऊन धरत अखेर में बंद पाइले पुर्ण जामनेर तालुक्यात जळगाव जिल्ह्यात बोरसेना मोठा नालोकिक आहे. बोरसेचा चाहता नावलौकीक वाढलेली प्रतिष्ठा चपचत नसल्याने काही जण फेिक अकाउंट व्दारे काही दिवसापासुन बोरलेची बदनामी करत होते. हा सुद्धा एक प्रकार काही दिवस आधी समोर आला होता. दि.१० सप्टेंबर रोजी बोरसेना खोटी माहिती मैसेज व्दारे व फोन करून अपघात झाल्याची माहीती देत बोरसेना घराबाहेर बोलवले रात्री चारा ऐक बी मेळ असल्याने त्याने बोरसे ऐकटाच होता वाच गोष्टीचा फायदा उचलत खल्लेखोर तरुणानी संधी साधली ते सर्व दारुच्या नशेत असल्याचे ओरसेनी सांगितले, ५/६ तरुनानी बोरसेना घेरले व बेगडेच विषय दाखवत बदनामी सारख्या अश्लिल भाषेत बोलत धमक्या दिल्या. चोरसे पोलिस तक्रार करत असल्याचे कळल्याने नंतर पुन्हा जामनेर सोमबाड़ों परीसरात बोरसे फिरत असताना तिथ त्याना अडवुन जिथे मारण्याची धमकी देत पोलिस तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्याच्याकडे जस असल्याचे बोरसेनी सागितले. आम्ही कोणालाथ घाबरत नाही माणु बोलु लागले. हे सर्व या तरुनामी २० हजार रुपये घेऊन हा प्रकार केल्याच समोर आले आहे. ज्यावेळी बोरसेना धमकी देणे सुरु होते त्यावेळी हे सर्व ऐक तरूम कुमाला तरी बीडीओ कॉल करन दाखवत असल्याचे बोरसेनी सागितले. बोरसेनी आपला जिव चाचचण्यासाठी सर्व सहन करत तिथुन निघुन गेल्याच सागितल बोरसेनी संयम ठेवल्याची माहीती मिळाली. धमकी धमकी देणारे अनोळखी होते. बोरसे पोलिसात तक्रार दाखल करत असुन लवकरच चेहरे नाव स्पष्ट होतील. एक वर्षापूर्वी अशाच प्रकारे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सचिन बोरसे यांना यांच्या शेतात हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगल काय करून नावलौकीक असे प्रकार योग्य नाही. सदरील घटना अत्यंत चुकीची असून जामनेरकर संताप व्यक्त करत आहे तर शिवभक्त अविनाश बोरसेंना जामनेर शहरायव्ह तालुक्यातील खेडापाडयातुन अजुनच अधिकच बाडता पाठिंबा जामनेरकर देत असल्याच दिसुन येत आहे.

Read More

अमळनेरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा रेल्वेखाली मृत्यू; टकरेखेडा परिसरात हळहळ

जामनेर | प्रतिनिधीजळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील टकरेखेडा परिसरात गुरुवारी (२७ ऑगस्ट) पहाटे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींचा रेल्वे मार्गावर मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुनील अमृत भिल, त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल आणि त्यांच्या दोन मुली यांचा या घटनेत मृत्यू झाला. पहाटेच्या सुमारास टकरेखेडा शिवारातील रेल्वे मार्गावर ही घटना घडल्याचे समोर आले आहे. धावत्या रेल्वेसमोर गेल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया आणि शवविच्छेदनाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील चार जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने टकरेखेडा परिसरावर शोककळा पसरली आहे. कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून ग्रामस्थांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक किंवा अन्य कोणत्या कारणामुळे ही घटना घडली का, यासह विविध शक्यतांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घटनेने अमळनेर तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

भुसावळ-लोहार बसमध्ये महिलेची १५ ग्रॅम सोन्याची पोत लंपास!

जामनेर बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पोत केली लंपास; जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल जामनेर | प्रतिनिधी :भुसावळ ते लोहार बसने प्रवास करत असताना महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना जामनेर बसस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी जामनेर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नोंदीनुसार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.१० वाजता फिर्यादी विजय वामन पाटील (वय ४७, व्यवसाय – शेती, रा. शिवाजी नगर, जामनेर; मूळ रा. सोनाळा, ता. जामनेर, जि. जळगाव) हे आपल्या आई सुशीलाबाई वामन पाटील यांच्यासह भुसावळ ते लोहार बसने प्रवास करीत होते. बस जामनेर बसस्थानकात थांबली असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत सुशीलाबाई यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. काही वेळाने पोत गळ्यात नसल्याचे लक्षात आल्यानंतर विजय पाटील यांनी याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घटना बसस्थानक परिसरात घडल्याने पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तसेच तांत्रिक तपास आणि उपलब्ध माहितीच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पोलिस नोंदीनुसार, या प्रकरणात अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ/९७१ प्रतापसिंग मथुरे, जामनेर पोलिस ठाणे करीत असून, तपास सुरू आहे.

Read More

तब्बल एकदा नव्हे तिसऱ्यांदा झाली चोरी.कुऱ्हाड येथे पुन्हा चोरट्यांची सलामी

जामनेरलोहारा रस्त्यावरील तारांगण हॉटेल मध्यरात्रीनंतर फोडलेचोरट्यांनी चक्क सीसीटीव्ही, DVR लांबविले.दुकानात असलेली जवळपास चार ते पाच हजार रुपयाची चिल्लर लांबवली.तसेच शरीरासाठी आवश्यक असलेली महत्वाची जवळपास दहा हजार रुपये किमतीची टॉनिक देखील चोरून नेली.बहुतेक लोहारा येथे काल रात्री पाच ते सहा दुकाना फोडून त्यांनी आपला मोर्चा कुऱ्हाड गावाकडे वळविला असेल.सबंधित चोरीचा तपास जलदगतीने लावण्याची ग्रामस्थांची मागणी

Read More

जामनेर येथे राष्ट्रीय लोकन्यायालयात ३६० प्रकरणांचा निकाल

जामनेर, दि. १४ मार्च २०२६ – मा. उच्च न्यायालय मुंबई तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन जामनेर येथे करण्यात आले. तालुका विधी सेवा समिती जामनेर तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालय जामनेर यांच्या वतीने या लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोकन्यायालयात मोठ्या प्रमाणावर पक्षकारांनी उपस्थिती दर्शविली. तहसील कार्यालय, महसूल विभाग, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी पतसंस्था/बँका, बीएसएनएल, नगरपालिका, नगरपरिषद, महावितरण तसेच जामनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला. सदर लोकन्यायालयात वादपूर्व प्रकरणे तसेच न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. वादपूर्व प्रकरणांपैकी ३०४ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यामध्ये २,०४,३६० रुपये इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली. तसेच न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ५६ प्रकरणे निकाली काढण्यात आली. दिवाणी व फौजदारी तडजोडयोग्य प्रकरणांमध्ये ९०,८०० रुपये इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली. वादपूर्व व न्यायालयीन प्रलंबित अशी मिळून एकूण ३६० प्रकरणे निकाली काढण्यात आली असून दोन्ही प्रकारच्या प्रकरणांमध्ये मिळून २,०५,३७,८८७ रुपये इतक्या रकमेची तडजोड करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

Read More

भारतीय जैन संघटना व महावीर पब्लिक स्कूल आयोजित शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात व आनंदात संपन्न झाला

पहुर : भारतीय जैन संघटना आणि महावीर पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षक सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. प्रमोद कठोरे (पी.आय, पहुर पोलीस स्टेशन) होते. प्रमुख उपस्थितीत श्री. प्रदीपभाऊ लोढा (चेअरमन, महावीर पब्लिक स्कूल), श्री. पवन रुणवाल (सह सचिव, भारतीय जैन संघटना, जळगाव जिल्हा), श्री. स्वप्निल छाजेड़ (शहराध्यक्ष, भारतीय जैन संघटना), श्री. अरविंद चौरडिया, श्री. सुनील लोढा, श्री. रूपेश लोढा आणि श्री. दीपक लोढा आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. ईश्वर मूळचंद चौरडिया, सुनयना मनोज रुणवाल, शंकर रंगनाथ भामरे यांच्यासह एकूण २० आदरणीय शिक्षकांना सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शहराध्यक्ष स्वप्निल भैया छाजेड़, श्री. सुनील लोढा, श्री. रूपेश लोढा, सौ. भाग्यश्री बेदमुथा, सौ. आरती कोटेचा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या सोहळ्याला पत्रकार संघटनेचे अध्यक्ष डॉ. क्षीरसागर, उपाध्यक्ष जोशी, सचिव भामरे सर, शरद बेलपत्रे तसेच अन्य पत्रकार बांधव आणि भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेच्या वतीने सर्व मान्यवर, शिक्षक आणि उपस्थितांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले

Read More

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास योजना” अंतर्गत शालेय विद्यार्थिनींना बस पास वाटप – जामनेर आगार आपल्या दारी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जामनेर, ता. २६ जून – महाराष्ट्र शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस पास वाटप योजने” अंतर्गत आज मोराड, बिलवाडी आणि मेणगाव या गावांमध्ये “जामनेर आगार आपल्या दारी” या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थिनींसाठी बस पासचे वाटप करण्यात आले. स्नेहदीप गरुड फाउंडेशन आणि जामनेर बस आगार यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या उपक्रमात गावोगावी विद्यार्थिनींसाठी मोफत बस पास वितरणाची व्यवस्था करण्यात आली. या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आवश्यक असणारी सुरक्षित व सुलभ प्रवास सेवा मिळणार आहे. कार्यक्रमास युवानेते स्नेहदीपभाऊ संजय राव गरुड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्यासोबत गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, पोलीस पाटील, तसेच गरुड महाविद्यालयाचे मुख्याध्यापक र.एस. चौधरी सर व सहकारी शिक्षक, गावातील प्रतिष्ठित पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जामनेर बस आगार तसेच शेंदुर्णी बस स्थानकाचे प्रतिनिधी श्री. भारुडे व मनोज पाटील यांनी विद्यार्थिनींना योजना आणि प्रवास व्यवस्थेबाबत माहिती दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शिक्षणात अधिक संधी प्राप्त होणार असून, शासनाच्या या उपक्रमाचा ग्रामीण भागात सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

Read More

डॉ . बाबासाहेबांच्या रंगकामावर तीव्र नाराजी; आरपीआयचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा

जे. बी. एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी-सुपडू जाधवडॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या रंगकामावर तीव्र नाराजी; आरपीआयचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशाराजामनेर शहरातील पोलीस स्टेशन समोर असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या रंगकामामुळे बाबासाहेबांच्या सन्मानाला धक्का पोहोचल्याची भावना व्यक्त होत असून या प्रकाराबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)च्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात आज आरपीआयच्या वतीने जामनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पुतळ्याला करण्यात आलेले रंगकाम हे बाबासाहेबांच्या तेजस्वी व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत नसून त्यामुळे पुतळ्याचे विद्रूपीकरण झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे बाबासाहेबांच्या पुतळ्याला सोनेरी (गोल्डन) रंग देऊन योग्य प्रकारे सुशोभीकरण करण्यात यावे तसेच दोन दिवसांच्या आत पुतळ्याची संपूर्ण स्वच्छता करण्यात यावी, अशी ठाम मागणी आरपीआयने केली आहे.प्रशासनाने या मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास बाबासाहेबांच्या सन्मानासाठी आणि अनुयायांच्या भावना लक्षात घेता आरपीआयच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा आरपीआयचे नेते भगवान सोनवणे यांनी दिला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक न्याय, समता आणि संविधानाचे शिल्पकार असल्याने त्यांच्या पुतळ्याबाबत कोणतीही निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही, अशी भूमिका आरपीआयच्या वतीने यावेळी ठामपणे मांडण्यात आली. प्रशासनाने त्वरित योग्य निर्णय घेऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याचे सन्मानपूर्वक सुशोभीकरण करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांतूनही होत आहे.

Read More

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत गरुड विद्यालयाचे घवघवीत यश

धी शेंदुर्णी एज्युकेशन को-ऑप सोसायटीचेआ.ग.र गरुड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी येथील विद्यार्थ्यांचे तायक्वांदो स्पर्धेत यश व विभागावर निवळ नुकत्याच जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेतील ज्या विद्यार्थ्यांची जिल्ह्यावर निवड झाली यापैकी 11 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून नुकताच जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेतून विजयी होत.सुवर्णपदक प्राप्त विजेते विद्यार्थी केवीन रवींद्र चौधरी, दक्ष लोखंडे,प्रद्युम्न जगताप,आर्यन वानखेडे,साहिल शेलार,चिन्मय सुर्वे, रागिणी पाटील,दृष्टी भारुडे,कामिनी नाथ,विनायक भोई,या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले असून त्यांची विभागावर निवड झालेली आहे. तायक्वांदो स्पर्धेत 11 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले 4 विद्यार्थ्यांना रौप्य पदक मिळालेले आहे . या 11 विद्यार्थ्यांची विभागावर निवड झालेली आहे.म्हणून या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजय रावजी गरुड व्हाईस चेअरमन आबासाहेब भीमराव शेळके,सचिव काकासोसागर मलजी जैन,सहसचिव दादासो यु यु पाटील, कार्यालयीन सचिव भाऊसो दीपकजी गरुड,वस्तीगृह सचिव गो गो सूर्यवंशी,विद्यालय कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आर एस चौधरी, पर्यवेक्षक व्ही.एम शिरपुरे,पर्यवेक्षक विनोद पाटील या मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे देखील अभिनंदन केले.तसेच फिजिकल टीचर पी पी पाटील,अमोल पाटील,आर.एम.सपकाळे,पी एम पाटील,सचिन सुर्वे इत्यादी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Read More
error: Don't Try To Copy !!