Headlines

प्रत्येक निवडणुकीत एकाच घरातील सदस्यांना उमेदवारी का?

जे बी एन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी जब्बार एस तडवी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फरदापुर गणात राजकीय पक्षांकडून पुन्हा एकदा एकाच घरातील सदस्यांना उमेदवारी तिकीट दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व रोष उफाळून येताना व्यक्त होत आहे. प्रत्येक निवडणुकीत त्याच कुटुंबातील व्यक्तींनाच संधी दिली जात असल्याने सामान्य कार्यकर्ते व नव्या तरुण उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना जनतेतून पुढे येत आहे.“पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्तांना डावलून घराणेशाहीला प्राधान्य दिले जाते,” अशी टीका स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. यामुळे लोकशाही मूल्यांना तडा जात असून पक्षांची विश्वासार्हता कमी होत आहे, त्यातच रस्ते, पाणी,आरोग्य, व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये अपेक्षित सुधारणा झालेली नाही निवडणूक आली की आश्वासनाचा पाऊस आणि नंतर मात्र शांतता असा अनुभव जनतेने वारंवार घेतला आहे यावेळी मात्र जनतेचा सूर बदललेला दिसत आहे घराणे नाही काम पाहिजे अशी स्पष्ट भूमिका फरदापुर गणात परिवर्तनाची लाट निर्माण होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे असेही मत व्यक्त होत आहे.तरुण व सक्षम उमेदवारांना संधी न देता वारंवार एकाच घरातील सदस्यांना तिकीट दिल्यास निवडणुकीत याचा फटका पक्षांना बसू शकतो, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. याबाबत राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करून न्याय्य व पारदर्शक उमेदवार निवड प्रक्रिया राबवावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

Read More

सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय जामनेर येथे संविधान दिन उत्साहात साजरा.

जामनेर (प्रतिनिधी) दि. २६-११-२०२५ रोजी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय जामनेर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालायातील विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.चित्रा परदेशी मैडम यांनी केले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा.आय.एम.चोरडिया सर हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले.यानंतर प्रा.प्राची पाटील मैडम यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकाचे सामूहिक वाचन केले.यावेळी प्रा.चोरडिया सर यांनी संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन प्रा.रूपाली लोहार मैडम व कल्याणी सरताळे मैडम यांनी केला.

Read More

मका खरेदीत अडवणूक: तक्रार करा!जामनेर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांचे आवाहन….

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी- सुपडू जाधवजामनेर,समितीत मका खरेदी करताना व्यापान्यांकडून ओलसर असल्याचे कारण पुढे करून तो कमी दराने खरेदी करणे किंवा शेतकऱ्यांची अडवणूक करणे असे प्रकार केले जात असतील तर त्याची बाजार समितीकडे तक्रार करावी. जेणेकरून बाजार समिती प्रशासनाला संबंधित दोषी व्यापाऱ्याच्या विरोधात कारवाई करता येईल, असे आवाहन येथील बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व सचिव प्रसाद पाटील यांनी केले आहे.सभापती श्री. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की या हंगामातील मक्याचा पेरा वाढल्याने उत्पादन वाढण्याची स्थिती आहे. परंतु बहुतांश शेतकरी एकाचवेळी मका विक्रीसाठी आणत असल्याने मका खरेदी केंद्रावर प्रचंड गर्दी होत आहे. विक्रीसाठी आणलेल्या मक्यामधील आर्द्रता तुर्तास जास्त असल्याने हा मका चाळविण्यासाठी बऱ्याच खरेदीदारांकडे जागेची अडचण आहे. त्यामुळे मका खरेदीत अडचणी उद्भवत आहेत, अनेक शेतकरी बांधवांनी त्यांचा मका हमी भावापेक्षा कमी दरात खरेदी होत असल्याच्या व व्यापाऱ्यांकडून त्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी आपला मका ‘एफएक्यू’ दर्जानुसार वाळवून सुकवून व टप्प्याटप्याने विक्रीसाठी आणावा, जेणेकरून आपली गैरसोय होणार नाही अथवा आर्द्रतेच्या अतिरिक्त प्रमाणामुळेआर्थिक नुकसान होणार नाही. बरेच शेतकरी ओला मका विक्रीची घाई करतात. त्यांनी देखील बाजारभावाचा व विक्री योग्य स्थितीचा अंदाज घेऊन घाबरून न जाता, योग्य वेळी माल विक्री करावा, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस राज्यात वादळी वारा व पावसाची शक्यता आहे. याचाही विचार करून मका विक्रीची घाई करू नये असे आवाहनही सभापती अशोक पाटील व सचिव प्रसाद पाटील यांनी केले आहे.

Read More

शेंदूर्णी सूतगिरणीला गती देण्यासाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक

मुंबई, दि. ७ एप्रिल (प्रतिनिधी) — जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सहकारी सूतगिरणीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी मंत्रालयात मंगळवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात ही बैठक झाली.बैठकीत वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव श्रीकृष्ण पवार यांनी सूतगिरणीच्या सद्यस्थितीचा आढावा सादर करत कामकाजातील अडचणी व प्रलंबित मुद्द्यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सूतगिरणीच्या कार्यपद्धती, तांत्रिक बाबी व उत्पादन क्षमतेसंदर्भात चर्चा केली.सूतगिरणीसमोरील अडचणी दूर करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत मंत्री श्री. महाजन यांनी वस्त्रोद्योग विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यामुळे सूतगिरणीच्या कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.या बैठकीस वस्त्रोद्योग आयुक्त श्री. संजय दैने, मंत्री (वस्त्रोद्योग) यांचे खाजगी सचिव श्री. प्रल्हाद रोडे, मंत्री श्री. महाजन यांचे खाजगी सचिव जयराज कारभारी, प्रादेशिक उपआयुक्त श्री. दीपक खांडेकर, कक्ष अधिकारी श्री. हरीशकुमार कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी ऑनलाइन प्रणालीद्वारे उपस्थित होते.सदर बैठकीत सूतगिरणीच्या प्रगतीसाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला असून, लवकरच ठोस निर्णयांची अंमलबजावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read More

जामनेर – पाण्याचे काम हे पुण्यार्जनाचे काम आहे – शांतीलाल मुथा

जामनेर(वा.)- जैन समाज हा दुष्काळामुळे राजस्थानातून बाहेर पडला.पूर्वी नुसती पाणपोई बांधली तरी समाधान होते, आता तलाव बांधायची वेळ आली आहे.तलावातील गाळ काढल्यामुळे पाण्याची क्षमता वाढेल.पुर्ण गाव पाणीमय होईल. काढलेला गाळ शेतात टाकल्यामुळे बंजर जमीन सुपीक बनेल. प्यायला पूर्ण गावाला,जनावरांना पाणी मिळेल. शेतात गाळ आल्यामुळे वर्षातून तिनदा पिके घेतील. ग्रामीण अर्थव्यवस्था बदलेल.असे मत भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केले. ते पुणे येथील वर्धमान प्रतिष्ठान सभागृहात संघटनेच्या महाराष्ट्रातील पदाधिकारी,कार्यकर्ते, जिल्हा समन्वयक यांच्या आयोजित बैठकीत बोलत होते. नवकार महामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली.राज्य अध्यक्ष केतन शाह यांनी उपस्थितांचे स्वागत केले.राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर सांखला यांनी प्रास्तविक केले.मुथा म्हणाले, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि नाला खोलिकरण व रुंदीकरण ही सरकारच्या मृदु व जलसंधारण विभागाची योजना आहे. ही योजना गावागावात,शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच जास्तीत जास्त गावाकडून मागणी अर्ज येण्यासाठी संघटना लोकचळवळ निर्माण करेल. तसा करार शासनाशी झाला असुन या साठी सुहाना स्पाईसेस यांचे सहकार्य लाभत आहे.कार्यकर्त्यांचे सर्व शंकांचे निरासन मुथा यांनी केले.उपस्थितांना संघटनेने तयार केलेल्या ॲपमध्ये गावाची तलावातील गाळ काढण्यासाठी मागणी अर्ज भरुन काढण्याचे प्रात्यक्षिक संघटनेचे मेनेजिंग डायरेक्टर कोमल जैन यांनी दाखविले.लवकरच महाराष्ट्रातील संघटनेचे कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शासनाच्या या योजनेला सहकार्य करतील.सुहाना स्पाईसेस चे विशाल चोरडिया म्हणाले, भारतीय जैन संघटने बरोबर आम्हाला या कार्यात सहभागी होता येत आहे, याचा आनंद वाटतो. राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा, राज्य सचिव प्रविण पारख यांनी मनोगत व्यक्त केले.या बैठकीला खानदेशातून विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा(शिंदखेडा), विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत(जामनेर)जळगाव जिल्हा अध्यक्ष निर्मल बोरा, सचिव दर्शन देशलहरा(चोपडा),राजेश जैन(पाचोरा),मनोज कोचर (शहादा), गौरव छाजेड, जय मुथा (बोदवड), महावीर डागा, शुभम डागा (अक्कलकुवा),देवेंद्र शाह, उज्ज्वल डेरेकर (रावेर)) पंकज जैन (जळगाव), चेतन जैन (भुसावळ), संदिप जैन, शीतल जैन, चेतन जैन (शेंदुर्णी), रोशन गोलेछा(चाळीसगाव) उपस्थितीत होते. आभर केतन शाह यांनी मानले.

Read More

जामनेर बसस्थानकात प्रवासी महिलेला लुटले; 25 ग्रॅम सोन्याची पोत चोरीला.

जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बु. येथील मिराबाई राघो पाटील (वय 75) या ज्येष्ठ महिला जामनेर येथून पाचोरा जाणाऱ्या एस. टी. बसने प्रवास करत असताना त्यांच्याकडील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना गुरुवारी (15 मे 2025) रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास घडली. मिराबाई पाटील या आंबे वडगाव येथे एका लग्नाच्या कार्यासाठी निघाल्या होत्या. त्या जामनेर एस. टी. बसस्थानकावरून पाचोरा मार्गे प्रवास करत असताना, गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून चोरली. ही घटना लक्षात येताच त्यांनी तपास केला, मात्र तोपर्यंत चोरट्याने पोत लंपास केली होती. या प्रकारामुळे जेष्ठ महिला अत्यंत हादरल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच त्यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जामनेर बसस्थानकात सुरक्षेअभावी गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे. जरी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून सुसज्ज बसपोर्ट उभारण्यात आले असले तरी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव आणि बसस्थानक व्यवस्थापनातील दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी बसस्थानकावर तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून अशा घटना रोखता येतील. जामनेर आगार प्रमुखांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि भविष्यातील सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.[9:09 pm, 15/05/2025] Eshwer Chordiya 222: अवैध देशी व विदेशी दारू विक्रीस आळा घालण्यासाठी फत्तेपूर पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस उपनिरीक्षक अंकुश जाधव यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळवारी (दि. १३ मे २०२५) रोजी पहाटे एक मोठी कारवाई करत ओमनी गाडीतून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमाला अटक करण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, फत्तेपूर शहरातील गोद्री रोडवरून ओमनी (क्रमांक MH 28 AN 4092) गाडीतून दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पो.ह. प्रवीण चौधरी, पो.कॉ. मुकेश पाटील आणि पो.कॉ. भूषण पाटील यांच्या पथकाने टी पॉईंटजवळ नाकाबंदी लावली. सकाळी ३.२० वाजताच्या सुमारास सदर वाहन थांबवून तपासणी केली असता, कमलाकर अण्णा सपकाळ (वय ३३, रा. शिवणा, ता. सिल्लोड, जि. संभाजीनगर) हा ५४ बॉक्स देशी दारूसह सापडला. या बॉक्समध्ये भिंगरी देशी दारूचे ३९ बॉक्स, टंगो पंच ५ बॉक्स आणि सखु संत्रा देशी दारूचे १० बॉक्स अशा एकूण ५४ बॉक्समध्ये अंदाजे रु. १.८२ लाखांचा दारूचा साठा आढळून आला. सदर आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत कलम ६५(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा रजिस्टर नंबर ७१/२०२५ आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव व पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास सपोनि अंकुश जाधव करत आहेत. या कारवाईमुळे जामनेर तालुक्यातील अवैध दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, फत्तेपूर पोलीसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read More

जामनेर तालुक्यात स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसीची मोहीम सुरू

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर, (प्रतिनिधी)सुपडू जाधव : तालुक्यातील रेशन धान्यास पात्र कुटुंबाची ई-केवायसी सुरू झाली आहे. प्रत्येक लाभार्थ्याने स्वस्त दुकानदाराकडे आवश्यक कागदपत्रे सादर करून ई-केवायसी करणे आवश्यक असून ३१ मार्च पर्यंत या करिता मुदत दिली आहे. वेळेत लाभार्थ्यांनी ई-केवायसी करावी असे अवाहन जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे व पुरवठा निरीक्षण अधिकारी नारायण सुर्वे यांनी केले आहे.अंतोदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे सर्व शिधा पत्रिका धारकांना ते अनिवार्य असून त्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदत आहे. मुदतीत आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी न केल्यास धान्य मिळणार नसल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे व पुरवठा निरीक्षण अधिकारी नारायण सुर्वे माहिती यांनी दिली.

Read More

प्रॉपर्टी डीलर म्हणून ओळख असलेल्या रामेश्वर नथू बिजागरे यांची गळफास घेऊन आत्महत्या

जामनेर तालुक्यात मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. प्रॉपर्टी डीलर म्हणून ओळख असलेल्या रामेश्वर नथू बिजागरे (वय 40, रा. चिंचखेडा तवा) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एका मित्राला फोन करून ही माहिती दिली होती, मात्र मदतीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, रामेश्वर बिजागरे हे लाखोंच्या जमिनीच्या व्यवहारांमुळे जामनेर परिसरात परिचित होते. मंगळवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे जामनेर-बोदवड रोडवरील भवानी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. नंतर काही मित्रांसह धाब्यावर जेवणही केले. त्यानंतर त्यांनी एका निकटवर्तीय मित्राला फोन करून “आपण आत्महत्या करत आहे,” असे सांगितले. संबंधित मित्राने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु काही वेळाने त्यांचा फोन बंद यायला लागला. यानंतर मित्रांनी लोकेशनवरून शोध घेत भवानी घाट परिसर गाठला असता, बिजागरे यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृत्यूपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, या चिठ्ठीत काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली असून, पैशांचे व्यवहार, देणे-घेणे यांचा उल्लेख असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, मृत्यूमागील कारणे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. रामेश्वर बिजागरे यांनी अल्पावधीतच आर्थिक प्रगती केली होती. प्रॉपर्टी डीलिंगच्या माध्यमातून त्यांचे अनेकांशी व्यवहार होते. या व्यवहारांमुळे मानसिक तणाव होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चिंचखेडा गावात तसेच जामनेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

पाचोरा-भडगाव तालुक्याच्या आढावा बैठकीत कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन..!

प्रतिनिधी (गजानन क्षीरसागर)पाचोरा: -आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पाचोरा येथील निर्मल सीड्सच्या कृषीदालनात चाळीसगावचे कार्यसम्राट आमदार मंगेशजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा-भडगाव मतदारसंघातील आढावा बैठक उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती, संघटनात्मक बळकटी, तसेच गट आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीदरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “निवडणुका या फक्त राजकीय नव्हेत, तर विकासाचा आराखडा ठरवणाऱ्या असतात. प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाच्या विचारधारेसह विकासाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा.” त्यांनी संघटनशक्ती आणि तळागाळातील संवादाचे महत्त्व अधोरेखित करत कार्यकर्त्यांना उत्साहाने कामाला लागण्याचे आवाहन केले.या बैठकीत काही नव्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशही आमदार चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. बैठकीत दिलीपभाऊ वाघ, वैशालीताई सुर्यवंशी, अमोलभाऊ शिंदे, प्रताप हरी पाटील, अमोल नाना पाटील, मधुभाऊ काटे, सुभाष पाटील, संजय नाना वाघ, गोविंद शेलार, दीपक माने, शोभाताई तेली, अनिल पाटील, विनोद नेरकर यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.या आढावा बैठकीमुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवी उर्मी आणि संघटनात्मक एकात्मता जाणवली.

Read More

गोव्यात महाराष्ट्रातील 150 कार्यकर्त्यांचा सहभाग,बीजेएसचा भ्रमण कार्यक्रम संपन्न

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेर जामनेर प्रतिनिधी सुपडू जाधव जामनेर (वा.) – 40 वर्षापूर्वी स्थापित भारतीय जैन संघटना गेल्या चार वर्षापासून आपल्यात परिवर्तन करण्यासाठी संस्थापक शांतीलाल मुथा व मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन प्रयत्नशील आहे. या साठी बारा महिन्यात 14 फोंडेशन कार्यक्रम दिलेत. त्याचाच एक भाग म्हणून भ्रमण हा कार्यक्रम असून राज्य अध्यक्ष केतन शाह व राज्य महासचिव प्रवीण पारख यांनी आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांसाठी गोवा येथे आयोजित केला होता.चार दिवशीय भ्रमण या कार्यक्रमात राज्यातील बारा विभागांपैकी सात विभागातील 18 जिल्ह्यातील एकूण 150 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.यात खानदेशातून 29 पदाधिकारी व कार्यकर्ते होते.कार्यक्रमाच्या पाहिल्या दिवशी सर्व कार्यकर्त्यांचा परिचय करवून घेतला. या प्रसंगी राज्य अध्यक्ष केतन भाई म्हणाले, या कार्यक्रमामुळे कार्यकर्त्याचा आपसात व्यापार उद्यम वाढेल,आपसात प्रेम,स्नेह बरोबरच नात्यात रूपांतर होऊ शकेल व जे नविन कार्यकर्ते आले आहेत त्यांना बीजेएसचा 40 वर्षाचा इतिहास कळेल. यावेळी मंचावर राज्य महासचिव प्रवीण पारख,राज्य उपाध्यक्ष विनय पारख, राज्य सचिव विजय दुगड,खानदेश विभाग अध्यक्ष प्रा.चंद्रकांत डागा माजी राज्य उपाध्यक्ष हरकचंद बोरा यांनी मनोगत तर सूत्रसंचालन राज्य कार्यकारणी सदस्य संतोष बम्ब यांनी केले.जामनेर येथून खानदेश विभाग उपाध्यक्ष सुमित मुनोत,महिला सदस्य स्नेहल मुनोत,मनीषा कोठारी,वंदना चोरड़िया,आदि सदस्य गोवा भ्रमण साठी गेले होते.दुसऱ्या दिवशी बालाजी,मंगेशी मंदिर, ओल्ड गोवा चर्च, डोना पोला, कृज वरून परत आलो. तिसऱ्या दिवशी जैन मंदिर, डॉल्फिन पॉईंट, आगुदा फोर्ट, बागा ब्रीज करून रात्री हौजी गेम मध्ये सर्वांनी सहभाग घेतला.चौथ्या दिवशी समापनला बीजेएसच्या मॅनेजिंग डायरेक्टर कोमल, गोवा राज्य अध्यक्ष भरत पाटील, राज्य सचिव राजू देवरकर यांची उपस्थिती लाभली.यावेळी कोमल जैन म्हणाल्या, बीजेएस ही केवळ संघटना नसून एक परिवार आहे.परिवाराच्या समस्या लक्षात घेऊन, त्याचा खोलवर अभ्यास करून उपाय शोधून त्यावर अंमलबजावणी केली जाते.12 राज्यात 50 हजार कार्यकर्ते या साठी सज्ज आहेत. पती पत्नीच्या संबंधातील वाद सोडण्यासाठी पारिवारिक अदालत, परिणय पथ, दिल का जिकशा स्मार्ट गर्ल्स, कपल डेव्हलपमेंट असे कार्यक्रम नवीन रूपात आले, याच बरोबर पाणी, नैसर्गिक आपत्ती, शिक्षण यात ही संघटना कार्यरत आहे. पूर्ण चार दिवस शाकाहारी भोजन, राहण्याची उत्तम व्यवस्था राज्याध्यक्ष केतन शाह, प्रवीण पारख यांनी केली. रविवारी ता.31रोजी सर्वांनी आपसात जड अंतःकरणाने निरोप दिला.

Read More
error: Don't Try To Copy !!