Headlines

सावळदबारा ग्रामपंचायतचे मुद्दामहून येणाऱ्या वॉटर सप्लाय कडे दुर्लक्ष मेन पाईपलाईन वरती प्रेशर व्हाल फोडून व गावाजवळ अवैधरित्या नळ कनेक्शन

सावळदबारा ग्रामपंचायतचे मुद्दामहून येणाऱ्या वॉटर सप्लाय कडे दुर्लक्ष मेन पाईपलाईन वरती प्रेशर व्हाल फोडून व गावाजवळ अवैधरित्या नळ कनेक्शन सोयगाव तालुका.. प्रतिनिधी जब्बार एस तडवी सोयगाव तालुक्यातील सावळदबारा ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व ग्रामपंचायतबॉडी व ग्रामसेवक यांच्या नाहक हलगर्जीपणामुळे देव्हारी पिंपळवाडी इथून वाटर सप्लाय विहिरीवरून येणारी मेन पाईपलाईन वरती देव्हारे येथील शेतकऱ्यांनी प्रेशर व्हाल फोडून आपल्या शेतात शेती मालाला व इतर पिकांना पाणी देण्यासाठी नळ जोडणी पाईपलाईन करून घेतली आहे व त्यातूनच नव्हे तर सावळदबारा फाट्याजवळ सुद्धा काही अज्ञात लोकांनी नळ कनेक्शन घेतलेले आहे ग्रामपंचायत सावळदबारा कार्यालयाला व संबंधित सरपंच व सर्व सदस्यांना माहिती असून सुद्धा या अवैधरित्या नळ कनेक्शन घेतलेल्या लोकांवर काहीही कारवाई न करता 24 तास पाणी सुविधा देण्यात येत आहे पाणी वॉटर सप्लाय विहीर व मोटार ही सावळद बारा ग्रामपंचायतची व अवधरीत्या पाणी उपसा तेथील शेतकरी काही लोक सर्रासपणे शेतीला व इतर कामाला पाणी घालत आहे सावळदबारा गावामध्ये वाटर सप्लाय टाकीमध्ये उशिरा पाणी येते आठ-दहा दिवसाआड पाणी येत आहे यांचा नाहक त्रास गावकऱ्यांना भोगाव लागत आहे ग्रामपंचायत कार्यालयाने अवैधरित्या नळ कनेक्शन वरती कारवाई न केल्याने काही देणे घेणे करून नळ कनेक्शन देण्यात आले आहे अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये चालू आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंचायत समिती जिल्हा परिषद कार्यालयातर्फे याची सखोल चौकशी करून ग्रामपंचायत कार्यालय व त्या संबंधित शेतकऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे .सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने पाणी जास्त प्रमाणात लागत आहे अवैध नळ घेतल्याने कृत्रिम पाणी टंचाई भासू लागली आहे ग्रामपंचायत च्या दुर्लक्षामुळे नळ कनेक्शन घेतली जात आहेजब्बार तडवी ,(सामाजिक कार्यकर्ते) सावळदबारा सर्कल

Read More

मानसिंग आप्पांचा ८१ वर्षांचा सुवर्णप्रवास — सहस्रचंद्र दर्शनाचा अनोखा गौरव सोहळा संपन्न..!

जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरबोदवड प्रतिनिधीआज आत्मसन्मान फाउंडेशन, बोदवड येथे आपल्या सर्वांचे आदरणीय माझ्या परिवाराचे कायम ऋणानुबंध असलेले गो.बा.ढाके महाविद्याल ऐणगावचे सेवानिवृत्त प्रयोगशाळा सहाय्यक उत्सवमूर्ती मा. मानसिंग आप्पा पाटील यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. हा कार्यक्रम आप्पांच्या परिवाराने घडवून आणला.या प्रसंगी मंचावर ॲड. जगनदादा लोखंडे, पुरुषोत्तम गड्डम सर, गोपालजी अग्रवाल, डॉ. विजय पाटील, डॉ. सुधीर पाटील, भरत आप्पा पाटील, पवन राजे पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. रोहन लोखंडे यांनी केले. प्रस्ताविक भरतसिंह राजपूत यांनी मांडले तर आभार प्रदर्शन अतुल पाटील व विशाल पाटील यांनी केले.व्यासपीठावरील मान्यवरांनी मा. मानसिंग आप्पा पाटील यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर प्रकाश टाकत त्यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. 🌿 पर्यावरण प्रेमी संजय वराडे यांच्या हस्ते फणस वृक्षाची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देण्यात आला.आप्पांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आत्मसन्मान फाउंडेशन येथील मनोयात्रींना स्नेहभोजन देण्यात आले. या आनंददायी सोहळ्याला आप्पांचा संपूर्ण परिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री महेंद्रसिंग सर व संपूर्ण परिवार यांनी परिश्रम घेतले.हा सोहळा म्हणजे केवळ वाढदिवस नव्हे, तर एका प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा सन्मान आणि जीवनमूल्यांचा उत्सव होता.

Read More

हिवरखेडा वाडी येथे कन्या पुजण्याची परंपरा कायमगोसावी समाज बांधव सरसावले

हिवरखेडा वाडी येथे कन्या पुजण्याची परंपरा कायमगोसावी समाज बांधव सरसावले जे.बी.एन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (एकनाथ कोळी)हीवरखेडा तवा. तालुका जामनेर येथे गोसावी बंधवामार्फत कन्या पूजनाची प्रथा अकरा वर्षापासून सुरू आहे. शुक्रवारी कन्या पूजन करण्यात आले . या निमित्त वैष्णवी देवी भंडाराची प्रथा सुरू ठेवली आहे नऊ अविवाहित मुलींचे पाय पाण्याने व दुधाने धुतले जातात पूजन करून पायाचे पाणी प्रसाद म्हणून पिण्याची प्रथा आहे जन्माला आलेली प्रत्येक मुलगी ही लक्ष्मी आहे. त्यामुळे पूजन करून त्यामुळे पूजन करून कन्याची गावभर मिरवणूक काढल्या जाते. गावातील व बाहेर गाव वरून आलेले भाविक दर्शन घेतात, त्यानंतर महाप्रसाद दिला जातो. त्यासाठी पुजारी अनिल चव्हाण,सुनील चव्हाण, मुकेश चव्हाण,धीरज चव्हाण,राज चव्हाण,रामेश्वर चव्हाण,आशिष चव्हाण इ. असतात.

Read More

विटनेर येथे स्व. ललितदादा हरीशेठ साठे यांच्या स्मरणार्थ एक्वा पाणपोईचे लोकार्पण

विटनेर (ता.जळगांव ) – गावाचे सुपुत्र स्वर्गीय ललितदादा हरीशेठ साठे यांच्या स्मरणार्थ विटनेर येथे उभारण्यात आलेल्या एक्वा पाणपोईचे लोकार्पण मा. ना. गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा) यांच्या हस्ते संपन्न झाले.गावकऱ्यांच्या वतीने उभारण्यात आलेली ही पाणपोई नागरिकांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार असून, येणाऱ्या उन्हाळ्यात ग्रामस्थांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. स्व. ललितदादा साठे यांनी गावाच्या सामाजिक, शैक्षणिक व विकासकामांत दिलेल्या योगदानाची आठवण यावेळी मान्यवरांनी कृतज्ञतापूर्वक केली.कार्यक्रमास मा. श्री. पप्पूदादा सोनवणे (जि.प. सदस्य), मा. श्री. हरीशेठ साठे (माजी पं. स. सभापती), मा. श्री. साहेबरावदादा वराडे (माजी पं.स. सदस्य), नेहाताई ललित साठे (लोकनियुक्त सरपंच, विटनेर), मा. श्री. रमेशआप्पा पाटील, मा. श्री. शिवराज पाटील, मा. श्री. पी. के. पाटील तसेच गावातील व पंचक्रोशीतील मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात स्व. ललितदादा साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत, समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती जपण्याचा संकल्प व्यक्त केला.

Read More

प्रत्येक निवडणुकीत एकाच घरातील सदस्यांना उमेदवारी का?

जे बी एन महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी जब्बार एस तडवी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फरदापुर गणात राजकीय पक्षांकडून पुन्हा एकदा एकाच घरातील सदस्यांना उमेदवारी तिकीट दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व रोष उफाळून येताना व्यक्त होत आहे. प्रत्येक निवडणुकीत त्याच कुटुंबातील व्यक्तींनाच संधी दिली जात असल्याने सामान्य कार्यकर्ते व नव्या तरुण उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना जनतेतून पुढे येत आहे.“पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्तांना डावलून घराणेशाहीला प्राधान्य दिले जाते,” अशी टीका स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. यामुळे लोकशाही मूल्यांना तडा जात असून पक्षांची विश्वासार्हता कमी होत आहे, त्यातच रस्ते, पाणी,आरोग्य, व शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये अपेक्षित सुधारणा झालेली नाही निवडणूक आली की आश्वासनाचा पाऊस आणि नंतर मात्र शांतता असा अनुभव जनतेने वारंवार घेतला आहे यावेळी मात्र जनतेचा सूर बदललेला दिसत आहे घराणे नाही काम पाहिजे अशी स्पष्ट भूमिका फरदापुर गणात परिवर्तनाची लाट निर्माण होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे असेही मत व्यक्त होत आहे.तरुण व सक्षम उमेदवारांना संधी न देता वारंवार एकाच घरातील सदस्यांना तिकीट दिल्यास निवडणुकीत याचा फटका पक्षांना बसू शकतो, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. याबाबत राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करून न्याय्य व पारदर्शक उमेदवार निवड प्रक्रिया राबवावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

Read More

उज्जैन (मध्य प्रदेश) येथे भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे ह्या उपस्थित

उज्जैन (मध्य प्रदेश) येथे भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे ह्या उपस्थित. बाबासाहेब यांच्या जन्मस्थान महू (मध्यप्रदेश) येथे भेट देऊन भूमीला नतमस्तक. भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ या मोहिमेअंतर्गत, भारतीय जनता पक्ष १४ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन बाबा साहेब यांचे विचार लोकांपर्यंत पोहचवणार असून, आज त्याच अभियानाचा भाग म्हणून उज्जैन (मध्य प्रदेश) येथे भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर ‘सन्मान अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले. संविधानाची निर्मिती साकार करून, बाबासाहेबांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचा आणि कोट्यवधी लोकांच्या उन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वाखाली, भाजपा सरकारने बाबा साहेबांच्या महान तत्वांचे अनुसरण करून, आज भाजपा ‘विकसित भारत’ चा संकल्प साध्य करण्यात प्रयत्नशील आहे. प्रत्येक घटकाचा विकास आणि सामाजिक सलोखा हे भाजपा चे ध्येय आहे. असे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सांगितले. तसेच यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थान असलेले महू (मध्यप्रदेश) येथे भेट देऊन या पवित्र भूमीला नतमस्तक करून त्यांच्या विचारांची, संघर्षांची आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याची जाणीव पुन्हा नव्याने केली. व शिक्षण, समता आणि न्यायासाठी झगडण्याची नवी ऊर्जा मिळाली. त्या मातीला स्पर्श करून मन विचारांच्या तेजाने उजळून निघालं. बाबासाहेबांनी दिलेला स्वाभिमान, शिक्षण आणि न्यायाचं बळ मनाला पुन्हा एकदा जाणीव करून देऊन गेलं. असे उद्गार यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी काढले.

Read More

ग्रामीण विकासात आजच्या युवतींची भूमिका मोलाची

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जनविश्वास सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात संजयदादा गरुड यांचे प्रतिपादन शेंदुर्णी येथील आप्पासाहेब रघुनाथराव गरुड महाविद्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संयुक्त आयोजित सजग युवती-सक्षम युवती उपक्रमाच्या व्याख्यान कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजयदादा गरुड यांनी अध्यक्षपदावरून ग्रामीण भागातील रचनेत आणि विकासात युवतींचा सहभाग आणि भूमिका अत्यंत मोलाची आहे असे मत मांडले.युवती केवळ कुटुंबाचा नव्हे,तर ग्रामीण समाजाचा देखील अविभाज्य घटक असल्याने त्यांनी आत्मविश्वासाने आपल्या क्षेत्रात भरारी घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या जनविश्वास सप्ताहामागील विवेचन युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्षा कु.भाग्यश्री विवेकानंद ठाकरे यांनी मांडले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नाना पाटील,जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शिंदे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव थोरात,शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे सचिव सागरमल जैन,युवा नेते स्नेहदीप गरुड,नगरसेवक धीरज जैन तसेच जंगीपूरा येथील उपसरपंच मनोज पाटील यांची विशेष उपस्थिती होती. चौकट (1)अत्यंत मौलिक विषयांवर युवतींना मिळाले मार्गदर्शन : या उपक्रमात युवतींसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.ॲड.केतन सोनार यांनी ‘सोशल मीडिया हाताळताना युवतींनी घ्यावयाची काळजी’ या विषयावर दैनंदिन घडामोडी,फेक न्यूज,ऑनलाइन फसवणूक याविषयी सजग राहण्याच्या दृष्टीने सउदाहरण विदयार्थीनींना अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व्याख्यान दिले.ॲड. उमेश मराठे यांनी ‘युवती व कौशल्य विकास कार्यक्रमातून उपलब्ध संधी’ या विषयावर विवेचन करताना कौशल्य विकास म्हणजे केवळ पार्लर किंवा शिवणकाम पुरते मर्यादित नसून, सामाजिक आणि व्यवसायिक क्षेत्रातही युवतींना अनेक संधी असल्याचे असे आपल्या व्याख्यानातून नमूद केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.संजय भोळे, आर.एस. चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसंचालन दिनेश थोरात यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य साळुंखे यांनी मानले. चौकट (2) वटवृक्षारोपण व दहा युवतींना रोपांची जबाबदारी : ‘एक झाड माझ्या दादांचं…!’ या उपक्रमांतर्गत राष्ट्रवादी युवती काँग्रेसने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दहा विद्यार्थिनींना वटवृक्षाचे रोप भेट देत त्यांच्याकडून जगविण्याचे वचन घेतले. यावेळी संस्थेच्या आवारात अध्यक्ष श्री. संजयदादा गरुड यांच्याहस्ते वटवृक्ष लावण्यात आले तृप्ती बारी,रोहिणी गुजर,नेहा न्हावी, वृषाली पाटील, गायत्री पाटील, कोमल म्हस्के, सानिया गुजर, निकिता पाटील, आरती पाटील आणि योगेश्वरी वाघ या दहा युवतींनी झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला.

Read More

पाचोरा-भडगाव तालुक्याच्या आढावा बैठकीत कार्यसम्राट आमदार मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शन..!

प्रतिनिधी (गजानन क्षीरसागर)पाचोरा: -आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पाचोरा येथील निर्मल सीड्सच्या कृषीदालनात चाळीसगावचे कार्यसम्राट आमदार मंगेशजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पाचोरा-भडगाव मतदारसंघातील आढावा बैठक उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती, संघटनात्मक बळकटी, तसेच गट आणि कार्यकर्त्यांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.बैठकीदरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “निवडणुका या फक्त राजकीय नव्हेत, तर विकासाचा आराखडा ठरवणाऱ्या असतात. प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाच्या विचारधारेसह विकासाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवावा.” त्यांनी संघटनशक्ती आणि तळागाळातील संवादाचे महत्त्व अधोरेखित करत कार्यकर्त्यांना उत्साहाने कामाला लागण्याचे आवाहन केले.या बैठकीत काही नव्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशही आमदार चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. बैठकीत दिलीपभाऊ वाघ, वैशालीताई सुर्यवंशी, अमोलभाऊ शिंदे, प्रताप हरी पाटील, अमोल नाना पाटील, मधुभाऊ काटे, सुभाष पाटील, संजय नाना वाघ, गोविंद शेलार, दीपक माने, शोभाताई तेली, अनिल पाटील, विनोद नेरकर यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.या आढावा बैठकीमुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवी उर्मी आणि संघटनात्मक एकात्मता जाणवली.

Read More

जि.प.प्राथमिक शाळा वाकडी येथे केंद्रीय शिक्षण परिषद उत्साहात साजरी

वाकडी येथे दि.३० सप्टेंबर रोजी वाकडी केंद्राची शिक्षण परिषद जिल्हा परिषद मराठी केंद्रशाळा वाकडी येथे आयोजित करण्यात आली. त्या शिक्षण परिषदेचे अध्यक्षस्थान वडगाव सद्दो शाळेचे मुख्याध्यापक श्री कौतिक आवटे यांनी भूषवले. या शिक्षण परिषदेसाठी जामनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री विष्णू काळे साहेब उपस्थित होते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन सरानुसार विद्यार्थ्यांचे विश्लेषण करून त्याप्रमाणे कृती कार्यक्रम राबवून आपण निश्चितपणाने अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करून गुणवत्ता निर्माण करू शकतो असा विश्वास काळे साहेबांनी उपस्थित शिक्षकांना दिला. तसंच ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणारा शिक्षणकप सद्यस्थितीत प्रथम क्रमांक वर असलेला जामनेर तालुका निश्चितपणाने उचलेल अशी अपेक्षा व्यक्त केली आणि त्यासाठी आजपर्यंत सर्व शिक्षकांनी केलेल्या कार्याचे कौतुक आदरणीय काळे साहेबांनी आपल्या मनोगतात केले. वाकडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री ज्ञानेश्वर पाटील सर यांनी केंद्रातील शाळांच्या निपुण महाराष्ट्र अभियान संदर्भात आढावा घेऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर शिक्षण परिषदेस उपस्थित असलेले फतेपूर व तोंडापूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री संदीप पाटील सर यांनी सुद्धा अध्ययन स्तर निश्चितीच्या संदर्भात उपस्थितांना सविस्तार मार्गदर्शन केले.वाकडी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रल्हाद शिंदे सर यांनी आपल्या प्रस्ताविकातून शाळेची यशोगाथा सर्वांसमोर मांडली. तर तर श्री विनोद नाईकडा यांनी जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमासंदर्भात मार्गदर्शन केले.शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर कवडे सर यांनी केले तर आभार श्री सूर्याजी काकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री ज्ञानेश्वर शामराव पाटील, श्री शेखर महाजन व श्री प्रकाश कुमावत यांनी परिश्रम घेतले.

Read More

जामनेरच्या टाकली खुर्द गावाच्या सरपंचाचा राज्यस्तरीय गौरव सरपंच जितेंद्र माळी यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान

*जामनेरच्या टाकली खुर्द गावाच्या सरपंचाचा राज्यस्तरीय गौरव सरपंच जितेंद्र माळी यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान …*जे बी एन महाराष्ट्र न्यूज जामनेरप्रतिनिधी -सुपडू जाधवजामनेर, दि. ६ एप्रिल – ग्रामीण भागातील विकासाच्या वाटचालीत झपाट्याने प्रगती करत टाकली खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. जितेंद्र प्रल्हाद माळी यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच प्रेरणादायी कार्याची दखल घेत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मिडिया समूह यांच्या वतीने त्यांना ‘राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.पुण्यातील S4G हॉटेल येथे आयोजित भव्य सोहळ्यात सिनेअभिनेता महेशदादा देवकाते पाटील, सिनेअभिनेत्री निलोफर पठाण, प्राची पालवे आणि प्रांजली पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.गावात स्वच्छता, पाणी योजना, हरित ग्राम संकल्पना, ग्रामसडक योजना, महिला सक्षमीकरण, लोकसहभागातून विकास आदी क्षेत्रात त्यांनी घेतलेले पुढाकार हे या सन्मानामागचे मोलाचे कारण ठरले.या गौरवाने टाकली खुर्द गावात आनंदाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, तसेच जामनेर तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सरपंच जितेंद्र माळी यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.या यशाबद्दल बोलताना सरपंच माळी म्हणाले, हा सन्मान संपूर्ण टाकली खुर्द गावासाठी आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. भविष्यातही विकासकामे अधिक जोमाने राबवणार आहे.

Read More
error: Don't Try To Copy !!